राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या माधवराव चितळे समितीने सुचविलेल्या ४२ सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी अप्पर मुख्य सचिव (नियोजन) के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत वित्त, महसूल, कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, जलसंपदा-लाभ क्षेत्र विकास विभागाचे प्रधान सचिव, जलसंधारण व रोहयो विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, वने, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, महासंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.