ज्योतिष, पंचांग किंवा खगोलशास्त्रानुसार १२-१२-१२ चा मुहूर्त चांगला नसून विवाह, प्रसूती, मुंज किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी तो योग्य नसल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. ही केवळ इंग्रजी दिनदर्शिकेतील आकडय़ांची गंमत असून चतुर्दशीयुक्त अमावस्येचा दिवस असल्याने कोणत्याही गोष्टीसाठी तो शुभ नसल्याचेही अनेक ज्योतिषांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी सूर्यादयाला कृष्ण पक्षातील चतुर्दशी असून सायंकाळी ५.५६ वाजता अमावस्येला प्रारंभ होईल. दुपारी १२ तास १२ मिनीटे व १२ सेकंदाने जन्मणाऱ्या मुलाची जन्मतारीख व जन्मवेळ १२-१२-१२ असणार आहे. त्यामुळे अनेक गर्भवती महिलांनी प्रसुतीसाठी हा योग साधण्याचे ठरविले आहे. ही वेळ ज्योतिषशास्त्रानुसार शुभ नसली तरी योगायोग साधण्याच्या आकर्षणामुळे बुधवारी अनेक प्रसुती शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. उद्या जन्मणाऱ्या अर्भकांची रास वृश्चिक असेल आणि नक्षत्र अनुराधा असणार आहे, असे पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. कृष्ण चतुर्दशीयुक्त अमावस्येला चंद्रबळ क्षीण असते. वृश्चिकेमध्ये चंद्र नीचेचा असताना त्याबरोबर राहूही येत असल्याने हा योग चांगला नाही. प्रसुतीसाठी योग्य वेळ व दिवस संबंधित महिलेची पत्रिका पाहूनही ठरविला जातो. पण दिनशुध्दी नसल्याने विवाह, मुंज किंवा कोणतेही कार्य, प्रसूतीसाठी हा दिवस चांगला नाही, असे गिरगावातील एका प्रसिध्द ज्योतिष्यांनी सांगितले.
मात्र, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उद्या अमृतसिध्दी योग येत असल्याने प्रसुतीसाठी चांगला दिवस असल्याचे मत व्यक्त केले.

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…