बिहारमधील २५ कोटी रुपयांच्या औषध घोटाळ्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी आणि माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात पत्रयुद्ध पेटले आहे. नितीशकुमार यांना याबाबत माहितीच्या अधिकारात ही माहिती मागविण्याची गरज नाही, कारण तुम्हीच बिहार सरकार होता, ही वस्तुस्थिती होती आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांसह प्रत्येक जण तुमच्याकडूनच आदेश घेत होता, असे मोदी यांनी नितीशकुमार यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.नितीशकुमार यांचे निवासस्थान आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान येथील सीसीटीव्हीचे फुटेज अथवा दूरध्वनीचा तपशील तपासला, तर  अधिकारी अनेकदा आल्याचे स्पष्ट होईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.