22 September 2020

News Flash

मिलिंद देवरा यांची कसोटी!

कुलाबा, कफ परेड ही उच्चभ्रूंची वस्ती ते जुनाट वा मोडकळीस आलेल्या परळ तसेच गिरगावमधील चाळी तसेच इमारती अशा संमिश्र स्वरूपाच्या मतदारसंघात

| November 24, 2013 01:52 am

खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
उत्तर मध्य मुंबई,  ईशान्य मुंबई

मिलिंद देवरा यांची कसोटी!
कुलाबा, कफ परेड ही उच्चभ्रूंची वस्ती ते जुनाट वा मोडकळीस आलेल्या परळ तसेच गिरगावमधील चाळी तसेच इमारती अशा संमिश्र स्वरूपाच्या मतदारसंघात काँग्रेसचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा हे पुन्हा नशीब अजमावणार आहेत. देवरा यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी तयारी सुरू केली होती. आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी, असा लोढा यांचा प्रयत्न आहे. मात्र युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, शिवसेना या मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाही. या मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेचे मोहन रावले यांना मागे टाकत मनसेचे बाळा नांदगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेनेने माजी आमदार अरविंद सावंत यांचे नाव जवळपास निश्चित केले असल्यानेच मोहन रावले हे संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. देवरा कुटुंबीयांचे सत्तेच्या वर्तुळात असलेले महत्त्व लक्षात घेता मिलिंद देवरा यांच्यासाठी एक बडा उद्योगपती प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील गुजराती, मारवाडी, जैन व अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण लक्षात घेता काँग्रेसचे नेते आशावादी आहेत. भाजपने आधी या मतदारसंघावर दावा केला होता, पण आता मात्र भाजपने शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या विरोधात देशभर मोठय़ा प्रमाणावर असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्याचा विरोधी पक्षांचा  जोरदार प्रयत्न असला तरी शिवसेना आणि मनसे वेगवेगळे लढल्यास त्याचा काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनाच राजकीय लाभ मिळू शकतो.
लोकसभा मतदारसंघ : दक्षिण मुंबई
विद्यमान खासदार : मिलिंद देवरा, काँग्रेस
मागील निकाल :  बाळा नांदगावकर, मनसे, पराभूत
मतदारसंघातील कामगिरी :
*मोडकळीस आलेल्या इमारती, संगणकीय शिक्षणाच्या प्रसारावर भर. दक्षिण मुंबईतील अनेक शाळांमध्ये संगणकांचे वाटप. ‘स्पर्श’ संस्थेच्या माध्यमातून गरीब युवक-युवतींना संगणकाचे प्रशिक्षण उपलब्ध.
*फुटबॉल स्पर्धाचे आयोजन करून चमकदार कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूंना प्रोत्साहन.
*मुंबईमधील २० महाविद्यालयांमधील ८० विद्यार्थ्यांना दरवर्षी लोकसभेचे दर्शन घडवितात.
लोकसभेतील कामगिरी
उपस्थित केलेल एकूण प्रश्न – २१७.
एकूण हजेरी – १४३ दिवस (१५८ पैकी. ही उपस्थिती सातव्या अधिवेशनापर्यंतची)
काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातील नेता
मुरली देवरा असो वा मिलिंद देवरा, वडील आणि मुलात एकाबाबतीत साम्य आहे व ते म्हणजे पक्षनेतृत्वाच्या अंतर्गत वर्तुळात वावरण्याचे. मुरली देवरा यांनी २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे विक्रमी अध्यक्षपद भूषविले. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे नवे नेतृत्व राहुल गांधी यांच्या अंतर्गत वर्तुळातील. मुरली देवरा यांचे मंत्रिपद गेल्यावर मिलिंद यांचा लगेचच राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये असल्यानेच ही संधी त्यांना मिळाली. कलंकित मंत्र्यांना संरक्षण देणारा वटहुकूम फाडून टाकण्यासारखा असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याने देशभर खळबळ माजली. मात्र राहुल यांच्या विधानाच्या आधीच एक दिवस मिलिंद देवरा यांनी वटहुकुमाला विरोध दर्शविला होता. तेव्हाच काँग्रेसमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली होती. राहुल यांचे वटहुकुमाबाबतचे मत तयार करण्यात देवरा यांचे योगदान होते की काय, अशी ती चर्चा होती.
लक्षणीय..
केंद्रात दूरसंचार हे खाते भूषविणाऱ्या मिलिंद देवरा यांनी अलीकडे गाजणाऱ्या मोबाइल टॉवर्सच्या मुद्दय़ात लक्ष घातले. त्याची नियमावली मुंबईत लागू करण्यासाठी पुढाकार घेतला. जुन्या सेस इमारतींच्या पुनर्विकासाला जादा चटईक्षेत्र निर्देशांक मिळावा म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता.
साफ अपयशी
दोनदा लोकसभेवर निवडून येऊनही चमकदार कामगिरी करण्यात मिलिंद देवरा हे साफ अपयशी ठरले आहेत. इमारत दुरुस्ती, गटारे वा रस्ते ही कामे नगरसेवकांकडून केली जातात. भविष्यात आपले नाव होईल अशा पद्धतीने खासदाराने मतदारसंघात काम करणे आवश्यक असते. पण तसे झालेले नाही. त्यांनी मतदारसंघात जनसंपर्कही तेवढा ठेवलेला नाही.
बाळा नांदगावकर (मनसे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2013 1:52 am

Web Title: an account of member of parliament hard time for milind deora in 2014 polls
टॅग Milind Deora
Next Stories
1 बाळ राणेंची हास्यचित्रे पाहिली आणि..
2 सागरी प्रभुत्वासाठी विक्रमादित्य
3 ‘ती’ तरुणी, गृहराज्यमंत्री, पाळत आणि ‘साहेब’
Just Now!
X