अगदी तुरळक व्यक्तींना वरच्या दिशेने मोठ्ठी उडी मारायला मिळावी? की भरपूर व्यक्तींना वरच्याच दिशेने पण त्यांच्या आवाक्यातल्या छोटय़ा उडय़ा मारायला मिळाव्यात?

अशिक्षित व गरीब कुटुंबातली व्यक्ती एकदम कलेक्टर बनली हे फार ठळठळीत दिसते. तसे होणे हे उत्तमच. एके काळी चहा विकणारा आज पंतप्रधान होऊ शकला हे तर प्रसिद्धच आहे. पण हे अपवाद असतात. सामाजिक धोरण ठरविताना अपवादांचा विचार करून चालत नाही. ज्या व्यक्ती जिगरीच्याच असतात त्या धोरण कोणतेही असले तरी अशी झेप घेऊ शकतातच. पण संधींच्या समतेचे तत्त्व मोठय़ा उडय़ांना महत्त्व देणारे आणि त्यात समूहवादी किंबहुना गोतगटीय (एथनिक) समूहवादी बनून राहिलेले आहे. एखादी जात/जमात ‘सरासरी’ने दुर्बल ठरवून तिला वरिष्ठ पदांत कितपत ‘प्रतिनिधित्व’ मिळाले याच्याशी संधीच्या समतेच्या तत्त्वाचे लग्न लावून ठेवले गेले आहे.

wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
2 accused arrested for cheating in the name of buying and selling transactions in the speculation market navi Mumbai
नवी मुंबई: सट्टा बाजारात खरेदी विक्री व्यवहाराच्या नावाखाली फसवणूक करणारे २ आरोपी अटक

विकास उच्चवर्गाचाच न होता तो निम्नवर्गातही प्रसरणशील राहावा हे तर खरेच. पण प्याद्याचा वजीर बनवून उच्चवर्गीयता कमी होत नाही. फक्त उच्चवर्गीय व्यक्ती ‘पूर्वयुगीन कोण’ होत्या एवढेच पाहिले जाते. हा टोकनिझमच आहे. सक्षमीकरणासाठी खर्च येतो. टोकनिझम बिनखर्चात करता येतो! राजकीय फायदा जर टोकनिझमने म्हणजेच नामांतरे वगैरे करून मिळत असेल तर खर्च न करताच संधीच्या समतेचे आपण मोठेच पुरस्कत्रे असल्याचे दाखवता येते.

यात मुख्य दोष असा आहे की ‘प्याद्याचा वजीर’ ही संभाव्यताच अतिशय कमी असते. सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत आणि आरक्षित जातींमध्ये नवनव्या जातींची भर पडते आहे. जेव्हा आपण पाहतो की ४० जागांसाठी दोन लाख अर्ज येतात तेव्हा हे लक्षात यायला हवे की मोठय़ा उडीच्या संधी जर इतक्या तुरळक असतील तर आरक्षणाने असा काय फरक पडतो? आरक्षण असलेल्यांपैकी बहुसंख्य लोकांना फायदा होत नाही आणि ज्यांना आरक्षण नाही अशा बहुसंख्य लोकांचा तोटाही होत नाही. फक्त आरक्षणात विचार अडकून राहून जातिदृढमूलन मात्र होऊन बसले आहे. आरक्षण काढायला जावे तर अधिकच कडवटपणे जातिदृढमूलनच वाढेल! त्यामुळे आरक्षणाच्या विरोधी किंवा बाजूने भूमिका घेण्याचा प्रश्न नसून, आरक्षणाच्या पलीकडे जाऊन संधींच्या समतेचा विचार करावा लागेल. हा विचार ‘कमी जणांना मोठय़ा उडय़ा’ या सूत्राकडून ‘जास्त जणांना छोटय़ा उडय़ा’ या सूत्राकडे वळवावा लागेल.

ऊध्र्व-अभिसरण (व्हर्टकिल मोबिलिटी)

समाजात स्तरीकरण असणारच. त्यात कोणाहीबाबत तुच्छता किंवा कोणाचीही विटंबना असता कामा नये. विषमता किती असावी यावर वेगवेगळी मते असू शकतात. पण व्यक्तींचे स्तरांमधून अभिसरण होऊ शकणे अत्यंत आवश्यक आहे. एकाच पातळीवर पण विभिन्न क्षेत्रांत अभिसरण तर हवेच हवे. कारण व्यवसायस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. परंतु वरच्या व खालच्या दिशेने अभिसरणही महत्त्वाचे आहे. प्रमोशन आणि डिमोशन हे शब्द नोकरीपेशातून आलेले असले तरी ते व्यापक अर्थाने घेता येतात.

इलेक्ट्रिशियनला हॅण्ड-ड्रिलच्या जागी मोटर-ड्रिल वापरायला मिळणे हेही प्रमोशनच असते. शेतकऱ्याला सिंचन मिळणे किंवा ट्रॅक्टर मिळणे हेही प्रमोशनच. साधनांचे नूतनीकरण किंवा नवी साधने मिळणे हीसुद्धा व्हर्टकिल मोबिलिटीच असते. येथे प्रश्न कर्जपुरवठय़ाचा असतो. ज्या कोणात नवे साधन व त्याची कार्यपद्धती पेलण्याचे सामर्थ्य आहे अशांनाच कर्जपुरवठा झाला पाहिजे. अगदी गरीब शेतकऱ्याला अचानक जर्सी गाय दिली पण तो ती सांभाळू शकला नाही अशी उदाहरणे घडलेली आहेत. साधनांच्या अंगाने सक्षमीकरणासाठी वित्तपुरवठा हा उपाय आहे. पण माणसांचे सक्षमीकरण हे शिक्षण क्षेत्रात मूलगामी बदल करूनच होऊ शकते.

जास्त अनुकूल संधी मिळत जावी ही सर्वानाच आंस असते. त्यातून उत्कृष्टाची निवड होत राहून सर्वाचाच फायदा होतो. जे ज्याला जास्त चांगले जमते ते काम त्याला करायला देणे यात सर्वाचा लाभ असतो हे अर्थशास्त्राचे तत्त्वच आहे. परंतु प्रमोशनसाठीच्या प्रयत्नांच्या मानाने डिमोशनला होणारे प्रतिकार जास्त तीव्र असतात. तोटा टाळण्याची प्रेरणा ही फायदा करून घेण्याच्या प्रेरणेपेक्षा जास्त मजबूत असते, असे मानसशास्त्रज्ञांना आढळून आले आहे आणि आपल्याला सामान्य-समजेनेही ते जाणवते. डिमोशन्स कमी राहून प्रमोशन्स जास्त व्हावीत हे विकास होत असला तरच शक्य असते. कारण सर्वच स्तरांत नव्या संधी उत्पन्न होत असतात.

प्रथम अगदी नजीकच्या संधी कसकशा असू शकतात ते पाहू. ‘सराट’मधली आर्ची बॉटिलग कंपनीत मजूर म्हणून प्रवेश करते पण सुपरवायझर बनते. परशाही भेळेच्या गाडीवर काम करीत स्वतचा व्यवसाय सुरू करतो. ही व्हर्टकिल मोबिलिटीच आहे. कामगारांचे स्किल-अपग्रेडेशन कमी शक्य असते. पण व्हर्सटॅलिटी म्हणजे वेगवेगळी कामे करता येणे आणि करायला तयार असणे ही गोष्ट मालकांना गरजेची असते. व्हर्सटाइल म्हणजे (मर्यादित अर्थाने) अष्टपलू बनणे यात निश्चित प्रमोशन असते. इतकेच नव्हे तर ‘कामगाराचा व्यवस्थापनात सहभाग’सुद्धा त्यातून वाढत असतो. तसेच जास्त शिक्षणाची जोड देऊन नर्सला अर्ध-डॉक्टर बनवणे किंवा केमिस्टला अर्ध-डॉक्टर बनवणे हे जास्त आवाक्यातले आहे. अशा उन्नयनांच्या शक्यता प्रत्येक क्षेत्रात हेरता आल्या पाहिजेत.

निरनिराळ्या निमित्तांनी माणसाचा नवनवीन क्षेत्रांशी संबंध येतो. त्याला त्याची आवड आणि क्षमता एखाद्या क्षेत्रात आहे असे ध्यानात येते. पण औपचारिक सर्टिफिकेट भलत्याच क्षेत्रातले असते. व्यवसाय शिक्षण ही गोष्ट प्रामुख्याने त्या त्या व्यवसायातच घडत असते. अनुभव घेणे चालू असताना नेमक्या वेळी ज्ञानाची जोड मिळाली तर त्या त्या कार्यावर एकदम पकड येते. खरे तर ज्ञानाचा घटक, संधी येऊ घातलेल्या प्रसंगी मिळणे फारच मोलाचे ठरू शकते. उद्योगातील गरजांनुसार असे टेलरमेड छोटे कोस्रेस देणाऱ्या संस्थांची जास्त गरज आहे. इतकेच नव्हे तर किती तरी आरपार नव्या स्वरूपाचे जॉब्ज निर्माण होत आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक आहे. संवादशक्ती आणि मानवी संबंध यात प्रशिक्षणाची गरज प्रचंड आहे. परंतु अनुदान आणि मान्यता या गोष्टी साचेबंद आणि वाईट अर्थाने अकेडेमिक संस्थांनाच मिळतात. संधीची समता हे तत्त्व गंभीरपणे मानणाऱ्यांनी संधी देणाऱ्याच्या नव्हे तर संधी घेणाऱ्याच्या दृष्टीने सक्षमीकरण हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. व्हर्टकिल मोबिलिटी वाढली पाहिजे असे म्हणताना त्यासाठी करावयाची विधायक कार्ये कोणती हे ओळखण्याची गरज आहे.

‘स्पर्धाच नको’ हा अर्थ नाही.

संधीची समता हे खूप व्यापक तत्त्व आहे. टेंडर काढले पाहिजे किंवा लिलाव केला पाहिजे या गोष्टीही याच तत्त्वातून येतात. मुळात संधीची समता या संकल्पनेत कशाची संधी अभिप्रेत आहे? स्पर्धेत भाग घेण्याची संधी (जी कर्णाला नाकारली गेली!) हे खरे उत्तर आहे.

जन्माधिष्ठित भेदभाव, वशिलेबाजी यासह माहितीच न पोहोचणे, संपर्क (कनेक्टिव्हिटी) वा समक्षता (एक्सपोजर) नसणे याही घटकांमुळे संधी हुकत असतात. संपर्क-क्रांतीचे महत्त्व यासाठीही आहे.

मात्र न खेळताच विजेता म्हणून घोषित होण्याची संधी किंवा प्रत्येक मॅच ही सुरुवातीलाच ड्रॉ म्हणून घोषित करा अशी सक्ती अभिप्रेत नाही. कारण तसे केले तर खेळ होऊच शकणार नाही.

एक तर खेळ ही गोष्ट खूपच नियंत्रित असते. नियम बनविताना आणि निर्वाळे (व्हर्डिक्ट्स) देताना नि:पक्षपातीपणा राखण्याची पुरेशी संधी असते. अगदी टॉस करतानादेखील नाणे एक कॅप्टन उडवेल आणि बोली विरुद्ध-कॅप्टन लावेल इतकी काळजी घेतली जाते. मात्र वास्तव इतके नियंत्रित असू शकत नाही. तसा प्रयत्न करण्यातूनच हुकूमशाहीचे मोह पडतात.

भाग्यवशात असोत वा स्व-यत्न-अर्जित असोत प्रत्येकाला कोणत्याही क्षमतेत विविध यशदस्थिती (अडव्हान्टेजेस) आणि अयशदस्थिती (डिसअडव्हान्टेजेस) असतातच. त्यापैकी मुख्य स्पर्धेत जे निकष-गत (मेरिट-वर्दी) असेल त्याहून बाह्य किंवा उपरे घटक एलिमिनेट करणे म्हणजे लेव्हल प्लेइंग फील्ड! उदा. पळण्याच्या स्पर्धेत बाहेरील कक्षेतून पळणाऱ्यांना पुढे स्टार्ट देऊन, कापायचे अंतर समान केले जाते. तसेच उत्तेजक द्रव्य वापरले नाही ना हेही पाहिले जाते. हे क्रीडाबाह्य (कलाबाह्यच्या चालीवर) घटक काढून टाकण्यासाठी ठीकच आहे. पण जोरात पाळण्याची वृत्ती व क्षमता नसेल तर हरावेही लागणार. त्याचप्रमाणे संधीची समता हा सक्षमीकरणाला पर्याय असू शकत नाही.

म्हणूनच सार्वजनिक निधीचा (बजेटचा) जास्त भाग सक्षमीकरणाकडे वळवणे आणि बदलत्या औद्योगिक/सेवाक्षेत्रीय वास्तवाला त्वरित प्रतिसाद देणारी शिक्षणव्यवस्था उभारणे हे न करता संधीच्या समतेविषयी बोलणे निर्थक आहे. उच्चशिक्षण महापूर हाही असंतोष निर्माण करीत राहील पण समस्यालक्षी (रिलेव्हंट) शिक्षण पोहोचवणार नाहीच. उच्चशिक्षण हे आवाक्यातल्या उडय़ांपासून चित्त विचलित करते.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com