09 July 2020

News Flash

‘आयसीटी’ची भरारी..

वेब ऑफ सायन्सनुसार आयसीटी क्रमांक १वर असून आयसीटीचा नॉर्मलाइज्ड सायटेशन इंडेक्स सर्वाधिक असा ०.९८ आहे.

रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी)ची स्थापना दि. १ ऑक्टोबर, १९३३ रोजी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी) म्हणून मुंबई विद्यापीठाअंतर्गत झाली. मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून कार्यरत असताना संस्थेने आपली एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. टीईक्यूआयपीअंतर्गत या संस्थेस २००४ साली संपूर्ण स्वायत्तता प्रदान करण्यात आली आणि यूजीसी अधिनियम १९५६, अनुच्छेद ३ अंतर्गत एमएचआरडीद्वारे १२ सप्टेंबर, २००८ रोजी अभिमत विद्यापीठ जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या संस्थांच्या बरोबरीच्या असलेल्या या संस्थेच्या कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र शासनाने २० एप्रिल, २०१२ रोजी सदर संस्थेस आयआयटी, आयआयएससी आणि आयआयएसईआरच्या समकक्ष एलिट स्टेटस आणि सेंटर ऑफ एक्सलंस प्रदान करण्यात आले. वेब ऑफ सायन्सनुसार आयसीटी क्रमांक १वर असून आयसीटीचा नॉर्मलाइज्ड सायटेशन इंडेक्स सर्वाधिक असा ०.९८ आहे.

आयसीटी, मुंबई हे मुंबईमध्ये १६ एकर जागेवर वसलेले असून येथे ९ पदवी (केमिकल इंजिनिअरिंग; केमिकल टेक्नॉलॉजीच्या ७ शाखा; १ फार्मसी), १८ पदव्युत्तर (९ आंतरविद्याशाखीय) आणि २९ पीएच.डी. अभ्यासक्रम (११ आंतरविद्याशाखीय), डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केमिकल टेक्नॉलॉजी व्यवस्थापनातील १ पदव्युत्तर पदविका आणि सर्व मास्टर्स विद्यार्थ्यांसाठी केमिकल सेफ्टी आणि रिस्क मॅनेजमेंटमधील १ पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतात. राज्य शासनाने मंजूर केलेल्या अभिमत विद्यापीठ या संकल्पनेच्याही पलीकडे जाणाऱ्या विशेष दर्जानुसार आयसीटीचे कामकाज चालते. उच्च शैक्षणिक दर्जा (४ पैकी ३.७७ सीजीपीए सह ए++ नॅक श्रेणी) राखलेल्या आयसीटीला १२ फेब्रुवारी, २०१८ रोजी यूजीसीने कॅटेगरी क अभिमत विद्यापीठ जाहीर केले.

३ एप्रिल, २०१८ रोजी एका कार्यक्रमात आयसीटीला भारत सरकारचे तात्कालीन माननीय मनुष्यबळ व विकासमंत्री श्री. प्रकाशजी जावडेकर यांचे हस्ते एमएचआरडीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)द्वारे स्थापित करण्यात आलेले सर्वात प्रतिष्ठित मूल्यांकन पारितोषिक प्रदान करण्यात आले. आयसीटीला भारतातील सर्वोत्कृष्ट असलेल्या १० अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असण्याचा आणि भारतातील सर्वोत्कृष्ट अशा विद्यापीठांपैकी १९व्या क्रमांकावर असण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे. या वर्षी टाइम्स रँकिंग (टीएचई)च्या वर्ल्ड रँकिंग कॅटेगरीमध्ये आयसीटीचा समावेश करण्यात आलेला आहे, भारतात ७व्या क्रमांकावर आणि आशियामध्ये ९२व्या क्रमांकावर.

२०१८ मधील ब्रिक्स क्यूएस रँकिंगमध्ये आयसीटीने ११८वा क्रमांक पटकावला, तर २०१९ मध्ये सर्व ब्रिक्समध्ये आयसीटी ११५व्या क्रमांकावर होते. क्यूएस एशिया रँकिंगमध्ये आयसीटीने मागील वर्षीच्या १६७व्या क्रमांकावरून १५२व्या क्रमांकावर झेप घेतली आणि २०२० या वर्षी भारतात ते २२व्या क्रमांकावर आहे. एनआयआरएफमध्ये आयसीटी अभियांत्रिकीमध्ये १८वे, फार्मसीमध्ये ४थे, विद्यापीठांमध्ये १८वे आणि सर्वामध्ये ३४वे आहे.

आयसीटीच्या तीनही कॅम्पसमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या संशोधन व नवकल्पना राबविण्यासाठी प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहेत. जेणेकरून तंत्रज्ञान विकसित करता यावे आणि उद्योग क्षेत्रास संशोधन व विकासाचे पाठबळ मिळावे तसेच केमिकल इंजिनीअरिंग, पेट्रोकेमिकल्स, टेक्स्टाइल्स, पॉलिमर्स, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा इ. क्षेत्रात कौशल्य विकास व्हावा. या संस्थेस मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी उच्चशिक्षित व समर्पित शिक्षक, कर्मचारीवर्ग, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी निरंतर कार्यरत आहेत.

पारितोषिके आणि मानसन्मान

* १९ पद्म पुरस्कारप्राप्त..

* २ फेलो ऑफ रॉयल सोसायटी

* ४ फेलोज ऑफ आयएनएसए, ४ फेलोज ऑफ टीडब्ल्यूएएस, ४ जे.सी.बोस फेलोज

* अनेक फेलोशिप – एफएनए, एफएनएएससी, एफएनएई, एफआरएससी, एफटीडब्ल्यूएएस, एमयूएसएई

* ५०० हून अधिक प्रथम पिढी उद्योजक, काही फॉरच्यून ५०० कंपन्यांचे मालक

* केमिकल इंजिनीअरिंगमध्ये संशोधन प्रबंधांमध्ये देशात पहिला, जागतिक स्तरावर  चौथा क्रमांक

* स्कोपस पुरस्कार : भारतातील सर्वोत्तम केमिकल इंजिनीअरिंग शिक्षकांमध्ये ४ शिक्षकांचा समावेश,

* सर्वोत्तम १० रसायनशास्त्र शिक्षकांमध्ये दोघांचा समावेश : २० मार्च २०१८

* मागील वर्षी ४६८ प्रबंध आणि मागील १० वर्षांमध्ये ४०६ पेटंटसाठी अर्ज दाखल.

* अनेक उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित.

आयसीटी मुंबई इंडियन ऑइल ओडिशा कॅम्पस, भुवनेश्वर

१८ मार्च, २०१८ हा दिवस इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी), मुंबईच्या ८४ वर्षांच्या इतिहासातील अनोखा मैलाचा दगड  ठरला. कारण या दिवशी संस्थेने प्रथमच महाराष्ट्र राज्यातून आपले क्षितिज विस्तारत ओडिशा या सुंदर व परोपकारी राज्यात प्रवेश केला. हे आयसीटीचे सौभाग्यच आहे की इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई इंडियन ऑईल ओडिशा कॅम्पस (आयसीटी मुंबई-आयओसी), भुवनेश्वरची मुहूर्तमेढ भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ओडिशाचे राज्यपाल माननीय श्री. एस. सी.जमीर, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री माननीय श्री. धर्मेद्र प्रधान तसेच अनेक मोठे अधिकारी, प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ व नागरिक, उद्योग जगतातील दिग्गज व्यक्ती आणि देशभरातील हितचिंतकांच्या उपस्थितीत रोवण्यात आली.

आयसीटी मुंबई मराठवाडा कॅम्पस, जालना

४ मे, २०१८ हा दिवसही आयसीटी, मुंबईच्या इतिहासातील अविस्मरणीय दिवस होता कारण या दिवशी संस्थेचे मुंबईबाहेरील दुसरे कॅम्पस अनेक नामांकित व्यक्ती, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी, साहायक कर्मचारीवर्ग आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत स्थापित करण्यात आले.

कारण प्रश्न आहे शिक्षणाचा!

चांगले शिक्षण ही पालकांकडून मुलांना दिली जाणारी ही एक अमूल्य भेट असल्याचे कोणी तरी म्हटले आहे. हे अगदी खरे आहे. भारतामधल्या प्रत्येक पालकाची तशी इच्छा असते. चांगले शिक्षण म्हणजे उच्चशिक्षण मग ते देशामधले असो किंवा परदेशांमधले असो, ते खर्चीकच असते. आणि मग नेमक्या याच वेळी महत्त्वाकांक्षी तरुणांच्या मदतीला वित्तीय संस्थांचे शैक्षणिक कर्ज येते.

भारतातील एक आघाडीची मल्टिस्टेट शेडय़ुल्ड कॉ-ऑपरेटिव्ह बँक असलेली एनकेजीएसबी बँक गेल्या १०३ वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमधून १०९ शाखांच्या माध्यमातून कार्यरत असून अतिशय आकर्षक व्याज दराने, अटींच्या आणि शर्तीच्या आधारे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. साधारणपणे ५० लाखांपर्यंत हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्या कर्जाचा असणारा परतावा. याद्वारे विद्यार्थ्यांला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीला लागून कर्ज परतावा करण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांला स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध होते. शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे म्हणजे एक व्यवसाय न वाटता एक उज्ज्वल भवितव्य आपण निर्माण करत आहोत अशी एनकेजीएसबी बँकेची धारणा आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२८६०२०२० या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा.

शिक्षणाचे बदलते माध्यम

करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रांतील व्यवहारांची गती मंदावली असली तरी शिक्षण क्षेत्रासाठी ही इष्टापत्ती ठरली आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नव्या आणि प्रभावी प्रवाहामुळे अध्ययन-अध्यापनाचे आयाम बदलून जाणार आहेत.

पारंपरिक शिक्षणापेक्षा ही नवी पद्धती वेगळी असली तरी शालेय स्तरापासून ते उच्चशिक्षणापर्यंत अनेक संधी या नव्या व्यवस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. आभासी वर्गाच्या माध्यमातून शिकणे, खेळांच्या माध्यमातून शिक्षण, स्वयंअध्यापनासाठी सहकार्य अशा वेगवेगळ्या पातळीवर शिक्षण घेता येते हे या प्रणालीचे वैशिष्टय़ आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संकल्पना समजावून घेता येतात. वाचनावर आधारित साहित्याबरोबरच अ‍ॅनिमेशन, खेळ, कोडी, सिम्युलेशन अशा नव्या तंत्राच्या माध्यमातून संकल्पना समजणे सोपे होते.

काळजीही घ्यायला हवी..

ऑनलाइन शिक्षणासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्याची निवड काळजीपूर्वक करायला हवी. सायबर गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सुरक्षित पर्याय वापरणे आवश्यक आहे. त्याच वेळी वयानुसार योग्य प्रकारे शिक्षण देणारा पर्याय निवडावा. विद्यार्थ्यांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्यांना शिक्षण मिळावे. शिक्षणाची ही प्रक्रिया एकतर्फी नसावी. विद्यार्थ्यांना गुंतवून घेऊन, कृती करण्यासाठी, शिकण्यासाठी प्रेरित करणारे साहित्य असावे. विद्यार्थ्यांना संकल्पना कळली आहे का, याची पडताळणीही करता यावी. शक्यतो विविध संगणक आणि मोबाइल प्रणालींसाठी समर्पक ठरेल असे अ‍ॅप असावे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होईलच. मात्र बदलते हवामान, आव्हाने यांच्या पार्श्वभूमीवर अगदी करोनाची साथ संपली तरीही येत्या काळात शिक्षणाच्या पद्धतींमध्ये बदल करावेच लागणार आहेत. शाळांनाही त्यांचे स्वरूप बदलावे लागणार आहे. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण अशी संमिश्र शिक्षण पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. सध्या वेगळी, नवीन वाटणारी ही पद्धत आता शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग होणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाची वैशिष्टय़े..

लवचीकता आणि अभ्यासक्रम- विषय निवडीचे स्वातंत्र्य हे ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे वैशिष्टय़ आहे. विद्यार्थ्यांला हवे तेव्हा, हव्या त्या विषयाचे शिक्षण घेण्याची मुभा यात मिळू शकते.  शिक्षणाचे वैश्विक पातळीवरील दालन नव्या व्यवस्थेने खुले केले आहे. आठवडय़ाच्या अखेरीस, दिवसातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेण्याचा मार्ग उपलब्ध असतो. विशेषत: नोकरी करत शिक्षण घेणाऱ्यांसाठी आजपर्यंत ही सुविधा फायद्याची ठरली आहे. आता शाळा बंद असताना हा प्रवाह अगदी प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत घरात, सुरक्षित वातावरणात शिकण्याचा पर्याय ऑनलाइन प्रणालींनी दिला आहे.  वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांना एकत्रित शिकवताना शिक्षकांनाही मर्यादा असतात. पण ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय हा विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने अभ्यासाची संधी देतो. एखादी संकल्पना पूर्ण कळेपर्यंत विद्यार्थी शिकू शकतो. त्यासाठी परत परत घटकाचे व्हिडीओ किंवा साहित्य वापरता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 3:02 am

Web Title: institute of chemical technology ict mumbai zws 70
Next Stories
1 ‘तडजोड’ म्हणजे शरणागती नव्हे..
2 चीनच्या इतिहासातून चीनला ओळखा!
3 आज गांधीजी असते तर..
Just Now!
X