|| डॉ. मनमोहन वैद्य

राष्ट्र या नात्याने आपणा सर्वाची ओळख हिंदू अशीच आहे. काही जण स्वत:ला हिंदू म्हणवणे गौरवास्पद मानतात आणि काहींच्या मनात त्याबाबत तितकासा गौरव नाही, यालाही काही हरकत नाही. राजकीय धोरणीपणामुळे काही जण उघडपणे सांगू शकत नसले तरी खासगी स्वरूपात सांगतात. आम्ही त्यांचे संघटन आधी करतो जे स्वत:ला हिंदू मानतात. कारण आमचा  कोणी शत्रू नाही, ना विश्वात, ना देशात. आम्हाला शत्रू मानणाऱ्यांपासून स्वत:चे रक्षण करताना आमची आकांक्षा त्यांना संपवण्याची नाही, त्यांना सोबत घेण्याची, जोडण्याची आहे. हेच खरे हिंदुत्व आहे.

prakash amedkar narendra modi
“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
Uddhav Thackeray
“कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात, असा अर्थसंकल्प सादर”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘‘संघ ज्या बंधुभावनेने काम करतो, त्या भावनेचा मूळ आधार एकच आहे तो म्हणजे विविधतेतील एकता. परंपरेने चालत आलेल्या या चिंतनालाच जगाने हिंदुत्व असे म्हटले आहे. त्यामुळेच आमचे राष्ट्र हे हिंदुराष्ट्र आहे असे आम्ही म्हणतो. पण याचा अर्थ आम्हाला मुस्लीम नको आहेत असा होत नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल त्या दिवशी ते हिंदुत्व राहणार नाही. वसुधैव कुटुंबकम् असेच हिंदुत्वात म्हटले जाते,’’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोहन भागवत यांनी केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘भविष्यातील भारत’ या विषयावर झालेल्या व्याख्यानमालेत त्यांनी हे उद्गार काढले.

काही वेळा विशिष्ट काळात आणि परिस्थितीत एखादी भूमिका घेतल्यामुळे मूळ विचार आणि स्वभावाचे विस्मरण होते. भारताचा आत्मा, ओळख, त्याचे वैशिष्टय़ अर्थात हिंदुत्वाचेही असेच आहे. भारतीयत्व हे अध्यात्माधारित, एकात्म आणि समग्र जीवनदृष्टीने परिपूर्ण असे सर्वसमावेशक आहे. केवळ मानवाच्याच नव्हे तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याण, समन्वय आणि शांतीची कामना हिंदू प्रार्थना आणि तत्त्वज्ञानात केलेली आहे. त्यामुळेच हिंदूंनी स्वत:ला हिंदू असे म्हटले नाही. व्यापार आणि अन्य कारणांसाठी बाहेर गेलेल्या भारतीयांना अन्य लोकांनी ‘सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्यांना’ हिंदू हे नाव दिले. या कारणामुळे या भूखंडावर राहणाऱ्यांना हिंदू म्हटले जाऊ  लागले. या सगळ्यांचा आधार एकच होता – ‘एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति।’, अर्थात विविधतेच एकता आणि जीवनाचे अध्यात्माधारित चिंतन.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापासून १९०५ च्या वंगभंगविरोधी आंदोलनांमध्ये हिंदू मुसलमान सर्व जण एकत्र लढले होते. त्यानंतर हिंदू मुसलमान यांच्यामध्ये विरोध आणि द्वेषाचे बीज पेरण्याचे राजकारण सुरू झाले, ज्याची परिणती देशाचे विभाजन होण्यात झाली. हिंदू-मुस्लिमांतील भेदाभेद हा त्याचा आधार होता. तत्कालीन सामाजिक वादविवाद आणि चर्चामध्ये मुस्लिमांची बाजू कायम हिंदूविरोधी आणि भारतविरोधी असे. तेव्हाच्या अनेक हिंदू नेत्यांच्या भाषणात झळकलेला मुस्लीमविरोध ही समाजाची सार्वकालिक धारणा नसून केवळ परिस्थितिजन्य प्रतिक्रिया होती. मूळ हिंदू विचार हा  एक्स्लुझिविस्ट नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील व्याख्यानात म्हटले होते, ‘‘मला आपणांस सांगताना आभिमान वाटतो की, मी अशा धर्माचा अनुयायी आहे ज्यात इंग्रजी exclusion या शब्दाला संस्कृत पर्यायी शब्द अस्तित्वात नाही.’’ इन्क्लुसिव्ह

सेमेटिक विचार मानवाचे दोन भागांत विभाजन करतात. एक, त्यांना साथ देणारे सज्जन, विश्वसनीय लोक आणि दुसरे, शत्रुपक्षातील लोक, ‘काफिर’ असल्यामुळेच निषिद्ध आणि निर्भर्त्सनीय आहेत व जगण्यालाही लायक नाहीत असे लोक. कम्युनिस्ट विचारांचे मूळ सेमेटिक असल्याने त्यांच्यावरही  एक्स्लुझिविस्ट विचारांचा पगडा दिसून येतो. आपण जर डाव्या विचारांशी सहमत नसाल तर उजव्या विचारसरणीचे आहात आणि पर्यायाने निषेधास पात्र आहात. या लोकांनी हिंदू विचारांची मांडणीदेखील अशाच द्वंद्वात्मक पद्धतीने केली आहे. त्यांचा विरोध करताकरता हिंदूंची परिस्थितिजन्य विचारसरणीदेखील तशीच बनली तर स्वाभाविकच म्हणावे लागेल.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी झालेले भारताचे विभाजन हे केवळ ब्रिटिश सत्तेचे विभाजन होते. लोकसंख्येचे स्थानांतरण यात अंतर्निहित नव्हते, हजारो वर्षांपासून समाज एकच होता. विभाजनानंतर एकीकडे, भारतात मुस्लीम अल्पमतात होते तर दुसरीकडे पाकिस्तानात हिंदू. दोघांनाही समान अधिकारांचे आश्वासन दिले गेले होते. दोन्ही देशांची राज्यघटनादेखील एकाच वेळेस लिहिली गेली होती. परंतु, सेमेटिक परंपरेनुसार मुस्लीमबहुल पाकिस्तानच्या राज्यघटनेत बिगरमुस्लिमांना समान अधिकार दिले गेले नाहीत. याउलट भारताच्या राज्यघटनेने हिंदू परंपरेनुसार सर्व धर्माना (रिलिजन्स) समान मानले, त्यांना समान अधिकार दिले गेले. हे भारतीय राज्यघटनेचे हिंदुत्व आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेत सेमेटिक विचारांच्या प्रभावातून अल्पसंख्याक ही संकल्पना घेतली गेली. हिंदुत्वामुळे भारतात रिलिजनच्या नावावर कधीही भेदभाव केला गेला नाही. त्यामुळेच भारताच्या संदर्भात अल्पसंख्याक ही संकल्पना अप्रस्तुत ठरते.

दुर्दैवाने स्वतंत्र भारतात राजकीय स्वार्थापोटी हिंदुत्वास विरोध आणि मुस्लीम-ख्रिश्चनांचे तुष्टीकरण होत आले आहे. हिंदू समाजही काही ठिकाणी विरोध करण्यासाठी कट्टरपंथी, हिंसक मुस्लिमांशी लढला. या कारणामुळे मुस्लिमविरोधी भाव मनात जोपासला गेला. परंतु, भारतातील सर्व मुस्लीम आणि ख्रिश्चन हे मुळात हिंदूच होते. हिंदू समाजाची दुर्बलता तसेच अन्य कारणांमुळे त्यांना आपली उपासनापद्धती सोडावी किंवा बदलावी लागली. परंतु आजही हिंदूंप्रमाणेच तेदेखील भारताचे अविभाज्य घटक आहेत. मुस्लिमांच्या हिंदूविरोधामुळे हिंदू समाजाची हानी होऊ  नये याची पुरेशी काळजी घेताना किंवा तशी व्यवस्था करताना, ते ही कधीकाळी हिंदू होते हे विसरून चालणार नाही. त्यांना टाळून भारताच्या भविष्याचा विचार करणे हा सेमेटिक (एक्स्लुझिविस्ट) विचार झाला, जो भारतीय नाही. भारताचा विचार हिंदुत्वाधारित असल्याने सर्वसमावेशक (इन्क्लुसिव्ह) आहे. काही ठिकाणी प्रतिक्रियात्मक मुस्लीमविरोध दिसून आला तरीही, भारतातील मुस्लिमांमध्ये भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्वाची जाणीव निर्माण करून, त्यांना सोबत घेऊन भारताचे भविष्य घडवणे हीच हिंदुत्वाची ओळख आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींनी प्रसिद्ध पत्रकार डॉ. सैफुद्दिन जिलानी यांना दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे.

डॉ. जिलानी : भारतीयीकरणाबाबत खूप चर्चा झाली आहे, अनेक भ्रमही तयार झाले आहेत. हे भ्रम कसे दूर करता येतील?

श्री गुरुजी : भारतीयीकरण म्हणजे सर्वाना हिंदू करणे नव्हे.  आपण सर्व याच भूमीचे पुत्र आहोत हे सत्य समजून घेतले पाहिजे. याबाबत आपली निष्ठा ढळू न देणे हे अनिवार्य आहे. आपण सर्व एकाच मानवसमूहाचा भाग आहोत, आपले पूर्वज एक आहेत, त्यामुळेच आपबल्या आकांक्षाही एकच आहेत, हे समजून घेणे हेच खऱ्या अर्थाने भारतीयीकरण होय. एखाद्याने आपल्या पूजापद्धतीचा त्याग करावा असा भारतीयीकरणाचा अर्थ नाही. उलट आमचे तर असे म्हणणे आहे की एकच एक उपासनापद्धती संपूर्ण मानवजातीसाठी सोयीची नाही.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आपल्या व्याख्यानात म्हणाले, ‘‘राष्ट्र या नात्याने आपणा सर्वाची ओळख हिंदू अशीच आहे. काही जण स्वत:ला हिंदू म्हणवणे गौरवास्पद मानतात आणि काहींच्या मनात त्याबाबत तितकासा गौरव नाही, यालाही काही हरकत नाही. राजकीय धोरणीपणामुळे काही जण उघडपणे सांगू शकत नसले तरी खासगी स्वरूपात सांगतात. ओळख विस्मृतीत गेली आहे असेही काही आहेत. हे सगळे आपलेच आहेत, भारतीय आहेत परीक्षेतच प्रश्नपत्रिका हाती आल्यावर आपण सोपे प्रश्न आधी सोडवतो आणि नंतर कठीण प्रश्नांना हात घालतो, तसेच आम्ही त्यांचे संघटन आधी करतो जे स्वत:ला हिंदू मानतात. कारण आमचा  कोणी शत्रू नाही, ना विश्वात, ना देशात. आम्हाला शत्रू मानणाऱ्यांपासून स्वत:चे रक्षण करताना आमची आकांक्षा त्यांना संपवण्याची नाही, त्यांना सोबत घेण्याची, जोडण्याची आहे. हेच खरे हिंदुत्व आहे.’’

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, ‘तुम्ही मुसलमान आहात म्हणून मी हिंदू आहे. अन्यथा मी तर विश्वमानव आहे.’

भारताचा अर्थात हिंदुत्वाचा सर्वसमावेशी विचार तसेच संस्कार इन्क्लुसिव्ह  कसा हे स्पष्ट करणारी एक इंग्रजी कविता मला स्मरते.

He drew a circle and kept me out.

A heretic, a rebel and somebody to flout.

But love and I had a wait to win.

We Drew a circle and took him in.

लेखक रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह आहेत.

अनुवाद – मृदुला राजवाडे