|| हृषीकेश शेर्लेकर

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे थोडक्यात मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवण्याऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे..

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

मागील भागामध्ये आपण औद्योगिक क्रांत्या, सध्याची औद्योगिक क्रांती ४.० आणि एका सायबर फिजिकल विश्वाची निर्मिती याबद्दल थोडक्यात माहिती करून घेतली. आज आपण दोन आवर्तात वावरत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक भौतिक तर दुसरे डिजिटल. ही दोन्ही विश्वे एकमेकाला समांतर नसून एकमेकांमध्ये उत्तमरीत्या गुंफलेली आहेत. उदाहरणार्थ तुम्ही स्वत: बँकेत गेलात, फॉर्म भरून पसे काढलेत, कॅशियरशी बोललात हा झाला भौतिक व्यवहार; पण तुम्ही बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर लॉगिन करून पसे तुमच्या खात्यातून ट्रान्स्फर केलेत, बिल भरलेत, रोबोटिक चॅटबोटबरोबर संवाद केलात हा झाला पूर्णपणे डिजिटल व्यवहार; पण जर हे दोन्ही व्यवहार तुमच्या बँकेने समजा एकत्र जोडलेच नाहीत तर? डिजिटल विश्वात तुम्ही स्वत:च्या डिजिटल प्रोफाइलद्वारे वावरता, संवाद साधता, व्यवहार करता. डिजिटल प्रोफाइल म्हणजेच तुमचे ईमेल अ‍ॅड्रेस, बँकेचे युजरनेम पासवर्ड, सोशल मीडिया प्रोफाइल जसे फेसबुक इत्यादी.

औद्योगिक क्रांतीने ४.० ची क्रांती घडवली; खास करून इंटरनेट, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (कृत्रिम बुद्धिमत्ता), डाटा अ‍ॅनॅलिटिक्स, सोशल मीडिया, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) इत्यादी शोधांनी. गुगल ब्रेनचे जनक आंद्रू एनजी यांनी तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) शोधाची उपमा चक्क विजेच्या शोधाशी केली आहे. म्हणूनच एआय या विषयात आपण पुढील काही सदरांत खोलात शिरणार आहोत आणि एआयचे विविध प्रकार, उपयुक्तता जाणून घेणार आहोत. त्यात प्रामुख्याने समावेश असेल रोबोटिक्स, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) व स्पीच आणि मशीन लìनग. चला तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या कल्पक विश्वात शिरू या. यापुढे मी आर्टिफिशियल इंटेलिजेंस या शब्दाला फक्त ‘एआय’ म्हणून संबोधणार आहे.

एआयचा उगम व प्रसार होण्याआधी पूर्वीच्या काळातील सर्व मशीन्स, जसे रेल्वे इंजिन, कारखान्यांमधील लेथ, कार, इलेक्ट्रिक मोटर्स इत्यादी ही सर्व ‘ऑटोमेशन ऑफ ह्य़ूमन एफर्ट’ म्हणजेच मानवी शक्तीला पर्याय म्हणून, मानवी शक्तीपेक्षा वेगळ्या ऊर्जास्रोतांवर चालणारी, स्वयंचलित उपकरणे होती. जे काम मनुष्य शरीराने करत होता किंवा प्राणिशक्तीचा वापर करून करत होता तेच काम त्या मशीन्स करू लागल्या. उदाहरणार्थ घोडागाडीला पर्याय म्हणून रेल्वे वा कार. या मशीन्स सुरुवातीला मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल स्विचेसद्वारे नियंत्रण करीत. उदाहरणार्थ स्कूटरची किक मारून किंवा चावी फिरवून जशी आपण तिला स्टार्ट करतो. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर इलेक्ट्रॉनिक सíकट्स व कॉम्प्युटर प्रोग्रॅम्सनी याच मशीन्सचे नियंत्रण व हाताळणे सूक्ष्म पातळीला नेऊन ठेवले. हे सगळं स्वयंचलित विश्व जरी दिवसेंदिवत प्रगत होत होतं तरी त्यात एक मोठी उणीव मात्र नक्कीच होती. ती म्हणजे या मशीन्समध्ये, त्या चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स म्हणजेच संगणक आज्ञावलीमध्ये मानवी बुद्धिमत्तेसारखी ‘इंटेलिजेंस’ नव्हती. थोडंसं क्लिष्ट आहे समजायला, पण आपला मानवी मेंदू हा अनुभवातून शिकू शकतो, सुधारणा करू शकतो. एकच काम तो नवीन सोप्या पद्धतीने व कमी वेळेत करू शकतो. हे सर्व आपल्या नकळत होत असल्यामुळे या प्रचंड मानवी क्षमतेची आपण फारशी दाखल जरी घेत नसलो तरी हीच क्षमता मशीन्सचे व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे हे अत्यंत कठीण, गुंतागुंतीचे आहे. हेच एआयचे प्रमुख ध्येय आहे. मशीन्समध्ये बुद्धिमत्ता आणणे म्हणजे नक्की काय, कसे, का, त्याचे फायदे, उदाहरणे जसे गुगल मॅप्स हे आपण पुढच्या काही सदरात जाणून घेणार आहोत.

व्याख्या : एआय म्हणजे थोडक्यात मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवण्याऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे.

त्याआधी मानवी बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? शास्त्रज्ञांनी आपल्या बुद्धीचे विश्लेषण खालील पद्धतीने केले आहे. (१९८३, अमेरिकन सायकोलॉगिस्ट हॉवर्ड गार्डनर)

१. प्रकृती बुद्धिमत्ता – वस्तूंचे वर्गीकरण करण्याची कला.

२. भाषिक बुद्धिमत्ता – भाषा, संवाद कला.

३. संगीत बुद्धिमत्ता – आवाज, ध्वनी, पिच, टोन ओळखण्याची कला.

४. तर्कवादी-गणिती बुद्धिमत्ता – गणना, लॉजिक, सूत्र मांडणे, प्रॉब्लेम  सॉिल्व्हग इत्यादी कला.

५. शारीरिक-कायनेस्थेटिक बुद्धिमत्ता – मेंदूद्वारे शारीरिक नियंत्रण, नपुण्य, जसे अडथळ्यातून चालणे, धावणे, पोहणे.

६. पारस्परिक बुद्धिमत्ता – इतरांबरोबर वागण्याची कला, भावना, मूड, भाषिक, शारीरिक व्यवहार

७. व्हिज्युअल व स्थानिक बुद्धिमत्ता – टूडी व थ्रीडी विश्व साकारण्याची कला, जसे पेंटिंग, मूíतकार इत्यादी.

८. इंट्रा-पर्सनल बुद्धिमत्ता – स्वत:ला, स्वत:च्या विचारांना, भावनांना जाणून घेण्याची कला. जसे मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ.

९. अस्तित्व बुद्धिमत्ता – अस्तित्ववादी गूढ प्रश्नांची उकल इत्यादी.

वरील प्रत्येक कला अवगत करताना आपण चार प्रमुख गोष्टी करत असतो, त्या म्हणजे ‘सेन्स

थिंक अ‍ॅक्ट लर्न सेन्स’ आणि हे अनुभवातून शिकण्याचे चक्र अव्याहतपणे सुरूच असते. सेन्स म्हणजे ज्ञानेंद्रियांमार्फत मिळवलेले ज्ञान किंवा इनपुट, थिंक म्हणजे मूल्यमापन, अ‍ॅक्ट म्हणजे कृती आणि लर्न म्हणजे आत्मसात करणे, शिकणे, सुधारणे.

एआयच्या आधीदेखील सेन्स, थिंक, अ‍ॅक्ट या क्षमता मशीन्समध्ये होत्याच, पण लर्न म्हणजे आत्मसात करणे, शिकणे, सुधारणे ही क्षमता नव्हती. त्यामुळेच एआयच्या आधी मशीन्स या फक्त सांगितलेल्या सूचना पाळत, ठरलेली कामे करत असत. उदाहरणार्थ तुम्ही रोज घर ते ऑफिस या मार्गावरून गाडीने जातायेता आणि निघताना बाह्य़ परिस्थितीचा अंदाज घेऊन सहजच आज मला पोहोचायला किती वेळ लागेल हे अंदाजे वर्तवू शकता. जेव्हा तुमचा अंदाज चुकतो तेव्हादेखील, त्या चुकलेल्या गणिताचे वा उदाहरणाचे ज्ञानदेखील नकळतपणे आपल्या प्रवासाच्या अनुभवात भर घालत असते, नाही का? पण हीच अंदाजाची क्षमता तुमच्या गाडीत नव्हती, ती फक्त ड्रायव्हरने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, स्पीड कमी जास्त करणे वगरे कामे हुकमाबरोबर करीत होती. याच गाडीत जेव्हा गुगल मॅपसारखे उपकरण लावले जाते, तेव्हा तीच गाडी बुद्धिमत्तायुक्त झाली असे म्हणता येईल (पण प्रवास वेळ अंदाज वर्तवणे व रस्ते, दिशा, मार्ग शिफारसी देणेपर्यंत मर्यादित). कारण आता हीच गाडी त्या ड्रायव्हरने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याव्यतिरिक्त स्वत:चे अंदाज, शिफारशी, सल्ले, इशारे, सूचनाही देऊ शकते आणि मुख्य म्हणजे मागील अनुभवांतून शिकूही शकते. अशीच उपकरणे गाडीच्या इंजिन आरोग्याबद्दल धोक्याची पूर्वसूचना देणारी असू शकतील आणि अगदी पुढची पायरी म्हणजे ‘चालकविरहित स्वयंचलित गाडी’. सध्या याची बरीच चर्चा सुरू आहे. अनेकांनी वाचलेच असेल टेस्ला मोटर्सबद्दल.

गेल्या दोन दशकांत कृत्रिम बुद्धिमत्तेने बरीच प्रगती केली असली तरी वरील नऊ मानवी बुद्धिमत्तांपैकी फक्त पहिल्या पाच कला आत्मसात केल्या आहेत, त्याही मर्यादित क्षमतेत. सर्जनशीलता, भावना, अस्तित्ववादी प्रश्न हा पल्ला अजून बराच लांब आहे. शास्त्रज्ञांच्या मते कमीत कमी अजून २-३ दशके, म्हणजेच २०१४-५० पर्यंत. सध्या प्रचलित असेलेली एआयवर आधारित साधने व उपकरणे ही ‘वीक आणि नॅरो एआय’ म्हणजेच अपरिपक्व आणि मर्यादित एआय म्हणून संबोधली जातात.

याबद्दल माहिती करून घेऊ या पुढील सदरात, पुढील सोमवारी. तोपर्यंत https://www.google.com

वर जाऊन, howard gardner नावाने सर्च करून जाणून घ्या नऊ मानवी बुद्धिमत्तेबद्दल तपशीलवार माहिती आणि यूटय़ूबवर जाऊन पुढील व्हिडीओ पहा. https://www.youtube.com/watch?v=y5144doBY0w.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com