भाजपवर विश्वास, नैतिकतेचे पानिपत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत स्वत:चे स्थान सुरक्षित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत स्वत:चे स्थान सुरक्षित केले. यावरून ‘नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने मैदानातून पळ काढला’ अशी ओरड विरोधकांनी सुरू केली. मात्र, त्याच विरोधकांकडूनही संसदीय प्रतिष्ठेला धक्का घडवणारे वर्तन झाले. अभिभाषणासाठी विधानसभेत येत असलेल्या राज्यपालांनाच काँग्रेसच्या आमदारांकडून धक्काबुक्की करण्यात आली, तर शिवसेनेचे आमदारही यात आघाडीवर होते. या सगळय़ा गोंधळाचा शेवट काँग्रेसच्या पाच आमदारांच्या निलंबनाने झाला. मात्र, महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या या दोन्ही प्रकारांनी मतदारांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास आणि नैतिकता यांचे पानिपत केले.

चुकलेली गणिते, फसलेले हिशेब

राज्यपालांना धक्काबुक्की, ५ काँग्रेस आमदार निलंबित

राष्ट्रवादीची मदत टाळण्यासाठी आवाजी मतदानाची खेळी

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjps big leap in maharashtra but short of a mandate