News Flash

कोल्हे यांचा राष्ट्रवादीला रामराम?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, त्यांचे चिरंजीव बिपीन कोल्हे यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय निश्चित झाला असून, ते उद्या गुरुवारी तसे जाहीर करणार असल्याचे समजते.

| September 4, 2014 04:21 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, त्यांचे चिरंजीव बिपीन कोल्हे यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय निश्चित झाला असून, ते उद्या गुरुवारी तसे जाहीर करणार असल्याचे समजते.  नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून ही चर्चा होती. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून बिपीन कोल्हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. ही निवडणूक तिरंगी झाल्यास फायदेशीर ठरेल असे वाटत असल्याने त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, उद्याच कोल्हे पिता-पुत्र राष्ट्रवादीला रामराम ठोकून अपक्ष उमेदवारीची घोषणा करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:21 am

Web Title: shankarrao kolhe leaves ncp
टॅग : Ncp
Next Stories
1 निवडणुकांतील काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष पथक
2 निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांबाबत संभ्रम
3 जपानमध्ये धर्मनिरपेक्ष शक्तींची खिल्ली उडविणे धक्कादायक
Just Now!
X