आघाडीची चर्चा सुरू असताना कॉंग्रेसने घाईघाईने आमच्या नकळत उमेदवारांची यादी जाहीर करून आमची फजिती केली, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील सर्वांनाच आघाडी हवी होती, असे मंगळवारी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ ‘आयडिया एक्स्चेंज’ संवादात राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केले. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काही बाबतीत आपले मतभेद आहेत, हे सुद्धा त्यांनी सांगितले.
या संवादामध्ये शरद पवार यांनी मांडलेले काही मुद्दे…

  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक एकत्रितपणे लढवावी असा आमचा आग्रह होता.
  • २८८ जागांची आम्ही तयारी केली नव्हती. आम्ही फक्त १३०-१३५ जागांचीच तयारी केली होती. 
  • अजित पवार, छगन भुजबळ या सर्वांनाच आघाडी हवी होती.
  • लोकसभेला कमी जागा लढूनही मतांच्या टक्केवारील आमचा ‘स्ट्राईक रेट’ चांगला होता. 
  • बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला ठाकरी भाषेत युतीमध्ये काय चाललं आहे ते सांगितलं असतं.
  • शिवसेना-भाजपमधील आजच्या पिढीच्या नेत्यांशी माझा आधीच्या पिढ्यांप्रमाणे संवाद नाही.
  • राष्ट्रीय हितासाठी पक्षाच्या पलिकडे एकत्र येऊन निर्णय घेतले जातात हे मी पाहिलंय.
  • पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघ महाराष्ट्रातील अतिशय प्रभावी मतदारसंघ.
  • काही बाबतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आमचे मतभेद आहेत. 
  • अजित पवारांबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. परंतु त्यांच्या अनेक जमेच्या बाजूही आहेत.
  • सर्वच पक्षांतील नवीन नेत्यांना नेतृत्त्व करण्याची योग्य संधीच मिळालेली नाही. 
  • कॉंग्रेसचं नेतृत्त्व मजबूत करायचं असेल तर त्यांनी समविचारी पक्षांची गर्दी करू नये.
  • मित्रपक्षांबाबत कॉंग्रेस वेगळ्या पद्धतीने विचार करू लागला आहे, असा माझा समज आहे.
  • लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेस पक्षाची स्थिती चिंताजनक. 
  • २००४च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं.
  • गेल्या ४-५ महिन्यात नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपण कोणत्याही निष्कर्षाप्रती पोहचू शकलेलो नाही.
  • नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सुसंवाद दिसत नाही.
  • लोकांना राजा हा प्रभावशाली लागतो. दुबळा राजा ते कधीच स्वीकारत नाहीत.
  • मनमोहन सिंग यांच्याकडे पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता होती.
  • लोकसभेला जिंकलेल्या सर्व जागा पोटनिवडणुकीत भाजप हरला याचा काय अर्थ घ्यायचा? 
  • सिंचन घोटाळ्याबाबतची सर्व चर्चा चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आली.