गिरीश कुबेर

करोनाच्या साथीत सारे जगच हेलपांडलेले असताना काही देशांतील परिस्थिती मात्र वेगळी का दिसते? अशा महासाथीच्या काळात जनतेचे जीव वाचवणे हेच काम सर्वार्थाने महत्त्वाचे आणि मोठे असते हे काही कोणी अमान्य करणार नाही. पण तरीही हे काम करत असताना काही असे असतात की जे समोरच्या घटनांच्या मुळाशी जातात आणि त्यातून काही शिकता-शिकता उर्वरितांचे मार्गदर्शक ठरतात. हा फरक समजून घेणे महत्त्वाचे कारण हीच असते सर्वसामान्य आणि सर्वमान्य यांच्यातील सीमारेषा.

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Loksatta kutuhal artificial intelligence Peter Norvig
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : दोन उत्कृष्ट मार्गदर्शक
brahmos missile
यूपीएससी सूत्र : भारतीय नौदलाकडील ब्राम्होस क्षेपणास्त्र अन् देशातली पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा, वाचा सविस्तर…

उदाहरणार्थ यंदाच्या जानेवारीपासून करोनाबाबत लहानमोठे असे किमान ७०० विविध पाहण्या/संशोधन प्रबंध लिहिले गेले आहेत. यातील अनेकांच्या मुळाशी एकच मुद्दा आहे. या विषाणूतल्या नक्की कोणत्या रेणूंमुळे तो जीवघेणा ठरतो आणि असे कोणते रेणू की ज्यामुळे या विषाणूवर उपाय ठरतो. हा तपशील समजून घेणे फार महत्त्वाचे. कारण त्यातच दडले आहे करोनामुळे व्यक्तिगणिक बदलत जाणाऱ्या भिन्न प्रतिसादाचे इंगित. समप्रदेशी समवयस्कदेखील करोनाबाधेस भिन्न प्रतिसाद देतात. काहींचे शरीर त्याचा सहज मुकाबला करते तर काहींना प्राणवायू देण्याची वेळ येते. हे असे का होत असावे? जगातील अनेक वैद्यकसंशोधकांना हा प्रश्न भेडसावतो आहे.

न्यूयॉर्क राज्यातल्या कोल्डस्प्रिंग येथील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत काम करणारा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ जेसन शेल्ट्झर आणि गूगलमधे काम करणारी जोडीदार संगणक अभियंता जोआन स्मिथ हे या प्रश्नाच्या उत्तरात बरेच पुढे गेले. एकच विषाणू, त्याची बाधाही एकच. तरी त्यामुळे माणसामाणसांच्या बाधेत इतका फरक का.. या प्रश्नाच्या उत्तरात त्यांना एका किण्वकाचा.. म्हणजे एन्झाईम.. शोध लागला. ACE2 हे त्याचे नाव. म्हणजे ‘अँजिओटेंसिन कनव्हर्टिग एन्झाईम २’. हे एक प्रकारचे प्रथिन असते आणि मानवी शरीरातील पेशींच्या भिंतीवर त्याचा मुक्काम असतो. नाकाच्या आतील श्लेष्मल त्वचा, हृदय, फुप्फुस अशा सर्वच ठिकाणच्या पेशींच्या भिंती या ACE2चे घर. आपल्याला होणाऱ्या वेगवेगळ्या इजा बऱ्या होताना, भाजणे/कापणे असे काही घडल्यानंतर त्या भागाची बरे होण्याची सुरुवात, सूज आली असेल तर ती उतरायला मदत, रक्तस्राव झाला असेल तर रक्त गोठवायला मदत.. अशा अनेक ठिकाणी हे प्रथिन आपल्यासाठी जीवरक्षकाची भूमिका निभावते. या ACE2 मुळे त्या परिसरात अँजिओटेंसिन या दुसऱ्या पण विनाशक अशा प्रथिनाच्या प्रसारास अटकाव केला जातो. या अँजिओटेंसिनमुळे रक्तदाब वाढतो आणि स्थानिक पेशींना इजा होते. ACE2 हे सर्व रोखते. तेव्हा हे किण्वक आपल्या आरोग्यतेसाठी अत्यंत महत्त्वाचे.

पण करोनाचा विषाणू नेमका याच किण्वक/प्रथिनास घायाळ करतो. करोना विषाणूच्या पृष्ठभागावर प्रथिनाचे ‘भाले’ असतात जे पेशींवरच्या ACE2 ला सर्वप्रथम जायबंदी करतात. त्यानंतर ही विषाणूची हल्लेखोर प्रथिने आपल्या पेशीत प्रवेश करतात. एकदा का आपल्या पेशीत त्यांचा प्रवेश झाला की हा विषाणू आपल्या प्रथिननिर्मिती यंत्रणेवर ताबा मिळवतो.

ही प्रक्रिया म्हणजेच करोनाचे इन्फेक्शन..बाधा.. होणे. ही बाधा झाली की हा करोना विषाणू आपल्या शरीरात स्वत:ची प्रतिरूपं तयार करू लागतो आणि शरीरभर बागडायला सुरुवात करतो. मग परिणाम अर्थातच माहितीतला.. आपण आडवे! ज्याच्या पेशी पृष्ठभागावर जास्त ACE2 त्याला करोनाचा जास्त धोका, असे हे साधे समीकरण. यात त्यांनी आणखी संशोधन केल्यावर दोन मुद्दे अधिक ठळक दिसू लागले. एक म्हणजे जे लठ्ठ असतात ते आणि धूम्रपानाचे व्यसन असलेले यांना करोना अधिक त्वेषाने छळतो. त्याची कारणेही या संशोधनात आढळली. लठ्ठ असतात त्यांच्या शरीरातील पेशींवरच्या चरबीत ही किण्वके मोठय़ा प्रमाणावर आढळली. जे धूम्रपान करतात त्यांच्या फुप्फुसातील त्वचेच्या आतल्या भागात एक द्राव असतो ज्याकडे करोना विषाणू मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होतो. याचे कारण या दोघांनी असे दिले की धूम्रपानातून निकोटिन आदी जी घातक द्रव्ये फुप्फुसात जातात त्यांच्यापासून आतील श्लेष्मल त्वचेचे रक्षण व्हावे यासाठी मोठय़ा प्रमाणावर आतून ACE2 जमा होते. आणि जास्त ACE2 म्हणजे जास्त करोनाबाधा.

आता यावर ACE2 कमी करणारी औषधे घ्यायची असा एक मार्ग काहींना सुचू शकेल. पण तसेही करणे धोक्याचे. कारण त्याचे म्हणून काही वेगळे परिणाम होत असतात. ‘वायर्ड’ वेबसाइटच्या एका प्रदीर्घ लेखात या सगळ्याची विस्तृत चर्चा उभयतांनी केली आहे.

मुद्दा या लेखात काय लिहिले आहे आणि काय सुचवले आहे हा नाही. तर अशा विविध दिशांनी करोनावर किती जण संशोधन करीत आहेत हा आहे. आपल्यासारखा देश तर यासाठी उत्तम प्रयोगशाळा. पण असे काही संशोधन आपल्याकडे कोणी करतो आहे का? या विषाणू बाधेने आजारी बरेच आहेत. त्यांना बरे करण्याचे प्रयत्नही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. पण तशातही यावर संशोधन करणाऱ्यांमुळे शास्त्र पुढे जाते.

@girishkuber