वाहनातील इंधन म्हणून केवळ पेट्रोल-डिझेलचा पर्याय सध्या तरी महागडा ठरू पाहत आहे. खिशावर भार होत असलेला हा मार्ग जर का टाळला तर? यावरचे उत्तर असे की, एकाहून अधिक इंधनांवर वाहन चालवणे.
भारताची विक्रमी इंधन आयात २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ८७ टक्क्यांवर पोहोचली आहे. या इंधनावलंबनाचा किमती चढणीला राहण्याची शक्यता आहे. अर्थात, पेट्रोल-डिझेलसह अन्य स्वस्त इंधन पर्यायांची वाट चालावी लागणे गरजेचे ठरले आहे. यासाठी संशोधकांनी फ्लेक्सिफ्युएल तंत्रज्ञान विकसित केले आहे. ऊस व मक्यापासून इथेनॉलची निर्मिती होत असल्याने स्वस्त पर्याय ठरला आहे. जगभरात दोन कोटी वाहने फ्लेक्सिफ्युएलवर धावतात. ५१ ते ८३ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचा वापर करता येईल, अशी रचना वाहनांच्या इंजिनमध्ये आहे.
‘फ्लेक्सिफ्युएल’ची वैशिष्टय़े
* फ्लेक्सिफ्युएल स्वच्छ इंधन म्हणून गणले जाते. त्यामुळे वातावरणात कमी प्रमाणात विषाक्त धूर सोडते. शिवाय ग्रीनहाऊस वायूंचेही या इंधनातून कमी उत्सर्जन
होते.
* फ्लेक्सिफ्युएल वाहनातील इंजिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मिश्र इंधनाचे कितीही प्रमाणात ज्वलन करू शकते.
* वाहनाच्या इंधनटाकीत मिश्र इंधनाचे प्रमाण मोजण्यासाठी सचेतक (सेन्सर). हे सचेतक इंधनाचा आवश्यकतेनुसार वापर करण्यासाठी उपयोगी.
* आधुनिक फ्लेक्सिफ्युएल कारमध्ये १० ते ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचा वापर करता येईल.
* आधुनिक फ्लेक्सिफ्युएल वाहने ही इथेनॉलवर चालतात. ऊस आणि मक्यापासून इथेनॉलची निर्मिती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यास साह्यकारी.
* फ्लेक्सिफ्युएल वाहने ओळखण्यासाठी त्यांच्या इंधनटाकीवर पिवळय़ा रंगाची झाकणे वा इंधनटाकीच्या मुखाशी पिवळी रिंग.
स्लाव्हिया, कुशाक नव्या रूपात
स्कोडा कंपनीने कुशाक आणि स्लाव्हिया या कार मॉडेल्सचे स्पेशल लिमिटेड एडिशन बाजारात आणल्या आहेत. कंपनीच्या दोन्ही नवीन कार्स दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.
कुशाक आणि स्लाव्हिया ही दोन्ही मॉडेल्स भारत २.० प्रोग्रॅम अंतर्गत तयार करण्यात आली आहेत.
स्कोडा स्लाव्हिया अॅम्बिशन प्लस मॉडेलच्या कारची किंमत भारतीय बाजारात १२.४९ लाख (एक्सशोरूम) रुपये आहे. कुशाक ऑनिक्स प्लस मॉडेलच्या कारची किंमत १२.४० लाख रुपये (एक्सशोरूम) इतकी आहे. हे मॉडेल कॅण्डी व्हाईट आणि कार्बन स्टील पेंट स्कीम अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.