News Flash

ठाण्यात शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे भूमिपूजन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून शुक्रवारी निवडणुकीचे बिगूल फुंकण्याचा प्रयत्न केला.

| August 31, 2014 03:53 am

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून शुक्रवारी निवडणुकीचे बिगूल फुंकण्याचा प्रयत्न केला. ठाणे पश्चिमेतील इटर्निटी मॉलच्या शेजारील भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार असून या स्मारकासाठी सुमारे ११ कोटी १५ लाखांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या प्रभागात हे स्मारक उभारले जाणार आहे.
या स्मारकात दोन इमारती असून त्यापैकी एक इमारत ही पिरॅमिड आकाराची असणार आहे. पिरॅमिड पद्धतीने छत असलेली व पारदर्शक काचेसारख्या साहित्याचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये कला दालन, प्रदर्शनीय चलचित्रे, सामुदायिक एकाग्रता केंद्र, मोठी दालने, विद्युत आणि संगीताची जुगलबंदी असलेला कार्यक्रम, या सर्वाचा समावेश पहिल्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या इमारतीमध्ये व्यंगचित्र दालन, कला स्टुडिओ, ग्रंथालय, अभ्यासिका, कलाकारांसाठी निवासाची व्यवस्था, योग दालन, अ‍ॅम्पीथिएटर अशा बाबींचा समावेश केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:53 am

Web Title: shiv sena supremo bal thackeray memorial in thane
टॅग : Bal Thackeray
Next Stories
1 तृणमूलशी आघाडीला डाव्या पक्षांचा नकार
2 ‘अच्छे दिन’आल्याची जेटली यांची ग्वाही
3 ‘आघाडय़ांमुळे झारखंड पिछाडीवर’
Just Now!
X