दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com
कालौघात त्या-त्या भौगोलिक भागाची ओळख असणारे सत्त्वयुक्त वाण आता नामशेष होऊ  लागले आहेत. या परिस्थितीत देशी वाणांना पुन्हा पहिल्यासारखे स्थान देण्यासाठी काही शेतकरी पुढे सरसावले आहेत. करवीर तालुक्यातील परिते गावातील डॉ. सूर्याजी पाटील यांनी जपलेल्या भात वाणाची अशीच कहाणी..

कृषी क्षेत्रामध्ये झपाटय़ाने बदल होत आहेत. कमी कालावधीत अधिक उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे. संकरित बियाण्यांचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा हा काळ. याचवेळी देशी वाणाकडे मात्र दुर्लक्ष होत चालले आहे. वास्तविक देशी वाण आरोग्यदायी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. असे चित्र एकीकडे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरांनी मात्र भात पिकाच्या देशी जातीचे संवर्धन करण्याचे व्रत जोपासले आहे. स्वत: देशी वाणाचे भात पीक घेतानाच अन्य शेतकऱ्यांनाही देशी वाणाचे बियाणे देऊ न भात उत्पादन करण्यावर त्यांनी भर दिला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊ स हे मुख्य पीक. पण पश्चिमेकडील भागांमध्ये भाताचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. या भागात पावसाचे प्रमाण मुबलक असल्याने त्याचा भात पिकासाठी मोठा उपयोग होतो. अलीकडे शासकीय पातळीवर भाताच्या सुधारित जातीपासून उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे. याकडे शेतकऱ्यांचा कलही वाढला आहे. कमी काळात अधिक उत्पादन मिळत असल्याने ते शेतकरम्य़ांना भावत आहे. भाताचे विविध संकरित व जादा उत्पादन देणारे वाण आल्याने शेतकरी त्याकडे वळला आहे. मात्र देशी वाण दुर्लक्षित राहत आहेत. त्यापासून उत्पादित भात सत्त्वयुक्त, आरोग्यदायी असल्याने त्याचे उत्पादन करणारा वर्गही काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. कालौघात त्या-त्या भौगोलिक भागाची ओळख असणारे सत्त्वयुक्त भातवाण नामशेष होऊ  लागले आहेत. या परिस्थितीत देशी वाणांना पुन्हा पहिल्यासारखे स्थान देण्यासाठी काही शेतकरी पुढे सरसावले आहेत. करवीर तालुक्यातील परिते गावातील डॉ. सूर्याजी गणपत पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे.

भात हे पूर्वापार खाद्यान्नांपैकी एक असून ते जगातील निम्म्याहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे. भारतातील जवळजवळ ७५ टक्के लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो. उत्खननातील पुरावे व प्राचीन वाङ्मयातील उल्लेख यांवरून भारतातील भाताची लागवड फार पुरातन आहे, हे सिध्द होते. विशेषत: दक्षिण भारतात भाताची उत्पत्ती झाली असावी, असे अनुमान आहे. भातशेती विषयी डॉ. पाटील यांची काही निरीक्षणे आहेत. हल्ली संकरित बियाणांची चलती आहे. असली तरी दुसरीकडे सेंद्रिय तांदुळाची शेती वेग धरत आहे. विशेषत: शहरी भागातील लोक तांदुळाचा आकार, रंग ह्यकडे खास आकर्षित होतात. बाजारात अशा तांदुळाची मागणी नसल्यामुळे शेतकरी देखील अशा पारंपरिक वाणाचे पीक घेण्यास नाखूश असणारा मोठा वर्ग आहे. बाजारातील प्रसिद्ध, चमकदार तांदुळाच्या वाणापेक्षा पारंपरिक वाणामध्ये अधिक पोषणतत्त्व आणि आरोग्यास लाभदायक गुणतत्त्व आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्यांना सेंद्रिय शेती हा एक प्रचलित शेतीला खात्रीलायक पर्यायम् वाटत आहे. त्यातील बहुतांश वाणांची लागवड, त्याची उत्कृष्ट चव, खमस वैशिष्टय़े, अवर्षण शोषकता, रोग प्रतिकारकता, क्षार प्रतिरोधकता आदी बाबतची तग धरण्याची ताकद, आरोग्य विषयक फायदे यामुळे डोंगरी भागातील खेडय़ांमध्ये याची लागवड केली जात आहे. अशा औषधीपूर्ण असलेल्या पारंपरिक प्रजातीच्या तांदुळाला बाजारपेठ मिळवणे हे एक आव्हानच आहे. मात्र देशी वाणाच्या भाताचे उत्पादन कमी असले तरी त्याला मिळणारा दर अधिक असल्याने ते फायदेशीर आहे, असे डॉ. पाटील सांगतात.

डॉ. सूर्याजी पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. मुळाक्षरे गिरवतानाच त्यांचे हात मातीने माखले. घरची तेरा एकर शेती ते वडिलांसोबत कसायचे. शेतीकडे लक्ष किती? तर दहावीच्या परीक्षेवेळी उसाला खताची मात्रा देऊन तासाभरात त्यांनी शाळा गाठली होती. याचमुळे शेती त्यांना कष्टप्रद वाटली नाही. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सन १९८५ मध्ये आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी परिते येथे व्यवसायास सुरूवात केली. वैद्यकी करतानाच त्यांनी शेतीशी जडलेली नस कायम राखली. आयुर्वेदिकचे ज्ञान असल्याने स्वाभाविक देशी वाणांचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळे भाताचे पीक घेताना देशी वाण जाणीवपूर्वक निवडले. भावी काळात देशी वाणांच्या संवर्धनाची आवश्यकता भासणार हे विचारात घेऊनच त्यांनी भाताच्या पारंपरिक देशी जाती जतन करण्याचा निर्णय घेतला.

आपली निवड कथन करताना डॉ. पाटील म्हणाले,की घरी शेतीवाडी बरी होती. त्याची मुळातच आवड होतीच. मुख्य म्हणजे आमच्याकडे भाताच्या पारंपरिक देशी जाती लावल्या जात असत. त्याचा ठसा मनात उमटला होताच. त्यामुळे सुधारित भात खाताना त्यात ती मजा जाणवायची नाही. म्हणून जुन्या जाती शोधून लागवड करण्याचे ठरवले. जिल्ह्याच्या दुर्गम भागांचा दौरा करताना दुर्मीळ जाती मोजण्याइतकेच शेतकरी लागवड करतात हे लक्षात आले. जिल्ह्यातील काही वाण निवडायचे ठरवले. आजरा भागात काळी गजरी अन् काळा जिरगा, याच तालुक्यातील चंपाकळी, कोल्हापूर जवळच्या गिरगावमध्ये जोंधळा जिरगा या जाती मिळविल्या. बंगळूरूला जाऊ न काही वाण शोधले. तेथे मोठय़ा आकाराचा वाण गवसला. काळी गजरी वाणही मिळाल्याने त्याचेही संवर्धनही केले आहे.

भाताच्या देशी वाणांची लागवड सेंद्रिय पद्धतीने करावी लागते, अन्यथा त्यांचा पौष्टिकपणा राहात नाही, असे प्रयोगानंतर डॉ. पाटील यांना आढळले. दरवर्षी दीड – दोन एकरांवर ते देशी वाण लावतात. त्यांना खत देताना लेंडी खतासाठी १५ दिवस बकरी शेतात बसवितात. ४०० बकऱ्यांच्या कळपास दिवसाला ३०० रुपये खर्च येतो. ५०० किलो गांडूळ खत, प्रति ट्रॉली ५०० रुपये दराने ५० गाडय़ा शेणखत शेतात मिसळतात. सेंद्रिय खतावर साधारणपणे १५ हजार रुपये खर्च होतात. देशी बियाणे घेतलेल्या शेतात काढणीनंतर ऊ स घेतला जातो, तो निडव्यापर्यंत ठेवतात. रासायनिक खतांचा अत्यल्प वापर होतो. चौथ्या वर्षी पुन्हा लेंडी खत, सेंद्रिय खत, गांडूळ खत देऊ न शेतात पुन्हा देशी भात लावला जातो.

देशी वाणाचे भात औषधी म्हणून परिचित आहेत. देशाच्या विविध भागात अशा अनेक जाती आहेत. ‘नवारा’ नावाचं एक वाण संधिवात आणि सांधेदुखीवर उपयुक्त आहे. ‘करिगीजिविली आंबेमोहोर’ तांदूळ बाळंतिणीचं दूध वाढण्यासाठी वापरला जातो. ‘सन्नकी’ नावाचं वाण लहान मुलांमधल्या जुलाबावर उपकारक आहे तर ‘महाडी’ नावाचा भात हाडं मोडली असली तर प्राण्यांना खाऊ  घातला जातो. याचा अभ्यास करून डॉ. पाटील यांनी आपल्या भागातील वाण निवडले. काळी गजरी, काळा जिरगा, हावळा, जोंधळा जिरगा या जाती औषधी भाताचे पीक घेतले. ते क्षयरोगी, अशक्तपणा असणारम्य़ांना, बाळंतिणीस पत देण्यासाठी, दीर्घ मुदतीच्या आजारी रुग्णांना या जातींचा तांदूळ उपयुक्त आहे. या जातींत विविध जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम यांचे प्रमाण अन्य वाणांपेक्षा अधिक आहे. हा भात पचनास हलका, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. त्यात साखरेचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आदी विकार असणारम्य़ांना हा भात उपयुक्त आहे.

संकरित जाती उपलब्ध झाल्यापासून एक मोठा फरक पडला आहे. कमी काळात अधिक उत्पादन हे त्याचे साधारण स्वरूप आहे. याउलट देशी वाणांची उत्पादकता कमी आहे. सेंद्रिय पद्धतीने भात लागवड करून एकरात सुमारे १५ क्विंटल उत्पादन डॉ. पाटील घेतात. आज या भातास प्रतिकिलो ६०-७० रुपये किलो इतका भाव आहे. सीमाभागात असलेल्या पण मुंबईत वास्तव करणारम्य़ा एका व्यक्तीने तर काळा जिरगा तांदूळ २५० रुपये किलो दराने खरेदी केला होता. त्यांनी तो अमेरिकेतील नातलगांना पाठवला होता. थोडा थोडा शेजारम्य़ांना वाटला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी फोन करून आवर्जून आवडल्याचे कळवले. हा हिशेब गृहीत धरता संकरित बियाण्याच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरते. सुवासिक, औषधी, खोल पाण्यात तग धरणारी, क्षार प्रतिरोधक आणि कोरडवाहू शेतीमध्ये येणाऱ्या अशा विविध वाणांचे संरक्षण व वाढ करीत आहेत. ही एक सुरुवात आहे. अधिकाधिक जनतेमध्ये सेंद्रिय अन्न आणि स्थानिक धान्याचा आहारात वापर जास्त पटीने वाढविणे हे मुख्य ध्येय आहे.जगभरात पारंपरिक अन्नधान्याकडे  कल वाढम्त आहे. आम्हीसुद्धा तसा बदल आमच्या भागात घडवून आणण्यासाठी काम करीतआहे. त्यासाठी अनेक शेतकरम्य़ांना देशी वाण पुरवतो. त्यांनी ते स्वीकारले आहे. अनेक गावात देशी वाणाचा हिरवागार, सुवासिक भात पिकतो. देशी वाणातील फसवेगिरी हाही चिंतेचा विषय आहे. सामान्य ग्राहकांना देशी वाणाचे भात ओळखता येत नाही. त्याचा गैरफायदा उचलला जातो. अधिकचे मोल मोजूनही पदरी निराशा येते. या प्रवृत्तीला पायबंद घालण्याची गरज डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

स्थानिक वाणांचे संवर्धन कौतुकास्पद

भारतात मोठी जैवविविधता आहे. पिकांच्या १६० देशी प्रजाती आहेत. संकरित वाणांसाठीही जंगली वाणांची गरज भासते. असे ३४० जंगली वाण भारतात आहेत. अलीकडे या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक वाणांचे उत्पादन कमी असल्याने त्यांची लागवड शेतकरी करत नाहीत. झपाटय़ाने बदलणारम्य़ा जगात स्थानिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या डॉ. सूर्याजी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी हा आदर्श घेऊ न काही क्षेत्रावर पारंपरिक वाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे.

डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ