भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमहर्षक कसोटी मालिकेने सरत्या वर्षांला निरोप देतानाच नव्या वर्षांत क्रीडापटूंसह तमाम चाहत्यांना आता नव्या आव्हानांचे वेध लागले आहेत. यंदाच्या वर्षांतील यशापयश मागे सारून नव्या वर्षांत ताज्या दमाने खेळण्यासाठी क्रीडापटू एव्हाना सज्ज झाले आहेत.

येत्या वर्षांत क्रिकेटपटूंना क्षणाचीही उसंत घेता येणार नाही, असे भरगच्च वेळापत्रक आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याव्यतिरिक्त न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे या संघांशी दोन हात करावे लागणार आहेत. त्याशिवाय आयपीएल हा करमणुकीचा सोहळा आटोपल्यानंतर ३० मेपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची रणधुमाळी रंगणार आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे बिगुलसुद्धा जुलै महिन्यात वाजणार आहे. सर्वाधिक आकर्षण असेल ते इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे. विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी जगभरातील १० संघांनी कंबर कसली असली तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०११नंतर विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

फुटबॉलप्रेमींना वर्षांच्या सुरुवातीला एफसी आशियाई चषकाची मेजवानी मिळणार आहे. त्याशिवाय महिलांचा फिफा विश्वचषक, कोपा अमेरिका यांसारख्या स्पर्धाची पर्वणी चाहत्यांसाठी असेल. याव्यतिरिक्त २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धा आणि बॅडमिंटन, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स, टेनिस यांसारख्या खेळांमधील काही प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय खेळाडूंनी एव्हाना लक्ष केंद्रित केले असेल.

क्रिकेट

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका : १२ ते १८ जानेवारी
  • न्यूझीलंड दौरा : २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी (एकदिवसीय, ट्वेन्टी-२० मालिका)
  • झिम्बाब्वेचा भारत दौरा : मार्च (३ ट्वेन्टी)
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) : २९ मार्च ते १९ मे
  • आयसीसी क्रिकेट विश्वचषक : ३० मे ते १४ जुलै
  • आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : जुलै २०१९ ते एप्रिल २०२१ (वेळापत्रक ठरलेले नाही)
  • दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा: ऑक्टोबर ते नोव्हेंबर (तारीख व वेळापत्रक ठरलेले नाही)

 

फुटबॉल

  • एफसी आशियाई चषक : ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी (संयुक्त अरब अमिराती)
  • २० वर्षांखालील नेशन्स चषक : २ ते ७ फेब्रवारी (दक्षिण आफ्रिका)
  • यूईएफए पुरुष अजिंक्यपद (१७ वर्षांखालील) : ३ ते १९ मे (रिपब्लिक ऑफ आर्यलड)
  • यूएफा महिला अजिंक्यपद (१७ वर्षांखालील) : ५ ते १७ मे (बल्गेरिया)
  • फिफा विश्वचषक (१७ वर्षांखालील) : ५ ते २७ ऑक्टोबर (पेरू)
  • फिफा विश्वचषक (२० वर्षांखालील) : २३ मे ते १५ जून (पोलंड)
  • फिफा महिला विश्वचषक : ७ जून ते ७ जुलै (फ्रान्स)
  • कोपा अमेरिका: १४ जून ते ७ जुलै (ब्राझील)

 

टेनिस

  • ऑस्ट्रेलियन खुली : १४ ते २७ जानेवारी
  • फ्रेंच खुली: २० मे ते ९ जून
  • विम्बल्डन: १ ते १४ जुलै
  • अमेरिकन खुली: २६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर

 

बॅडमिंटन

  • जागतिक अजिंक्यपद : १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट (स्वित्र्झलड)
  • ऑस्ट्रेलियन खुली : २० ते २३ फेब्रुवारी
  • सिंगापूर खुली : ९ ते १४ एप्रिल
  • आशियाई अजिंक्यपद : २३ ते २८ एप्रिल (चीन)
  • मलेशिया खुली : १८ ते २३ मे
  • हैदराबाद खुली : ६ ते ११ ऑगस्ट

 

नेमबाजी

  • आशियाई अजिंक्यपद : ३ ते ११ नोव्हेंबर
  • कनिष्ठ विश्वचषक : १९ ते २९ मार्च (सिडनी)
  • आयएसएसएफ विश्वचषक : २० ते २८ फेब्रुवारी (नवी दिल्ली)
  • आशियाई अजिंक्यपद (१० मी एअर पिस्तूल) : २५ मार्च ते २ एप्रिल (चायनीज तैपई)
  • आयएसएसएफ विश्वचषक : २१ एप्रिल ते २९ एप्रिल (चीन)
  • आयएसएसएफ विश्वचषक : २४ मे ते ३१ मे (जर्मनी)
  • आयएसएसएफ विश्वचषक : २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर (ब्राझील)

 

हॉकी

  • आंतरराष्ट्रीय प्रो लीग (पुरुष) : १९ जानेवारी ते ३० जून, नेदरलँड्स
  • हॉकी इंडिया लीग : डिसेबर (तारीख व वेळापत्रक ठरलेले नाही)
  • सुल्तान अझलन शाह चषक : २३ ते ३० मार्च, मलेशिया

 

फॉम्र्युला-वन

  • ७ मार्चपासून ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. द्वारे मोसमाला सुरुवात

 

अ‍ॅथलेटिक्स

  • आशियाई अजिंक्यपद : २१ ते २४ एप्रिल (कतार)
  • जागतिक अजिंक्यपद : २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर (कतार)
  • आंतरराष्ट्रीय डायमंड लीग : ३ मे (कतार)

 

बास्केटबॉल

  • फिबा कुमार विश्वचषक (१९ वर्षांखालील) : २९ जून ते ७ जुलै (ग्रीस)
  • फिबा बास्केटबॉल विश्वचषक : ३१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर (चीन)

 

संकलन : ऋषिकेश बामणे