News Flash

सनदी अधिकारी आवास योजना

म्हाडासारख्या यंत्रणांकडे आज भूखंड उपलब्ध नाही

महसूल विभाग तसेच म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही यादी प्रसिद्ध केली आहे. यापैकी काही सदनिका विकल्या गेल्या आहेत किंवा काहींचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील बहुतांश सर्वच भूखंडांवर सनदी अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्था आज दिमाखाने उभ्या आहेत. सामान्यांच्या घरांसाठी शासन वा म्हाडासारख्या यंत्रणांकडे आज भूखंड उपलब्ध नाही; परंतु सरकारी अधिकारी, विशेषत: सनदी अधिकाऱ्यांच्या, गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ भूखंड उपलब्ध होतो. अगदी मोक्याचे भूखंड या गृहनिर्माण संस्थांनी मिळविले आहेत. नव्याने येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांसाठीही भूखंड नक्कीच उपलब्ध होतील, अशी व्यवस्थाच आता महसूल वा नगरविकास विभागात नियुक्त झालेल्या सनदी अधिकाऱ्यांकडून केली जाईल. ‘म्हाडा’च्या घरांवरही आता या सनदी अधिकाऱ्यांचे लक्ष जाऊ लागले आहे. अलीकडेच म्हाडाचा ओशिवरातील भूखंड न्यायाधीशांच्या गृहनिर्माण संस्थेला देण्यात आला आहे. उच्च न्यायालयासाठी राखीव असलेला वांद्रे येथील भूखंड सनदी अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेने बळकावला. काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील जवळपास सर्वच अधिकाऱ्यांच्या ‘रेणुका’ या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण संस्थेत सदनिका आहेत.

बहुतांश सर्वच सनदी अधिकाऱ्यांची मुंबईत घरे आहेत. मुंबईत नियुक्ती मिळाली की, घर पदरात पडल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असा विडाच हे अधिकारी उचलतात. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. प्रामुख्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध ठेवून अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये सदस्यत्व मिळविण्याचे एकमेव उद्दिष्ट या मंडळींचे असते. सरकारी निवासस्थान मिळविणे आणि मग महसूल खात्याच्या भूखंडावरील गृहनिर्माण संस्थेत अल्प किमतीत हक्काचे घर मिळविणे, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. ज्या सनदी अधिकाऱ्यांना ते जमत नाही ते ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी ठिकाणी पसंती देतात. अर्थात यालाही अपवाद आहेत.

कमाल जमीन धारणा कायदा लागू झाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती वाढू लागल्या. तेव्हापासून, म्हणजे साधारणत: १९७६ नंतर, सनदी अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून शासनाकडून भूखंड मिळविण्यास सुरुवात केली. १९८४-८५ नंतर सनदी अधिकाऱ्यांच्या आलिशान गृहनिर्माण संस्था उभ्या राहू लागल्या. शीघ्रगणकाचा दरही त्यांना अर्ज केला तेव्हाचा म्हणजे काही प्रकरणांत तो दहा वर्षे जुना लावण्यात आला. तसा शासन निर्णयच करून घेण्यात आला. शीघ्रगणकाच्या आठ टक्के भूखंडाचा दर म्हणजे जवळपास फुकटच भूखंड या सनदी अधिकाऱ्यांना मिळाला. त्यात या भूखंडाच्या १५ टक्के जागेचा व्यापारी वापर करण्याचीही परवानगी मिळाली. त्यामुळे इमारत उभारण्याचा खर्चही सुटला. सदनिकाही या सनदी अधिकाऱ्यांना फुकटच मिळाली. इतकेच नव्हे तर काही संस्थांनी व्यापारी जागा भाडय़ाने देऊन लाखो रुपये भाडे मिळविले आहे. त्यामुळे देखभालीचा खर्चही शून्य झाला आहे. मंत्रालयाशेजारील ब्युएना विस्ता, चर्चगेटजवळील चार्ले व्हिला ते वरळीतील असीम, प्रिया, प्रणिता, जुहूतील वसुंधरा, अंधेरीतील पाटलीपुत्र, मीरा, कादंबरी, संगम, विनायक तसेच वांद्रे येथील सिद्धांत, रेणुका, न्यायसागर आदी सनदी अधिकाऱ्यांच्या अनेक गृहनिर्माण संस्था आज दिमाखाने उभ्या आहेत.

जुहूच्या वसुंधरा गृहनिर्माण संस्थेचा व्यापारी गाळा ‘क्रोमा’ या टाटा कंपनीच्या शोरूमला देण्यात आला आहे. यापोटी वार्षिक अडीच कोटी भाडे ही जागा ज्याच्या ताब्यात आहे त्या श्रेयस होम मॅनेजमेंट प्रा. लि.ला मिळाले आहे. शासनाच्या एका आदेशानुसार, मालकी हक्काने घरे मिळाली तर सरकारी निवासस्थानांना या सनदी अधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी द्यावी, असे नमूद आहे; परंतु या निर्णयातही या अधिकाऱ्यांनी बदल करून घेतला. मंत्रालयात जाणे सुलभ व्हावे म्हणून ज्यांची मालकी हक्काची निवासस्थाने उपनगरात आहेत त्यांना शहरातील सरकारी निवासस्थानांचा वापर करता येईल. त्यामुळे ही मालकी हक्काची घरे प्रति महिना किमान दीड ते तीन लाखांपर्यंत या सनदी अधिकाऱ्यांना भाडय़ाने देता आली आहेत. त्यातून ते आपल्या कनिष्ठांना भ्रष्टाचार न करण्याचा सल्ला देत आहेत. या प्रत्येक सनदी अधिकाऱ्याला भाडय़ापोटी वर्षांला ३० ते ४० लाख रुपये मिळत आहेत. याबाबतही शासनाकडून कधीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

ही घरे मिळविण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांचे कौटुंबिक मासिक उत्पन्न विशिष्ट गटात मोडावे लागते. या घरांसाठी सनदी अधिकाऱ्यांनी दिलेले कौटुंबिक मासिक उत्पन्नाचे आकडे पाहिले तर सामान्यांनाही त्यांच्यापेक्षा अधिक वेतन असल्याचे आढळते. सनदी अधिकारी असे बिनधास्तपणे उत्पन्नाचे खोटे आकडे दाखवू शकतात का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पाटलीपुत्र या गृहनिर्माण संस्थेत सदस्य मिळविलेल्या अधिकाऱ्यांच्या उत्पन्नाचे आकडे माहिती अधिकारात मिळविण्यात आले असता अनेक धक्कादायक बाबी बाहेर आल्या. एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचे कौटुंबिक मासिक उत्पन्न १९९९ मध्ये फक्त दहा हजार असल्याचे नमूद आहे. मुख्यमंत्र्यांचे विद्यमान प्रधान सचिव असलेले प्रवीण परदेशी यांनी फक्त एक लाख आठ हजार उत्पन्न दाखविले आहे. बाकी सर्व अधिकाऱ्यांनी २० ते ४० हजार इतकेच मासिक उत्पन्न दाखविले आहे. याची कसून चौकशी होणार नाही, याची या सनदी अधिकाऱ्यांना कल्पना आहे; परंतु नियमात बसण्यासाठी इतका धादांत खोटेपणा कसा काय खपवून घेतला जाऊ शकतो, असाच सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ‘पाटलीपुत्र’ संस्थेच्या भूखंडाची फाइल दोन दिवसांत मंजूर झाली होती. तब्बल ५० प्रभावशाली आयएएस अधिकारी या संस्थेमध्ये सदस्य आहेत. चारबंगलासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड असे अधिकारीच मिळवू शकतात. दोन आलिशान इमारती उभारून या भूखंडाचा १५ टक्के भाग व्यापारी वापरासाठी दिला आहे. एका डिपार्टमेंटल स्टोअरकडून मोठी रक्कम या सोसायटीला मिळाल्याचेही बोलले जाते. मीरा सोसायटीत तळमजल्यावर जे व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत त्याचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे हा वापर १५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

महसूल विभागाकडील भूखंड कमी होऊ लागल्यानंतर या सनदी अधिकाऱ्यांचे लक्ष म्हाडाच्या घरांकडे जाऊ लागले आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या ‘मैत्री’साठी म्हाडाने दरवाजे उघडल्यानंतर आता न्यायाधीशांच्या ‘सुरभि’ या गृहनिर्माण संस्थेनेही ओशिवऱ्यातील मोक्याची जागा पटकावली आहे. सामान्यांसाठी घरे बांधणाऱ्या म्हाडाचे भविष्यात वरळी, नायगाव, एन. एम. जोशी मार्ग येथे आलिशान घरांचे टॉवर्स उभे राहणार आहेत. यापैकी किती घरे सामान्यांच्या वाटय़ाला येणार आहेत, हा प्रश्नच आहे. या घरांसाठीही अनेक सनदी अधिकारी डोळे लावून निश्चितच बसलेले असणार!

सनदी अधिकाऱ्यांना भूखंड तसेच सदनिकांचे वाटप करण्याबाबत १९८३ ते ९६ पर्यंत चार ते पाच वेळा सोयीनुसार अधिसूचनेत बदल करण्यात आला आहे.  आपल्यालाच हे भूखंड मिळावेत, यासाठी या सनदी अधिकाऱ्यांनी आपले अधिकार पुरेपूर वापरल्याचे दिसून येते. अल्पदरात भूखंड व सदनिका मिळणे हा आपला हक्कच आहे, अशीच या सनदी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. त्यांना त्यात काहीच वावगे वाटत नाही. त्यातूनच हा प्रकार गेली दोन-तीन दशके बिनधास्तपणे सुरू आहे. कोणीही त्याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. तेरी भी चूप.. असाच हा प्रकार आहे.

काही लाभार्थी अधिकारी..

चार्ले व्हिला, चर्चगेट

एम. आर. कोल्हटकर, वाय. एल. राजवाडे, एस. के. सगणे, न्या. बी. जी. कोळसे-पाटील, ए. एच. अभ्यंकर, पी. डी. करंदीकर, आर. बी. कानडे, बी. एन. कलंत्री, एम. आर. नटराजन, आर. एम. उबाळे, एम. व्ही. पाटील, के. नलिनाक्षन, वाय. एस. भावे, अशोक बसाक.

असीम, वरळी

नीला सत्यनारायण, ए. एस. राव, ए. व्ही. रायकर, एम. बी. चौबे, डॉ. श्रीमती एम. एस. स्वामी सिरसीकर, बी. व्ही. चव्हाण, डॉ. रेणू पटेल, वैद्य के. एन. पिसाळ, बी. व्ही. रोटर, गिरीश गोखले, एस. एस. हाटे.

प्रिया, वरळी

व्ही. सुंदरम, एन. व्ही. सुंदररामन, के. जी. परांजपे, एन. रंगनाथन, द. म. सुकथनकर, एम. एम. केळकर, जी. बी. राजगोपालन, शशिकांत दैठणकर, बी. एन. भागवत, व्ही. एल. राणे, व्ही. ए. गोपालकृष्णन, आर. टी. अत्रे.

प्रणिता, वरळी

व्ही. पी. राजा, संजय नारायण, व्ही. एम. बेडसे, एस. आर. तांबे, अनिकेश सिन्हा, आर. एम. प्रेमकुमार, नवीन कुमार, एस. एस. पुरी, बी. एन. बहादूर, बी. सी. खटुआ, श्रीमती टी. फ्रान्सिस, बलदेव चांद, अजित वर्टी, बी. के. अग्रवाल, राकेश जोशी, चांद गोयल, आर. जी. बनसोड, एस. खोत.

रेणुका, वांद्रे पूर्व

नीतीन करीर, जगदीश पाटील, राजीव निवतकर, सतीश सावंत, बालाजी साखरे, रामानंद तिवारी, दिवाकर शेट्टी, सुधीर खानापुरे, गुपचूप, अमिताभ गुप्ता, रमाकांत असामर, शाम धात्रक, आनंद रायते, संदीप पाटील, अजय भूषण पांडे, संजय सुरशेटवार

मीरा, ओशिवरा

पृथ्वीराज बायस, के. पी. बक्षी, जयराज फाटक, अनिल ढेरे, नवल बजाज, आय. एस. चहल, स्वाधीन क्षत्रिय, मुकेश खुल्लर, राजीव जलोटा, जयंत कावळे, विजय सतबिरसिंग, अपूर्व चंद्रा, जे. एम. अभ्यंकर, एम. एस. गिल, व्ही. बी. पाटील, शाम वर्धने, ओ. पी. गुप्ता, व्ही. व्ही. वैद्य, एस. के. शर्मा, शिरीष अस्थाना, बलदेव सिंग, एस. ए. कक्कर, विनयकुमार चौबे, अमितेश कुमार, एस. पी. गुप्ता, विनय कारगावकर, रितेश कुमार.

वसुंधरा, जुहू

सुबोध जैस्वाल, व्ही. बी. लक्ष्मीनारायण, रश्मी शुक्ला, बी. डी. मिश्रा, डी. कनकरत्नम, हेमंत नगराळे, जयजीत सिंग, प्रवीण दीक्षित, बी. के. सिंग, के. वेंकटेशन, के. के. पाठक, अजित पारसनीस, एस. जगन्नाथन, प्रभात रंजन, संजय सक्सेना, पी. बी. सिंग, दलबीर सिंग, अर्चना त्यागी, प्रज्ञा सरवदे, संदीप बिष्णोई, दिलीप श्रीराव, संजीवकुमार सिंग, कविता गुप्ता, राजेंद्र सिंग, सुरेन पाण्डेय, बिपिन बिहारी, आर. के. पद्मनाभन, सदानंद दाते, उद्धव कांबळे, व्ही. जी. फणसाळकर, आर. ई. पवार.

संगम, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम

राजीव अग्रवाल, अरुप पटनाईक, डी. शिवानंदन, पी. के. जोशी, पी. एस. नारायणस्वामी, यूपीएस मदान, राकेश मारिया, अहमद जावेद, सुनील सोनी, मीरा बोरवणकर, एस. एस. यादवडकर, प्रशांत श्रीवास्तव, ए. एम. आंबेडकर, आर. टी. राठोड, राहुल सूर, राजेंद्र सिंग, पी. व्ही. जोशी, एस. डी. पारधी, ए. के. अंकोला, आर. पी. खिलनानी, पी. एस. मीना, जी. सी. वर्मा, के. के. सोनी, सतीश माथूर, भगवान सहाय, व्ही. एन. देशमुख, जी. डी. पोळ, ए. बी. कुलकर्णी, व्ही. बी. माथनकर, श्रीमती कुसुम वीर, ए. एल. वर्मा.

पाटलीपुत्र, चार बंगला, अंधेरी पश्चिम

अरविंद कुमार, रामनाथ झा, अमिताभ राजन, मनुकुमार श्रीवास्तव, बी. एस. मीना, आर. सी. सागर, नितीन गद्रे, प्रवीण परदेशी, सुनील पोरवाल, राजीव सिन्हा, संजय पांडे, एच. एम. गजभिये, मं. दो. वाणी, जॉनी जोसेफ, व्ही. रंगनाथन, मिलिंद म्हैसकर, देबाशीष चक्रवर्ती, सुब्रत रथो, जे. एस. सहानी, व्ही. के. अग्रवाल, ए. के. दुआ, संजय बर्वे, सुधा भावे, जी. एस. संधू, एस. एस. संधू, सुभाष लाला, वाय. एस. जाफा, विद्याधर कानडे, सतीश गवई, जे. पी. डांगे, राहुल गोपाल, एन. एल. लखनपाल, डॉ. सुभाष साळुंके, पी. ए. माने, एस. के. सिंग, आर. ए. राजीव, अनिल दिग्गीकर, भास्कर मुंडे, राहुल अस्थाना, श्रीकांत देशपांडे, उमेश सारंगी, कृष्णा वत्स, एम. जी. साळवी, प्रतिभा उमरजी, सुजाता सैनिक, टी. सी. चंद्रशेखर, पी. एस. बोंगीरवार, डॉ. सत्यपाल सिंग, भूषण गगरानी, माधव सानप.

कादंबरी, चार बंगला, अंधेरी पश्चिम (या गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम सुरू आहे)

पृथ्वीराज मेश्राम, पद्माकर गायकवाड, विश्वास नांगरे-पाटील, कृष्णप्रकाश राजमोहन प्रसाद, अभिन मोडक, सत्यनारायण, रवींद्र डांगे, एस. कृष्णा, बळीराम वाघमारे, ओंकार गणवीर, दत्तात्रय कोळी, डॉ. आर. मोहन रमेशकुमार, दिनेश गोडाम, बन्सीलाल भोई, चंदभान थुल, भुपेंद्रकुमार सिंह, राजेश मोडक, राजेंद्र जगताप, यशोवर्धन देशमुख, नितीन डुफरे, विजय खर्चे, आनंदराव पाटील, विवेक गणवीर, अभिषेक गणवीर, प्रशांत जांभूळकर, पल्लवी संघवी, प्रमोदचंद्र श्रीवास्तव.

सुरभी, ओशिवरा (न्यायाधीशांची गृहनिर्माण संस्था – अलीकडेच मंजुरी देण्यात आली आहे)

डॉ. मंजुला चेल्लूर, मोहित शाह, अनिल दवे, धीरेंद्र वाघेला, अनिल जोशी, गिरीश कुलकर्णी, अजय गडकरी, रणजित मोरे, अनुप मोहता, संजय गंगापूरवाला, अनुजा प्रभुदेसाई, डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी, शाहरुख काथावाला, महेश सोनक, फिलोमेनो रईस, अशोक भंगाळे, रवींद्र बोरडे, संभाजी शिंदे, नानाजी नलावडे, मदन जोशी, सुनील देशमुख, रवींद्र घुगे, नितीन सांबरे, विश्वास जाधव, अनंत बदर, सुनील शुक्रे, प्रसन्ना वराळे, रवी देशपांडे, प्रदीप देशमुख, जाखा अजीज उल-हाका, अतुल चांदूरकर, विनय देशपांडे, कालिदास वाडने, मकरंद कर्णिक, संगीतराव पाटील, अरुण चौधरी.

इंडस्, वडाळा (वितरणाचा आदेश रद्द करण्यात आला)

सुधीर ठाकरे, थॉमस बेंजामिन, अजीज खान, लीना मेहंदळे, वंदना कृष्ण, मालिनी शंकर, धनंजय कमलाकर, प्रशांत बुरडे, राधिका रस्तोगी, अंकुश धनविजय, अशोक धिवरे, निपुण विनायक, असीम गुप्ता, कुलदीप खवारे, निधी पांडे, बी. पी. सिंग, संतोष कुमार, राजवर्धन सिन्हा, एस. चोकलिंगम, जयश्री भोज, डॉ. संजय मुखर्जी, संजय खंदारे, कुणाल कुमार, डॉ. निखिल गुप्ता, आशीष शर्मा, प्रवीण दराडे, माधव सांगळे, दिनेश वाघमारे, के. एम. एम. प्रसन्ना, प्रभात कुमार, प्राजक्ता लवंगारे, सुरेंद्रकुमार बागडे, संजीव कुमार, संजय भाटिया, निरुपमा डांगे, वल्सा नायर सिंह, श्रीकर परदेशी, किरण पाणबुडे, नितीश मिश्रा, राजनाथ शेठ, संजय यादव, के. शिवाजी. सी. व्ही. ओक, आभा शुक्ला, रुपिंदर सिंह, गोपीनाथ पाटील, एकनाथ डावले, विक्रम कुमार.

मैत्री, सांताक्रूझ (या गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम सुरू आहे)

अनिल वझरकर, सुधीर ठाकरे, बिपिन श्रीमाळी, हर्षदीप कांबळे, दिलीप शिंदे, जवाहर सिंग, कैलास पगारे, सुनील रामानंद, चंद्रकांत थोरात, शरद पाटील, अरुण विधळे, विलास इंदूलकर, डॉ. ए. एम. वाघ, संजय यादव, दीपक कपूर, किशोर राजे निंबाळकर, सुमंत भांगे, सुब्बाराव पाटील, सुखविंदर सिंग, चंद्रकांत पुलकुंडवार, आशीष शर्मा, अनिल काळे,  संजय खंदारे, राजेश देशमुख, ज्ञानेश्वर थोरात, प्रवीण दराडे, माणिक गुरसळ, सुभाष येंगडे, प्रकाश बेले, पांढरकामे, संजय दराडे, हुसैन मुकादम, डॉ. एस. एस. देशपांडे, पी. एम. माळवदकर, निपुण विनायक, माधव आखरे, ए. काळे, पी. डी. मलिकनेर, निलेश काळे, योगेश म्हसे, दिलीप गावडे, चित्रा कुलकर्णी, माधव पाटील, सतीश गाढवे, सुनील खैरनार, मोहन आरसेवाड, दिनकर कानडे, उमेश वाघ, एजाज नकवी, के. एस. लोंढे पाटील, बा. अ. वाटकर.

जुहू येथील वसुंधरा गृहनिर्माण संस्थेतील सनदी अधिकाऱ्यांनी २००७ मध्ये भाडय़ापोटी ज्यांच्याकडून लाभ मिळविला त्यांची नावे : (वानगीदाखल – आगाऊ मिळालेले वार्षिक भाडे)

  • ओवे अँड्रे ऑल्विन – ३९. ६ लाख
  • मोर्गन स्टॅनले – ३६ लाख
  • सारावी सेनफ्युएल – ३७.२ लाख
  • जेकब इंजिनीअरिंग – ३३ लाख
  • जॉन्सन कंट्रोल – ३३ लाख
  • लाफार्ज इंडिया – २८.२ लाख
  • ओमया इंडिया – १५ लाख
  • मेरिएट हॉटेल्स – ३३ लाख
  • सदेश राघवन – १०.७५ लाख
  • मेलरोझ जे आर – ७२ लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:42 am

Web Title: real estate scams by ias and ips officers in mumbai
Next Stories
1 भाजपच्या प्रचाराला धार्मिक धार
2 आपल्याला बद्ध संशोधक हवे आहेत का?
3 अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला?
Just Now!
X