News Flash

.. काय असणार ‘ती’ घोषणा?

शिवसेनेकडून रविवारच्या सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

| October 12, 2014 09:50 am

शिवसेनेकडून रविवारच्या सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रविवारी शिवसेनेच्या वांद्रे येथे होत असलेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी मह्त्त्वपूर्ण घोषणा करणार! असा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या आणि सामान्यांच्यादेखील भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या या प्रचारसभेत नक्की कोणती महत्त्वपूर्ण घोषणा करणार याकडे माध्यमांसह सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. सर्वचजण म्हणत आहेत काय असणार ‘ती’ घोषणा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 9:50 am

Web Title: what will be the announcement by uddhav thackeray
Next Stories
1 दिल्लीश्वरांपुढे झुकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नको- उध्दव ठाकरे
2 गुजरातहून ‘फौजा’!
3 ‘राष्ट्रवादी पुन्हा’ सत्तेत आल्यास भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजेल- नरेंद्र मोदी
Just Now!
X