News Flash

तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती, प्रचार आणि प्रायोजकत्वावर बंदी

सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांनी दर सेकंदाला एक बळी जातो, सुमारे ६० लाखांहून नागरिकांना दरवर्षी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यूला कवटाळावे लागते, तर सहा लाख

| May 31, 2013 03:48 am

सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांनी दर सेकंदाला एक बळी जातो, सुमारे ६० लाखांहून नागरिकांना दरवर्षी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यूला कवटाळावे लागते, तर सहा लाख धूम्रपान न करणाऱ्या नागरिकांना धूम्रपानामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका बसतो. तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या दृष्टचक्राला बदलण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक आरोग्य संघटना आणि त्यांच्या सहाय्यक संस्था ‘तंबाखू सेवनविरोधी दिन’ साजरा करतात. या वर्षी संघटनेच्या मोहिमेचे घोषवाक्य ‘तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती, प्रचार आणि प्रायोजकत्वावर बंदी आणावी’ असे आहे.
तंबाखू उत्पादनांच्या आकर्षक आणि देखण्या लोकप्रिय कलाकारांच्या जाहिरातींमुळे या उत्पादनांची विक्री व उपभोग वाढत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. २०३० सालापर्यंत तंबाखुसेवनाच्या घातकतेबाबत दुर्लक्ष केल्यास ८० लाखांहून अधिक नागरिक दरवर्षी तांबुलसेवनाने मृत्युमुखी पडतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने मागे दिला होता. २००९ साली नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटने पाच वर्षे केलेल्या अभ्यासानुसार तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती आणि त्यांचा उपभोग यांच्यात मोठा संबंध आहे. टीव्ही, रेडिओ व इतर माध्यमांमधून तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींचा केला जाणारा प्रचार हा त्यांच्या विक्रीमध्ये वाढ करतो, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर र्सवकष बंदी आणण्यात यावी, असे अहवालामध्ये सुचविण्यात आले.

काय आहे ‘टॅप्स’?
‘टोबॅको अॅडव्हर्टाइझिंग, प्रमोशन अॅण्ड स्पॉन्सरशीप’ यातील आद्याक्षरांपासून तयार झालेले ‘टॅप्स’ सर्व प्रकारच्या माध्यमांतून, कार्यक्रमांतून तंबाखू उत्पादनांना बंदी घालण्यासाठी कार्यरत झाले आहे. काही देशांमध्ये तंबाखू कंपन्या वृत्त आणि दृकश्राव्य माध्यमांना जाहिराती देतात. सार्वजनिक ठिकाणी फलक, होर्डिग्जवरून उत्पादने बिंबवतात, इंटरनेटच्या सहाय्याने तंबाखू उत्पादनांचा प्रचार करतात. यंदा जागतिक आरोग्य संघटना वेगळ्या मार्गाने त्यासोबत झगडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 3:48 am

Web Title: ban on tobacco product advertisement campaign and sponsorship
टॅग : Campaign
Next Stories
1 तंबाखूविरोधी मोहीम
2 वाण.. ‘सतीचं’च?
3 तिसऱ्या ध्रुवावरील पहिले पाऊल!
Just Now!
X