१५ वर्षांच्या कालखंडानंतर दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. घोडेबाजार करून दिल्लीत सत्ता स्थापनेला भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. दिल्लीतील सत्तास्थापनेबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल, असे संकेत दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी दिले आहेत.
राज्यपाल नजीब जंग यांच्याकडून सत्ता स्थापनेबाबत आमंत्रण आल्यास याबाबत चित्र स्पष्ट होईल, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले. सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने पाठिंबा दिला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सौदेबाजीचा केलेला आरोप चुकीचा असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी स्पष्ट केले. पुन्हा निवडणुका घेतल्यास मोठा खर्च होईल, त्यापेक्षा सरकार स्थापन केल्यास चूक नाही, असे बादल यांनी स्पष्ट केले.

Dr. Ambedkar Marathi Quotes: महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरांचे 9 विचार मनी रुजवून, शेअर करून वाहा आदरांजली