News Flash

स्नेहलता कोल्हे भाजपच्या उमेदवार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांनी अखेर शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

| September 27, 2014 03:00 am

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांनी अखेर शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कोपरगाव मतदारसंघातून त्याच निवडणूक लढवतील असे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी सांगितले. दरम्यान येथे शिवसेनेकडून अखेर आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष यांनी शुक्रवारी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे आमदार काळे यांनी आज शिर्डीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली.
कोपरगाव येथे बिपीन कोल्हे की त्यांच्या पत्नी स्नेहलता कोल्हे याबाबत उत्सुकता होती. राज्यातील युती व आघाडी फिसकटल्यानंतर हालचालींना वेग आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:00 am

Web Title: snehlata kolhe bjp candidate from kopargaon
Next Stories
1 अच्युतानंदन यांची गृहमंत्र्यांवर टीका
2 मोदी मंत्रिमंडळात गृहमंत्री दुसऱ्या क्रमांकावर
3 सामंतांच्या सेनाप्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का
Just Now!
X