अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कुंभारी येथील दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य गुरूनाथ जयदेवप्पा कटारे(५२) यांचा सोमवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुरूनाथ कटारे हे सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर आपल्या कुंभारी गावात सोमवारी रात्री  आपले सहकारी  नबीलाल इस्माईल शेख(१८) यांच्या सोबत मोटारसायकलवर बसून शेतातील वस्तीकडे निघाले  होते. त्यांच्या सोबत दुसरे  सहकारी  शिवलिंग शंकर पारशेट्टी(३३) हे सुध्दा आपल्या बुलेट गाडीवरून निघाले होते. परंतु समोरून दोन मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कटारे यांच्यावर तलवारींनी हल्ला केला. यात त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू  झाला तर, नबीलाल शेख आणि शिवलिंग पारशेट्टी हेदेखील जखमी झाले. हल्लेखोर तिघे होते. त्यांनी तोंडावर काळे कापड गुंडाळले होते. त्यामुळे हल्लेखोरांची ओळख पटली नाही. हा प्रकार राजकीय वैमनस्यातून आणि विधानसभा  निवडणुकीत अडथळा ठरू नये म्हणून जाणीवपूर्वक  घडवून आणला गेल्याचा संशय व्यक्त  होत आहे.
यंदाच्या निवडणुकीत कुंभारी परिसरात राष्ट्रवादीचे मृत कटारे हे काँग्रेसचे उमेदवार सिद्धराम म्हेत्रे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सिद्रमप्पा पाटील यांचा हिरीरीने प्रचार करीत होते.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांनी घटनास्थळी धावून घेतली. वळसंग पोलीस ठाण्यात कटारे खूनप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ संवेदनशील राहिला आहे. मागील २००९ च्या निवडणुकीतही शेगाव [ता. अक्ककोट] येथे भाजपचे कार्यकर्ते भीमण्णा कोरे यांचा खून झाला होता. याप्रकरणात कॉग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या बंधूविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.

MNS, Maval, campaigning in Maval,
‘मावळ’ मतदारसंघात ‘मनसे’ अजूनही प्रचारापासून दूर
Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह