News Flash

‘भ्रष्टाचाराचा महामेरू’ महाराष्ट्र रक्षणाय!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या कारकिर्दीत झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि त्यांनी त्याचे केलेले निर्लज्ज समर्थन, हे भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले होते.

| October 12, 2014 11:36 am

गेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे  तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या कारकिर्दीत झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि त्यांनी त्याचे केलेले निर्लज्ज समर्थन, हे भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले होते. मोठी उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे यावे लागते, अशा शब्दात येडीयुरप्पा यांनी त्यावेळी पराभवाचे अप्रत्यक्षपणे समर्थनही केले होते. तेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्याक्ष येडीयुरप्पा सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, हे विशेष.  
स्वत: लिंगायत समाजाचे असल्याने येडीयुरप्पा यांच्यावर लिंगायत समाजाच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी भाजपने नामी युक्ती शोधत आहे. येडीयुरप्पा यांच्यावर उदगीर, देवणी व लातूर येथील प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली असून, शनिवारी त्यांनी या भागात प्रचार सभा घेतल्या. या तिन्ही ठिकाणी त्यांनी कन्नड भाषेतून मतदारांना भाजपला साथ देऊन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन केले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 11:36 am

Web Title: yeddyurappa campaigns for bjp candidates in maharashtra
टॅग : Yeddyurappa
Next Stories
1 सोनियांच्या सभेसाठी आणलेल्या महिलांना ‘हात’ दाखवून ‘ठेंगा’
2 .. काय असणार ‘ती’ घोषणा?
3 दिल्लीश्वरांपुढे झुकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नको- उध्दव ठाकरे
Just Now!
X