News Flash

भूगोल बदलणाऱ्या भिंतीची गोष्ट

एखादी घटना इतिहास घडवते. जगाच्या इतिहासात अशा अनेक घटना आहेत, की ज्यांनी इतिहास घडवला.

| November 9, 2014 05:13 am

एखादी घटना इतिहास घडवते. जगाच्या इतिहासात अशा अनेक घटना आहेत, की ज्यांनी इतिहास घडवला. त्याचबरोबर अशाही काही घटना आहेत, की ज्यांनी इतिहास तर घडवलाच शिवाय भूगोलही बदलला. यातील गेल्या २५ वर्षांतील दोन ठळक घटना म्हणजे बर्लिनची भिंत पाडून झालेले जर्मनीचे एकत्रीकरण व सोव्हिएत रशियाचा अस्त. या दोन्ही घटनांनी युरोपचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले. बर्लिनची भिंत पडण्याच्या घटनेला आज बरोब्बर २५ र्वष पूर्ण होताहेत. पश्चिम आणि पूर्व जर्मनी यांच्या एकत्रीकरणातून उदयाला आलेले जर्मन प्रजासत्ताक.. अर्थात बुंदेसरिपब्लिक डॉइशलँड!
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून नाझींचा पराभव झाला आणि हिटलरच्या जर्मनीची फाळणी झाली. हे राष्ट्र चार तुकडय़ांत विभागले गेले. एकेका भागावर एकेका विजेत्याचा कब्जा. पुढे फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका या दोस्तांच्या नियंत्रणाखाली असलेला भाग म्हणजे पश्चिम जर्मनी आणि साम्यवादी रशियाच्या आधिपत्याखाली असलेला भाग पूर्व जर्मनी अशी सरळसरळ विभागणी करण्यात आली. बíलन ही जर्मनीची राजधानी. ती नेमकी साम्यवादी रशियाच्या आधिपत्याखाली येत होती. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रांची प्रमुख कार्यालयेही बíलनमध्येच होती. त्यामुळे युद्धोत्तर काळात बíलनचीही फाळणी झाली. फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका यांच्या नियंत्रणाखाली पश्चिम बíलन आणि रशियाच्या आधिपत्याखाली पूर्व बíलन. या दोन्ही बाजूंना विभाजित करण्यासाठी एखादी सीमारेषा असावी, पश्चिमेकडून पूर्वेकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे जाऊ इच्छिणाऱ्या जर्मनांना पायबंद घातला जावा यासाठी िभतीची कल्पना पुढे आली. लोकशाही जर्मन प्रजासत्ताकाचा (पूर्व जर्मनी) प्रमुख वॉल्टर उल्ब्रिच यानेच प्रथमत: ही कल्पना बोलून दाखविली. तत्कालीन सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांच्या गळी ती उतरवण्यातही उल्ब्रिच यशस्वी झाले आणि १३ ऑगस्ट १९६१ रोजी बíलनला विभागणारी सीमारेषा बंद करण्यात येऊन चारच दिवसांनी िभतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. vv06भिंतीच्या पलीकडे
प्रत्येक बाबतीत सोव्हिएत रशियाचा सल्ला घेणारे, त्यांच्या कलाने कारभार हाकणारे राज्यकत्रे, साम्यवाद समूळ उखडून फेकण्यासाठीच सारे जण टपलेले आहेत या पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणारे त्यांचे स्तासी हे गुप्तचर पोलीस, दिशाहीन अर्थव्यवस्था, सामंजस्याचा अभाव यामुळे पूर्व जर्मनीचा विकास खुंटला. औद्योगिक उत्पादनाने तळ गाठला, रोजचे जीवनमान कंठताना सामान्यांच्या नाकीनऊ येऊ लागले. याच्या उलट पश्चिम जर्मनीचे. भांडवलशाही असल्यामुळे मुक्त आíथक धोरण, औद्योगिक वाढीला पोषक वातावरण, उद्योग-शेती-आरोग्य सुधारणांना मुक्त वाव यामुळे पश्चिम जर्मनीचा विकास झपाटय़ाने झाला. त्यामुळे चांगल्या जीवनाच्या आशेने अनेक पूर्व जर्मन नागरिक पश्चिम जर्मनीत स्थलांतरित होऊलागले. साम्यवादी राजवटीला हे लांच्छनास्पदच. साम्यवादी राज्यकर्त्यांची लाज काढणारा हा प्रकार. त्यामुळे पूर्व जर्मनीने अशा स्थलांतराविरोधात कडक पावले उचलली. तरीही लोक अगदी जिवावर खेळून िभत ओलांडू पाहातच होते. अशा प्रयत्नात तब्बल १३६ जणांना प्राण गमवावे लागले. अनेकांनी पोलंड, हंगेरीमाग्रे देशांतर करत पिचलेल्या अर्थव्यवस्थेतून स्वत:ची सुटका करून घेतली. पश्चिम जर्मनीच्या बाजूला असलेल्या िभतीवर विविध ग्राफिटी असायच्या, तर पूर्वेकडील भिंत रूक्ष, निर्जीव, जणू साम्यवादी विचारसरची द्योतकच. यातूनच दोन्हीकडील सामाजिक-राजकीय परिस्थिती अधोरेखित होत होती. जे जे नको ते ते िभतीच्या पलीकडे फेकून देण्याचे प्रकार पश्चिम जर्मनीचे नागरिक करत असत.
बदलाचे वारे
पूर्वेकडील जनतेतील वाढता असंतोष, सोव्हिएत रशियाची होत असलेली पीछेहाट, तेथील सर्वशक्तिमान कम्युनिस्ट पक्षात होत असलेला नेतृत्वबदल या वातावरणातच मिखाइल गोर्बाचेव्ह यांची १९८८ मध्ये सोव्हिएत रशियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आल्याआल्याच त्यांनी मुक्त धोरण (ग्लासनोस्त) आणि पुनर्रचना (पेरेस्त्रोइका) यांची घोषणा केली आणि खुद्द साम्यवादी रशियातच बदलाचे वारे वाहू लागले. ते अर्थातच पूर्व जर्मनीपर्यंत पोहोचले. भेदाभेद अमंगळ असल्याची भावना पूर्व जर्मनीत दृढ होऊ लागली आणि िभतीमुळे दुरावलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी आतुरलेले, आíथक हलाखीकडून सुबत्तेकडे जाऊ पाहणारे, असंतुष्टतेकडून तृप्तीकडे जाण्यास उत्सुक असलेले.. यांच्या झुंडी रोज िभतीवर धडका मारू लागल्या.. त्यातच ९ नोव्हेंबर १९८९च्या संध्याकाळी पूर्व जर्मनीतील सत्ताधारी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य गुंथेर शाबोवस्की यांनी पूर्व जर्मनांना िभत ओलांडून पलीकडे जाण्याची परवानगी देण्यात येईल, ही घोषणा (चुकीने!) भर पत्रकार परिषदेत केली आणि थोडय़ाच वेळात बॉनहोमर रस्त्यावर िभतीच्या अलीकडे व पलीकडे शेकडय़ामध्ये असलेली लोकांची गर्दी मोठय़ा जनसागरात ्नरूपांतरित झाली. ‘ओपन द गेट, ओपन द गेट’च्या घोषणा तारस्वरात येऊ लागल्या. परिस्थिती हाताळायची कशी याबाबत गोंधळ निर्माण झाला. सरकारातील वरिष्ठांमध्ये एकवाक्यता नव्हती. जनरोष वाढत चालला होता. अखेरीस हॅराल्ड जॅगर या रक्षकाने काही लोकांना िभतीच्या पलीकडे जाऊ देण्यासाठी िभतीचे दरवाजे, बॅरिकेड्स उघडले आणि जनांचा प्रवाह पुढे सरकला.. पुढचा सारा ज्ञात इतिहास आहे! ९ नोव्हेंबरच्या रात्री बíलनची िभत कोसळली/पाडली, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात िभत पडली ती ऑक्टोबर, १९९० मध्ये आणि मग जर्मनीचे खऱ्या अर्थाने एकत्रीकरण होऊन एकसंध बुंदेसरिपब्लिक डॉइशलँड अस्तित्वात आले!vv05सद्य:स्थिती
एकत्रीकरणानंतरची काही वष्रे जर्मनीला अंमळ जडच गेली, कारण पूर्व जर्मनीच्या पूर्णपणे फसलेल्या अर्थव्यवस्थेचा बोजा पश्चिमेवर पडला होता. त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागली होती. १९९० च्या मध्यापर्यंत तर जर्मनी अर्थव्यवस्थेचा प्रवास अधोगतीकडे सुरू झाला होता. राष्ट्रीय सकल उत्पादनात कमालीची घट झाली होती. पूर्व जर्मनीच्या भारामुळेच ही परिस्थिती ओढवल्याची तीव्र भावना निर्माण होऊ लागली होती. बेरोजगारांचे तांडे शहराशहरांत फिरायला लागले होते. बँका बुडीत खात्यात जाऊ लागल्या होत्या. औद्योगिक उत्पादन मंदावले होते. त्यामुळे एकत्रीकरणाचे हिरो मानले गेलेले चॅन्सेलर हेल्मट कोल आता खलनायक ठरू लागले. या नकारात्मक वातावरणातच १९९८ मध्ये जर्मनीत सार्वत्रिक निवडणुका होऊन कोल यांची १७ वर्षांची राजवट संपुष्टात आली. त्यांच्या जागी आलेल्या जेरार्ड श्रॉडर यांच्या सरकारने मोठय़ा प्रमाणावर आíथक सुधारणा हाती घेत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. त्याची फळे गेल्या दशकभरात निदर्शनास येऊ लागली आहेत. आज युरोपीय समूहातील सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या इंग्लंडची अर्थव्यवस्था बिकट आहे. त्या तुलनेत जर्मनीची अर्थव्यवस्था भरभक्कम मानली जात आहे. vv04युरोपच्या आíथक वाढीस जर्मनीचा हातभार जास्त प्रमाणात लागत आहे. २००८ पासून जर्मनीच्या अर्थव्यवस्थेने जो वेग घेतला आहे तो पाहता युरोझोनच्या प्रगतीत जर्मनीचा सिंहाचा वाटा आहे. आíथक मंदीचे मळभ असतानाही युरोझोनने औद्योगिक उत्पादनात चांगली प्रगती केली आहे, ती केवळ जर्मनीच्या बळावर, असे निरीक्षण प्राइसवॉटर कूपरहाऊसने मांडले आहे. साम्यवादी राजवटीत वाढलेल्या/ राहिलेल्या पूर्व जर्मनीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पश्चिम जर्मनीने अथक परिश्रम घेतले. त्याचेच हे फळ आहे.२५ वर्षांपूर्वी असलेले पूर्व जर्मनीचे सकल उत्पादन आता दुपटीच्याही पुढे आहे.
बíलनची िभत पडल्यानंतर इंग्लंडच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर म्हणाल्या होत्या, ‘‘आम्ही जर्मनांचा दोनदा पराभव केला, आता ते पुन्हा परतले आहेत.’’ अर्थात थॅचरबाईंनी पुन्हा एकदा युरोपात जर्मनी वरचढ ठरण्याच्या भीतीने वरील वक्तव्य केले होते. एकत्रीकरणानंतर जर्मनीने साधलेली प्रगती पाहता थॅचरबाईंचे शब्द जर्मनांनी खरे ठरवले आहेत..
v08बर्लिनची भिंत पडल्याच्या घटनेची दखल घेत लंडनच्या ‘द डेली टेलिग्राफ’ या दैनिकाने १० नोव्हेंबर १९८९ रोजीच्या अंकात ‘पोलादी पडदा दूर झाला..’ असा ठळक मथळा केला होता.

साम्यवादाची भिंत
१९६१ मध्ये बíलनमध्ये बांधण्यात आलेली िभत पुढे साम्यवादाची िभत म्हणून ओळखली जाऊ लागली. तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि सर्व जगाचा पोलीस बनू पाहणारी अमेरिका यांच्यात तोपर्यंत जगाच्या नियंत्रणावरून शीतयुद्ध सुरू झाले होते. साम्यवादी रशियाच्या विघटनानंतरच या शीतयुद्धाची अखेर झाली. १९९१ मध्ये रशियन साम्राज्याचा अस्त झाला.
१३ ऑगस्ट १९६१
भिंत बांधण्याचा निर्णय १३ ऑगस्ट १९६१ रोजी झाला आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली.
vv03९ नोव्हेंबर  १९८९
रोजी भिंत पाडण्याचा निर्णय झाला. मात्र, प्रत्यक्षात भिंत पडली ऑक्टोबर, १९९० मध्ये.
vv02vv01
‘या ठिकाणी बर्लिनची भिंत होती..’ बर्लिनमध्ये जेथे भिंत होती तेथे ही स्मृतिपट्टिका लावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2014 5:13 am

Web Title: geography changing the berlin wall
Next Stories
1 मागील पाने फाडू नयेत..
2 कामगार कायद्यातील सुधारणा घातकच
3 मातीत रमणारा अभिनेता!
Just Now!
X