26 September 2020

News Flash

राष्ट्रवादी मागणीवर अडून बसल्यास काँग्रेसवर स्वतंत्र लढण्याची वेळ- माणिकराव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाच्या मुद्द्यावरून अडून बसल्यास काँग्रेसला राज्यातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवाव्या लागतील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी दिल्लीत सांगितले.

| September 20, 2014 03:23 am

राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाच्या मुद्द्यावरून अडून बसल्यास काँग्रेसला राज्यातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवाव्या लागतील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी दिल्लीत सांगितले. दिल्लीत शनिवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभेच्या १७४ जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे राज्यात स्वबळावर लढायची वेळ आल्यास, उर्वरित ११४ जागा लढण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय सोनिया गांधीच घेतील असे माणिकराव ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 3:23 am

Web Title: the way ncp is adamant on their stand seems like we might have to contest alone manikrao thakre congress
Next Stories
1 धक्क्य़ातून सावरण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान!
2 माढय़ात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंज
3 प्रतीक्षा घटस्थापनेची!
Just Now!
X