‘कलरलेस त्सुकूरू ताजाकी अँड हिज पिलग्रिमेज इयर्स’ असं श्याममनोहरी शीर्षक असलेली कादंबरी (इंग्रजी आणि जपानी भाषांत) बाजारात आली. सात दिवसांत जपानीच्या १० लाख प्रती खपल्या. ही बातमी नाहीच..! ही कादंबरी जर हारुकी मुराकामीसारख्या जपानी लेखकाची असेल, तर सात दिवसांत १० लाख प्रती खपणारच असतात. आधीच्या ‘वन क्यू एटीफोर’चं हेच झालं होतं. त्यामुळे बातमीचं नावीन्य  आकडय़ांना उरलं नाही.
चर्चा अशी की, मुराकामीची कादंबरी आलीयच आणि ती रीतीप्रमाणे खपतेयच, तर याचा अर्थ जपान्यांनी गेल्या काही (तीन) वर्षांतलं वाचन-मांद्य झटकून आता पूर्ववत् वाचन सुरू केलंय असं मानावं का? म्हणजे ‘१० लाखांचं श्रेय’ हे जपानी वाचकांची वाचनऊर्मी पुन्हा उसळली असं मानून वाचकांना द्यायचं की हारुकी मुराकामीच्या लोकप्रियतेला किंवा गेलाबाजार ‘मार्केटिंग क्लृप्त्यां’ना, याबद्दल उलटसुलट बातम्या छापून येऊ लागल्या आहेत. मार्केटिंगला श्रेय देणारे म्हणताहेत की, आत्यंतिक गोपनीयता ठेवून धाडदिशी ही कादंबरी बाजारात आल्यामुळे प्रतिसाद वाढला खरा, पण मुळात अपेक्षा कमी प्रतिसादाची असल्याशिवाय अशी लपवाछपवी झालीच नसती. ‘मुराकामी तो मुराकामीच..’ असं मानून वाचनाच्या दुष्काळातही वाचकांचे द्राक्षघोस पिकले ते केवळ या लेखकाच्या जादूमुळेच, असा पारंपरिक पवित्रा अनेकांनी घेतलाय, तर तिसरी बाजू या वाचकांचा कल जोखणारी आहे. २०११ चा भूकंप, आर्थिक पीछेहाट आदी कारणांनी जपान अस्वस्थ होताच, त्या अस्वस्थतेला कथानकाच्या कवेत घेणारी ही नवी कादंबरी मुराकामीनं लिहिलीय. त्यामुळे वाचकाला जे बरं नाहीसं झालं होतं ते बरं होणार, असा एक होरा. मुराकामीच्या ‘नॉर्वेजियन वूड’ या कादंबरीच्या एक कोटी ११ लाख ६० हजार प्रती आजवर (१९८७ पासून) खपल्या आहेत. आठही पुस्तकांनी (पैकी ६ कादंबऱ्या) १० लाखाचा उंबरा कधीच ओलांडलाय. त्यामुळे या चर्चामध्ये दम आहे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द हिट : डेव्हिड बाल्डासी, पाने : ४३२५५० रुपये.
तंत्र : अदि, पाने : ३४४१९५ रुपये.
माय ब्रदर्स वेडिंग : अंदालिब वाज़िद, पाने : २७२२९५ रुपये.
द होमिंग पिजन्स : सिद बाहरी, पाने : ३२८१५० रुपये.
द सिक्रेट्स ऑफ डार्क : अर्क चक्रबर्ती, पाने : ३६०१९५ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
द हिस्ट्री ऑफ भूतान : कर्मा फुंत्शो, पाने : ६८०९९९ रुपये.
एक्झॉटिक एलियन्स- द लॉयन अँड द चिता इन इंडिया : वाल्मिक थापर,    रोमिला थापर, युसूफ थापर, पाने : ३०४५९५ रुपये.

माय कॅन्सर इज मी – द जर्नी फ्रॉम इलनेस टू होलनेस : विजय भट, नीलिमा भट, पाने : २७२३५० रुपये.
द नामो स्टोरी-अ पोलिटकल लाइफ : किंगशुक नाग, पाने : २०८२९५ रुपये.
व्हॉइसेस इन एक्झाइल : राजीव मेहरोत्रा, पाने : २८८३५० रुपये.
सौजन्य : फ्लिपकार्ट डॉट कॉम