02 March 2021

News Flash

दिवाळी उत्सव विशेष :  महती गाईची  वसुबारस 

रांगोळीतही गोपद्म काढताना गाईची आठवण ठेवली जाते.

प्रा. उदयकुमार पाध्ये

गायीला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्व दिले गेले आहे. शेतीसाठीचे तिचे महत्व लक्षात घेता के वळ सामान्य पशू म्हणून तिची गणना न करता तिला गोमाता मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गोमय आणि गोमूत्र यांचा खत म्हणून वापर के ला जातो. रांगोळीतही गोपद्म काढताना गाईची आठवण ठेवली जाते.

अज्ञानरूपी अंधकाराचा समूळ नाश करून ज्ञानाच्या प्रकाशाने मानवी जीवन उजळून आनंद व सौख्य याची प्राप्ती करून देणारा भारतीयांचा अत्यंत आवडता सण म्हणजे ‘दीपावली’ होय. आपल्यापैकी खूप थोडय़ा लोकांना या सणाचे खरे स्वरूप माहिती असते.   दीपावलीची सुरुवातही ‘गोवत्सद्वादशी’ म्हणजेच ‘वसुबारस’ या सणापासून होते. या दिवशी चंद्राच्या स्थितीनुसार सकाळी व सायंकाळी ‘सवत्सधेनू’ वासरासकट गाईची पूजा करतात व प्रार्थना म्हटली जाते:-

तत: सर्वसये देवी सर्वदेवैलंकृते।

मातर्माभिलषितं सफलं कुरू नन्दिनी।।

सर्वाठायी असणाऱ्या व सर्व देवांना अलंकृत करणाऱ्या अशा गोमाते (नन्दिनी) तू माझे मनोरथ पूर्ण करावेत. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ तसेच गाईचे दूध, तूप इ. भक्षण करावयाचे नसतात व गाईला मात्र उडदाचे वडे/ भात/ गोड पदार्थ खाऊ घालतात व दीपोत्सवाची सुरुवात होते.

आर्य संस्कृतीत गाईचे स्थान अग्रणी असून गोमातेला पृथ्वीचे प्रतीक मानले गेले आहे व तिला ‘गावो विश्वस्य मातर:’ म्हणजे विश्वाची जननी मानले गेले आहे. आपल्या पूर्वजांना गाईचे वैज्ञानिक महत्त्व माहीत होते व तिची उपयुक्तताही माहीत होती. गाईच्या संख्येवर ‘गोधन’ संपन्नता मोजली जात असे. एवढंच नव्हे तर अनेक तीर्थक्षेत्रांची नावे, गोत्रे, ऋषी, उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, नद्या, पर्वत, इशविग्रह, सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारकासमूह, संपूर्ण विश्व, वनस्पती, धान्य एवढेच नव्हे तर अनेक उपकरणांची नावे ही ‘गो’ शब्दाच्या वेगवेगळ्या रूपाने अलंकृत आहेत.  ऋषिमुनींनी संपूर्ण गोवंशाला देवत्व बहाल केले व त्याला वंद्य, पूजनीय व अवध्य मानले होते. ऋग्वेदात गोसूक्ति म्हणून ज्या ऋचा आहेत त्यात गोमातेची महती, निरपराधित्व व उपयुक्तता सांगून गोघृताचे तर ‘अमृत’ असे वर्णन केले आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्व व अत्युच्च स्थान दिले गेले आहे.  महर्षी दयानंद सरस्वतींच्या म्हणण्यानुसार गाय आपल्या आयुष्यात ४१,०४४० एवढय़ा मानवांचे एकवेळचे भोजन देते.  आपल्या प्राचीन औषधप्रणाली आणि शास्त्रांमध्ये गाईचे दुध, तूप याचा वापर सांगितलेला आहे.  गोवंशाच्या मलमूत्रापासून बनविलेली सेंद्रिय खते व कीटकनाशके झाडांसाठी उपयोगी ठरतात. प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रात तसे वास्तुशास्त्रातही गाईच्या उपयुक्ततेचा विचार केला गेला आहे. अशा अत्यंत उपयुक्त अशा गोवंशाचे रक्षण व वृद्धीसाठी पोळा/ कारदुणवी आणि वसुबारस यासारखे सण हे खूप महत्त्वाचे ठरतात.

अशी केली जाते वासुबारस पूजा

दूधदूभत्या जनावरांची गंध, कुंकूम, अक्षता वाहून पूजा केली जाते. सुगंधी फुलांचा हार घालून गायीला अघ्र्य दिले दाते. तांब्याच्या कलशातले ताज्या पाण्याचे अघ्र्य वासराच्याच्या पायांवर सोडले जाते. त्यानंतर पुरणपोळी किंवा गोडाचा नैवैद्य् त्यांना दिला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 2:49 am

Web Title: diwali festival 2020 article two zws 70
टॅग : Diwali
Next Stories
1 दिवाळी उत्सव विशेष :  आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या अंघोळी
2 ‘अर्ध्या कोयत्या’चे आरोग्य..
3 राजकीय पार्श्वभूमीवरची प्रेमकथा “कारभारी.. लय भारी” ..!
Just Now!
X