युती टिकवण्यासाठी शिवसेना भाजपची पुन्हा चर्चा

युती टिकवण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून मंगळवारी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले असून, चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले आहेत.

युती टिकवण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून मंगळवारी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले असून, चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले आहेत. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपनेही राज्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱयांची मंगळवारी बैठक बोलावली असून, दादरमध्ये ही बैठकही सुरू झाली आहे. भाजपचे राज्यातील सर्व नेते या बैठकीसाठी मुंबईला पोहोचले आहेत.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई हे तिन्ही नेते भाजपच्या नेत्यांशी चर्चा करीत आहे. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल. गेल्या रविवारी शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात भाजपसाठी ११९ जागा दिल्या होत्या आणि स्वतः १५१ जागा लढविण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. महायुतीतील घटकपक्षांसाठी या प्रस्तावात १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. मात्र, भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेऊन हा प्रस्ताव फेटाळला होता. जागावाटपाच्या मुद्द्यावरूनच या दोन्ही पक्षांमधील युतीला अद्याप अंतिम रूप मिळालेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp shivsena leaders meeting in mumbai