स्वत:च्या आíथक बरकतीचे साधन म्हणून पुरुष भक्तांच्या श्रद्धेचा गरफायदा घेणे आणि लैंगिक सुखोपभोगासाठी महिला भक्तांचा वापर करणे ही अनेक भोंदूबाबांची कार्यपद्धती असल्याचे काही प्रकरणांमधून स्पष्ट झाले आहे..
पैशांचा पाऊस
ठाणे, पालघर जिल्हय़ात स्थानिक भोंदूबाबांचा उच्छाद असल्याचे अलीकडे उजेडात आलेल्या काही प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. पशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करणाऱ्या संघटित बुवाबाजीचे एक प्रकरण डोंबिवलीनजीक उजेडात आले. वाडा तालुक्यातील दोन भोंदूंचे प्रतापही उघड झाले आहेत.
मराठवाडय़ात बॉक्सर बाबा
मराठवाडय़ातील समस्याग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लोकांना लुटणाऱ्या बॉक्सर बाबा नावाच्या एका जादूगाराची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरस चर्चा औरंगाबादेत सुरू होती..
तंत्रविद्या आणि फ्लॅटचे आमिष
तंत्रविद्य्ोच्या साहय़ाने म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन देत दूरचित्रवाणीवरील एका महिला कलाकारावर बलात्कार करून तिची लाखोंची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूला गेल्या वर्षी मे महिन्यात पोलिसांनी मुंबईत अटक केली होती.
बलात्कारी बनला बाबा..
जळगावच्या चोपडा तालुक्यातील एका गावात महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सात वर्षांचा तुरुंगवास सोसून बाहेर आलेल्या एका इसमाने मध्य प्रदेशात सेंधवा येथील झोपडपट्टीत बुवाबाजीचा धंदा सुरू केल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गेल्या फेब्रुवारीत पुन्हा त्याच्या मुसक्या आवळल्या..
आंध्र प्रदेशातील ‘किसिंग बाबा’..
आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या पुरुषांना िलबू देऊन, तर महिलांना चुंबनाचा ‘दु:खहरण प्रसाद’ देणाऱ्या किसिंग बाबा नावाच्या एका भोंदूला आंध्र प्रदेशातील कडापा जिल्हय़ात गेल्या वर्षी डिसेंबरात पोलिसांनी अटक केली होती.
ओडिशातील सारथी बाबा..
महाविद्यालयीन तरुणीसोबत एका आलिशान हॉटेलात मौजमजा करणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू सारथी बाबाला ओडिशा क्राइम ब्रँचच्या पथकाने गेल्या आठवडय़ात हैदराबादेतून अटक केल्याने भोंदूगिरीचे आणखी एक िबग बाहेर आले. ओडिशातील केंद्रपाडा येथे सारथी बाबाचा मोठा आश्रम असून त्याचा भक्तपरिवार मोठा आहे; पण त्याचे िबग फुटल्यानंतर भक्तांमध्येच संतापाची लाट पसरली आणि त्या उद्रेकाच्या दबावामुळे त्याला अटक करावी लागली.
हिसारचा रामपाल बाबा
हिसारमध्ये आश्रमातील समर्थकांनी गावकऱ्यांवर गोळीबार केल्याच्या आरोपावरून कारवाई करावयास गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार केल्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरात पोलीस आणि रामपाल समर्थकांमध्ये जोरदार चकमक झाली होती. त्यात काही पोलीसच जखमी झाले आणि परिसरात पुढे अनेक दिवस तणाव होता. रामपालवरील कारवाईसाठी प्रशासनाला जवळपास २६ कोटी रुपये खर्च करावे लागले होते. हा आश्रम म्हणजे अतिरेक्यांचे केंद्र बनला असून त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्याच एका मुखपत्रातून करण्यात आली होती.
स्वामी परमहंस नित्यानंद
स्वामी परमहंस नित्यानंद स्वत:ला महानिर्वाणी आखाडय़ाचा महामंडलेश्वर म्हणवून घेतो. तसेच त्याने आपल्या नावाने बंगळुरू येथे नित्यानंद ज्ञानपीठ सुरू केले आहे. त्यात योग, अध्यात्म, ध्यानधारणा आदी गोष्टींचे उपक्रम राबवले जातात. सन टीव्हीने मार्च २०१० मध्ये नित्यानंद कथितरीत्या एका तामीळ अभिनेत्रीबरोबर शारीरिक संबंध ठेवत असतानाचे छायाचित्रण जारी केले. त्यानंतर स्वामी मोठय़ा वादात सापडला. स्वामीची माजी भक्त असलेल्या आरती राव हिने स्वामीने आपल्यावरही पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यानंतर स्वामीला अटक होऊन नंतर जामीनही मिळाला. त्याचा आश्रम सीलबंद करण्यात आला.
आसाराम बापू
एक ईश्वरवाद, भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा पुरस्कार करत आसाराम बापूने गुजरातमध्ये १० एकर जागेवर आपला पहिला आश्रम सुरू केला. त्यानंतर आजतागायत त्याचे देशविदेशांत सुमारे ४०० आश्रम सुरू झाले आहेत आणि त्याच्या मागे मोठय़ा प्रमाणात भक्तगण गोळा झाले आहेत. आश्रमांसाठी जागा मिळवण्यात घोटाळे केल्याच्या आरोपांवरून आसाराम २००० साली वादात अडकला. तसेच त्याच्या आश्रमात महिला भक्तांचे लैंगिक शोषण आणि काळी जादू केली जात असल्याचेही आरोप झाले. २०१३ साली जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसारामला अटक झाली. त्यापाठोपाठ सूरतमधील दोन महिलांनीही त्यांच्यावर आसाराम व त्याच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले.
चंद्रास्वामी
हैदराबादमधील हा तांत्रिक आणि आध्यात्मिक गुरू माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. आपल्याला अनेक सिद्धी प्राप्त असल्याचा त्याचा दावा आहे. चंद्रास्वामीच्या भक्तगणांमध्ये अनेक देशविदेशातील नेते, सनदी अधिकारी तसेच व्यावसायिक होते. त्यात ब्रुनेईचा सुलतान, बहरीनचा शेख, हॉलीवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, मार्गारेट थॅचर, उद्योगपती अदनान खाशोगी आदींचा समावेश होता. मात्र पुढे आर्थिक गैरव्यवहारात तो अडकला. लंडनमधील एका व्यावसायिकाला फसवल्याचा तसेच परकीय चलन नियमन कायद्याचे (फेरा) उल्लंघन केल्याचे आरोपही ठेवले गेले. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना कथितरीत्या पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली चंद्रास्वामीवर जैन आयोगाच्या अहवालातही ठपका ठेवला गेला. त्यामुळे इतरांचे भविष्य सांगणाऱ्या या तांत्रिकाचेच ग्रह फिरले आणि तो चौकशीच्या चक्रात सापडला.
दरवेश गुलजार अहमद भट
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्य़ातील खानसाहिब येथील आपल्या धार्मिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मे २०१३ मध्ये पोलिसांनी दरवेश गुलजार अहमद भट याला अटक केली. भट आपल्याला मुस्लीम धर्मातील विविध सिद्धी प्राप्त असल्याचा दावा करत असे. तसेच तरुण मुलींसाठी आत्मशुद्धीचे निवासी अभ्यासक्रम चालवत असे. त्याच्या या धार्मिक केंद्रात सुमारे ५०० तरुण मुली वास्तव्यास होत्या. त्यांना फितवण्यासाठी त्याने काही महिला एजंट नेमल्या होत्या. शकिला बानो ही त्यापैकीच एक.  ती नव्याने दाखल झालेल्या मुलींना आत्मशुद्धीसाठी दरवेश गुलजार अहमद भटला पूर्णपणे शरण जाऊन त्याची सर्व प्रकारे सेवा करण्यासाठी उद्युक्त करत असे. या अपप्रचाराला बळी पडलेल्या मुलींना मग ती भटच्या अतिपवित्र म्हणून गणल्या गेलेल्या अंत:पुरात घेऊन जात असे. तेथे भट या तरुण मुलींना आत्मशुद्धीच्या नावाखाली हवा तसा भोगत असे. भटचे हे धर्माच्या नावावरील लैंगिक अत्याचार असह्य़ झालेल्या काही मुलींनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आणि नंतर दरवेशला अटक झाली.
पॅस्टर जोस लुईस
डी जिझस मिरांडा
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी येथील पॅस्टर जोस लुईस डी जिझस मिरांडा या धर्मगुरूने आपण येशू ख्रिस्ताचा खरा वारस असल्याचा दावा करत मोठा भक्तसमुदाय गोळा केला आहे. तो पूर्वी प्युटरेरिको या अमेरिकेजवळील देशात राहत होता. तेथे त्याला लहानसहान गुन्ह्य़ांसाठी तुरुंगवासही झाला होता. तो हेरॉईनसारख्या अमली पदार्थाच्या व्यसनातही अडकला होता. मात्र त्यानंतर एकदा आपल्या स्वप्नात देवदूत येऊन त्याने आपण ख्रिस्ताचा आधुनिक काळातील अवतार असल्याचा दृष्टान्त दिला, असा दावा तो करतो.  तसेच त्याने आपल्या हातावर ६६६ टॅटू गोंदवून घेतले आहेत.  वास्तविक ६६६ हा आकडा सैतानाशी निगडित आहे. पण मिरांडा म्हणतो आपल्या बाबतीत तो अँटिख्राइस्टशी संबंधित आहे. तरीही मिरांडाचे भक्तगण वाढतच आहेत.