दयानंद लिपारे

शेती हा व्यवसाय संपूर्णपणे ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे. यामध्येही पारंपरिक पद्धतीने शेती करणारा वर्ग मोठा आहे. परंतु यालाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बाजारपेठेचा अंदाज घेत शेती कसू लागले तर आमूलाग्र बदल घडून येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कारभारवाडीने दाखवलेला हा मार्ग…

Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
Violation of Model Code of Conduct by Municipal Commissioner Vipin Paliwal
मनपा आयुक्तांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, निलंबनासह फौजदारी…

‘गाव करील ते राव करील काय’ या म्हणीचा प्रत्यय यावा अशी कामगिरी छोटेखानी कारभारवाडी गावाने दाखवून दिला आहे. शेती क्षेत्रात केलेल्या प्रयोगशील कारभारामुळे कारभारवाडी गाव चर्चेत आहे. आजवर राळेगण सिद्धी, हिवरे बाजार सारख्या गावांची चर्चा होत असे. याच पंक्तीत आता कारभारवाडी हे नाव घेण्याइतकी सक्षमता प्राप्त केली आहे. १०० टक्के ठिबक सिंचनाचे गाव ही या गावाची मूळची ओळख.  पण त्याही पलिकडे जात असतात कृषी क्षेत्रातील प्रगतीचे वेगवेगळे टप्पे या गावात आकाराला येत आहेत. गावचा केवळ धनाने विकास झाला नाही तर मनानेही गाव विणले गेले आहे.

देशात शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या ही ६५ टक्के हून अधिक आहे. राज्यातही १७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली तर उर्वरित पावसावर अवलंबून आहे. कोल्हापूरसारख्या कृषी क्षेत्रात प्रगतिशील असणाऱ्या भागात नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारलेली आहे. पण अनेक छोटेखानी गावांमध्ये आजही अनेक समस्या आहेत. यातलीच एक गाव म्हणजे कारभारवाडी. करवीर तालुक्यातील सडोली खालसा पैकी कारभारवाडी या गावात या गावची लोकसंख्या मोजून ४००. कुटुंबाची संख्या ६१. जवळपास सगळेच शेतकरी; तेही अल्पभूधारक. २ गुंठे ते २ एकर असे शेतीचे क्षेत्र. सरासरी २५० सेंटीमीटर पाऊ स पडूनही प्रश्न काही सरत नव्हते. उसाचे सातत्याने पीक घेतल्याने अतिरिक्त अतिरेकी पाटपाण्याचा वापर, रासायनिक खताचा मुबलक वापर, माती परीक्षणाचा अभाव याचे दुष्परिणाम दिसू लागले. प्रति एकर ऊ स पीक अवघे २५ टनांवर आले. एकरी वीस हजार रुपये उत्पन्न मिळायचे. स्वभाविकच शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण होत राहायची. दुग्धव्यवसायाचा महिन्यातून तीनदा मिळणारा ताजा पैसा खिशात खुळखुळायचा. लहानसान खर्चात तो संपून जायचा. अशा एकूण वातावरणात नवं काही करणं ही अशक्य कोटीतली बाब. अशा परिस्थितीत गावची तरुणाई वेगळे काही करण्याच्या ध्येयाने उभी राहिली. त्यातून एकेक प्रगतीचे टप्पे पार पडले. उपœ मशीलतेला यश येत गेल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वाास दुणावला.

ठिबक सिंचनामुळे यशोमार्ग

प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिवा रामा सहकारी पाणीपुरवठा संस्थेने ठिबक सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ठरवले. पूर्वी ही संस्था खाजगी तत्त्वावर होती. नंतर ती सहकार तत्त्वावर सुरू करण्यात आली. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०१५ मध्ये ठिबक सिंचन कार्यान्वित केले. राज्य शासनाच्या शेती शाळेच्या माध्यमातून प्रति एकर ८० टन ऊ स पीक घेण्याची चर्चा होऊ  लागली. अशातच ‘इफको’ या खत निर्मिती करणाऱ्या सहकार तत्त्वावरील सर्वांत मोठ्या कंपनीने तीन वर्षांसाठी कारभारवाडी हे गाव दत्तक घेतले. अर्थात ठिबक सिंचन योजना राबवण्यापूर्वी काही प्रश्नही पडले होते. ही योजना राबवणे सयुक्तिक ठरणार आहे का? असे प्रश्नही उपस्थित झाले. त्यासाठी आजूबाजूच्या ठिबक शेती करणाऱ्या गावांची, शेतकऱ्यांची, प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. अखेरीस कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प राबवण्याचे निश्चिात करण्यात आले.  पाच कंपन्यांकडून प्रकल्प अहवाल मागून घेतले. एकरी सरासरी एक लाख वीस हजार रुपये रकमेची निविदा भरली गेली. त्यामध्ये जैन इरिगेशन कंपनीने ९४ हजार रुपये रकमेला प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवली. तेव्हा १८ महिन्यांचा देखभाल दुरुस्तीचा करार झाला होता पण त्यानंतर आजही एकही रुपया अतिरिक्त न आकारता ही कंपनी देखभाल दुरुस्तीचे काम करीत आहे. एक कोटी १७ लाख रुपये खर्च केल्याने १३१ शेतकऱ्यांचे ५५० हून जास्त तुकड्यांवर ठिबक सिंचनाचे जाळे पसरले गेले. एखाद्या शेतकऱ्याची चूक किरकोळ अडचण विचारात घेऊ न ही सोडवण्याचे प्रयत्ना केल्याने सकारात्मक भावना निर्माण करण्यात संस्थेचे कारभारी यशस्वी झाले.

फायदेच फायदे

ऊ स शेती म्हटली की ती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे बदनाम झालेली. पाटपद्धतीमुळे पाण्याचा वारेमाप वापर होत होता. हा पाण्याचा अपव्यय टाळून पुढील पिढीसाठी जमिनी चांगल्या उत्पादनक्षम ठेवणे शक्य नव्हते. यामुळे कारभारवाडीने स्वयंचलित ठिबक सिंचनाचा प्रकल्प हाती घेऊ न तो यशस्वी करून दाखवला. त्याचे एकदोन नव्हे तर तब्बल डझनभर फायदा झाल्याचे गावकरी सांगतात. सर्वांत मोठा फायदा झाला तो म्हणजे पाण्याच्या बचतीचा. पाटपाण्याच्या पद्धतीने ज्या वेळी पाणी दिले जाई, त्या वेळी एकरी दोन कोटी लिटर पाण्याचा वापर होत होता. ठिबक सिंचन आल्यावर हाच वापर आता ५५ लाख लिटरवर आला आहे. दुसरीकडे पाट पद्धतीने दिले जाणाऱ्या पाण्यामुळे २५ टक्के पाणी हे पुढे शेतातून या नाल्यात आणि तिथून नदीत मिसळत होते. या पाण्याच्या वहनामुळे जमिनीची धूप, रासायनिक खताचे नुकसान होत होते. दुसरीकडे या प्रकारच्या पाणी वाटपामुळे ऊ र्जेची ३२ टक्के बचत करण्यात गावाला यश आले.

या नव्या पद्धतीने पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीची प्रत, बाष्पीभवन यानुसार पाणी देता येणे शक्य झाले. मुख्य म्हणजे उसाचे उत्पन्न वाढले आणि खर्च कमी झाला. पूर्वी लागणीसाठी एकरी तीन टन उसाचा वापर होत होता. या ऐवजी एक डोळा पद्धतीने रोप लागवड सुरू झाली आणि आता केवळ उसाच्या चारशे नगात एक एकरची लागण करणे शक्य झाली आहे. एकप्रकारे उसाच्या बियाणे वापरात मोठी बचत झाली. उसासाठी एकरी उत्पादन खर्च ६४ हजार रुपये होता तो पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्याने २७ हजार रुपये होऊ  लागला. प्रति एकर उत्पादन २७ वरून प्रति एकर ४७ टनापर्यंत उत्पादन वाढले आहे. प्रवीण साळुंके हे उसाचे उत्पादन दुप्पट वाढल्याचे सांगतात.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंतरपिकातून उत्पन्न वाढले. पूर्वी उसाबरोबर केवळ मक्याचे आंतरपीक घेतले जात होते. आता साडेचार फुटांची सरी असल्यामुळे उसाच्या दोन सरीमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला फुलांची शेती होत आहे. यामुळे प्रति एकर एक ते दोन लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. १७ गुंठे शेती असलेले बाजीराव पाटील सांगतात, की आंतरपीक म्हणून वांगी, गवार, भेंडी, दोडका, कारली पिके घेतली. उसाचा व्यतिरिक्त दर वर्षी सव्वा लाखाचे उत्पन्न मिळते. कृषी विभागाकडून शेतीशाळा, कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळत असल्याने एकूण शेतीचे चित्र समाधानकारक बदललेले आहे.’ रासायनिक खताच्या नियोजनात लक्षणीय बदल दिसून आला. पूर्वी प्रति एकर रासायनिक खतांचा खर्च १ हजाराच्या आसपास होता. पाटपाण्यामुळे ६५ टक्के खते वाया जात होती. सध्या ही खते ठिबक सिंचनद्वारेच पिकाच्या मुळाजवळ जात असल्याने खतांची उपयोगिता ९० टक्के पर्यंत वाढीस लागली आहे. नदीतील पाणी गाळून शेतीला दिले जात असल्याने तणांचा प्रादुर्भाव ७० टक्क्यांनी कमी झाला. तणनाशक व भांगलणीच्या खर्च किमान ५० टक्क्यांनी कमी झाला, असे निरीक्षण या पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष प्रा. नेताजी पाटील हे नोंदवतात. उसाची शेती म्हणजे अतिरिक्त पाणी आणि खताच्या वापरामुळे जमिनीचे मातेरे असे एक समीकरण अनेक ठिकाणी पाहायला मिळते. यामुळे दलदल व पाणथळ जमिनीची समस्या निर्माण झाली आहे. ठिबक सिंचनामुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र फिडर असल्यामुळे आवश्यक तितके पाणी दिल्यानंतर चालू-बंद करता येणे शक्य झाले आहे. कायमस्वरूपी वाफसा अवस्था राहून जमिनीच्या प्रतीत सुधारणा झाली आहे. मनुष्यबळ, पैसा व वेळ यामध्ये बचत झाली आहे. रात्रपाळीमध्ये पाणी देताना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असायची. मक्याचे सर पायाला लागून शेतकरी जखमी होत असत. आता रात्री-अपरात्री पाणी देण्यासाठी शेतावर जाण्याची गरज उरली नाही. जीवाशी येईल अशा घटनांपासून शेतकरी अलिप्त होऊ न त्याचे आयुष्य तणावमुक्त बनले. पाटपाणी वाटपावरून तंटामुक्त समितीला नसते उपद्व्याप सोडवण्यासाठी ताकद खर्च करावी लागायची. यातून शेतकऱ्यांची मुक्तता तर झालीच आहेत पण लोकही मनाने जवळ येण्यास मदत झाली आहे. विचारांची देवाणघेवाण झाली. उसाचे वाढीव उत्पन्न व आंतरपिकातून मिळणारे उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला. आधुनिक शेतीसाठी पॉवर टेलर, ट्रॅक्टर, अवजारे आदी साधनांचा वापर होऊ  लागला.

नवी दृष्टी… विकासाची सृष्टी!

गावातील काही शेतकरी केवळ भाजीपाला, फुलाचे उत्पादन घेत आहेत. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी कारभारवाडी अ‍ॅग्रो फूड कंपनी सुरू केली आहे. आजूबाजूच्या पन्नास गावांतील एक हजार शेतकरी या उपक्रमाशी जोडलेले आहेत. सुरुवातीला हा शेतमाल उपलब्ध बाजारात विकला जाणार आहे. वर्षभरानंतर किती, कोणता शेतमाल पिकला आणि विकला याची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर शहरात थेट ग्राहकाच्या घरी तो विकला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना खत, औषध, बियाणे स्वस्त दरात पुरवठा केला जाणार असून विœीची हमी ही दिली जाणार आहे. खेरीज ‘आत्मा’ अंतर्गत शिवा रामा पाटील कृषी शेतकरी स्वयंसेवा गटाच्या माध्यमातूनही पशुपालन, कुक्कुटपालन, हरितगृहातील शेती असे वेगळे उपœ म राबवण्यासाठी अडीच ते तीन कोटी रुपये रुपयांची गुंतवणूक होत आहे. याशिवाय सोलापूर येथे एक शेती कंपनी स्थापन केली असून त्याचेही सहकार्य घेतले जात आहे, असे प्रा. नेताजी पाटील यांनी सांगितले. थोडक्यात काय तर शेती कसण्याविषयीचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलण्यात ठिबक सिंचन योजना लाभदायी ठरली. कारभारवाडीचा शेतीच्या प्रगतीच्या आलेखाचा कारभार पाहता गावचा खराखुरा कारभार कसा असावा, याचा मापदंड निर्माण करण्यात निखळ यश आले असल्याचे भोगावती काठचे बारमाही डोलणारे हिरवेगार शिवार पाहिल्यानंतर खात्री पटते.

dayanand.lipare@expressindia.com