‘नेमीचि येतो मग पावसाळा’ अशा अर्थाची एक म्हण, आमच्या लहानपणी ऐकू येत असे. त्याचा अर्थ असा होता की, पावसाळा हा ऋतू दरवर्षीच येतो. दुसरा अर्थ असा अभिप्रेत होता की, पावसाळा नेमीच म्हणजे नियमितच येतो. ७ जूनला मृग नक्षत्र लागत असे. पावसाला सुरुवात होत असे. (एखाद्या वर्षाचा अपवाद होत असे.) शेतकरी वर्ग आनंदात असे. अक्षय तृतीयेपूर्वीच पिकांचे नियोजन करून, पेरणीसाठी जमिनीची तयारी केली जात असे व मृग नक्षत्राचा पाऊस बहुतेक वर्षी, अगदी वेळेवरच येत असे. हे होते, साधारण ६०-७० वर्षांपूर्वीचे चित्र.

गेल्या वीस- पंचवीस वर्षांत हे चित्र अगदी बदलून गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळा, हळूहळू पण निश्चितपणे, अनियमित व्हायला लागला आहे व हल्ली तर त्याचे घड्याळ पारच बिघडून गेले आहे. कधी ‘अल निनो’ चे कारण सांगितले जाते, तर कधी ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे . (यंदा पाऊस वेळेवर सुरु झाला. मध्ये तो लांबल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली. तोवर पावसाने धुमाकूळ घातला आणि पुराची भीती वाटायला लागली.)

Ragi, Maharashtra, Cultivation, Health Benefits, Agriculture, High Yield, Nutrition, Medicinal Properties, Organic Farming,
आरोग्यदायी नाचणीची लागवड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
lok shivar challenges of heavy rain for farmers excessive impact rain on crops
लोक शिवार : अतिवृष्टीचे आव्हान
Silk worm farming by tribal farmers
Silk Worm Farming : आदिवासी शेतकऱ्यांचा रेशीम शेतीचा प्रयोग
crop damage by snail attack
Snails Damage Crops : शंखी गोगलगायींचापिकांवरील प्रादुर्भाव
how to plant grow and care for ginger
Ginger Crop Information : आल्याची लागवड!
article about seed bank in shirol taluka
देशी बीज बँक!
Opposition politics in the name of Naxalites Government movements
लेख: नक्षलींच्या नावावर विरोधाचं राजकारण…

हेही वाचा…देशी बीज बँक!

आता शास्त्रज्ञांना कारण सांगायला आणखी एक कारण सापडले आहे. ते म्हणजे पृथ्वीच्या पोटातून गेल्या पंचवीस – तीस वर्षांत, अमाप पाणी उपसले गेले आहे. शेतीसाठी, शहरीकरणासाठी व औद्याोगिक कारणांसाठी. तर म्हणे त्याचे पुनर्भरण न झाल्यामुळे, पृथ्वीच्या पोटात प्रचंड मोठी पोकळी, विशेषत: उत्तर गोलार्धात निर्माण होऊन पृथ्वीचा आस काही सेंटीमीटरने झुकला असून त्यामुळे आधीच दाणादाण उडालेले ऋतुचक्र, आणखीच बिघडण्याचे मोठे संकट जगासमोर आता उभे ठाकले आहे.

आता एकाच ऋतूमध्ये पावसाळा, उन्हाळा, किंवा पावसाळा उन्हाळा हिवाळा, असे दोन-तीन ऋतूंचे दर्शन देण्यास देखील सुरुवात झाली आहे. अर्थात याला कारण, आपला मानवाचा अतिहव्यास व त्यापोटी झालेले वर्तन कारणीभूत आहे. तेव्हा आता माणसाचे काही खरे नाही, असे चित्र निर्माण झाले. त्याचा सर्वात मोठा व प्रथम फटका, शेती व शेतकऱ्यांनाच बसणार असे दिसते.

अशा स्थितीत आपण काय करायचे? शेतीचा धंदा निसर्गावर अवलंबून असतो तेवढे इतर कोणतेही धंदे अथवा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात निसर्गावर अवलंबून नसतात.

हेही वाचा…मेंढीपालन व्यवसाय : चालना आणि विस्तार

बर फक्त निसर्गावरच नव्हे तर दुसऱ्या अनेक विविध गोष्टींवर, शेतीचे धंदे अवलंबून आहे. ज्याचे नियंत्रण शेतकऱ्याकडे अजिबात नाही. आतापर्यंत कायमच सरकारची भूमिका शेतकऱ्याचा जीवावर, शहरी समाज व बिगर शेतकरी यांच्याकडे झुकलेली दिसते. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो. परंतु प्रश्न असा पडतो की शेतकऱ्याने शेतीच्या व्यवसायातून जायचे कोठे ? तेव्हा आहे त्यातच तग धरून टिकून तर राहिले पाहिजेच ना ?

एक वास्तव खरे आहे की, शेती संपली तर जगच संपले. सुमारे ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या हरितक्रांतीच्या प्रयोगाने आपण शेती उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढविले व आपला देश अन्नधान्याचे बाबतीत आपणच शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण केला. पण आम्हा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेचे काय? आमच्या आर्थिक प्रगतीचे काय? असे प्रश्न यातून उपस्थित राहतात. तेव्हा आता शेतकऱ्यांनी आपले आपणच गुरू झाले पाहिजे. आपल्या शेतीच्या प्रयोगशाळेत, आपल्याच अनुभवातून आलेली शहाणीव जमेस धरून आपला मार्ग आपण शोधला पाहिजे.

संपूर्ण देशातील सर्व शेतकरी संघटना या एकत्र येण्याची काळाची गरज आहे. उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा मिळवून किमान हमी भाव (एमएसपी) मिळायला हवा. यासाठी सरकारवर सर्व मार्गाने दबाव आणला गेला पाहिजे. शेतकरी हाच धर्म व शेतकरी हीच जात हा यामागे शेतीनिष्ठ विचार हवा. याला राजकीय कंगोरे नकोत.

तसेच गेल्या पन्नास वर्षात, हरितक्रांतीने आपल्या शेतीमध्ये उत्पादन निश्चितच वाढले आहे, पण त्याचबरोबर उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च हा देखील वाढतच आहे. इतकेच नव्हे तर दुसरीकडे शेतजमिनी देखील खराब होऊ लागल्या आहेत. दरवर्षी एकरी पीक उत्पादन वाढवण्यासाठी, वाढता खर्च करावा लागतो आहे.

हेही वाचा…लेख: नक्षलींच्या नावावर विरोधाचं राजकारण…

Law of diminishing returns याचा अभ्यास केला गेला पाहिजे. उत्पादन वाढीसाठी दर एकरी करावा लागणारा जादा भांडवली खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. शेती उत्पादनाचा खर्च आणि उत्पन्न (इनपुट कॉस्ट व आउटपुट कॉस्ट) यांचे गणित आता जमेनासे झाले आहे. एकीकडे ऋतूचक्र हे बेभरवशाचे झाले आहे. हवामान, पाणी, मजुरी, विपणन हे सर्वच आता बेभरवशाचे झालेले आहेत. तेव्हा यंदाच्या खरीप हंगामाची तयारी करताना खालील गोष्टी जरूर लक्षात घ्यायला हव्यात.

बदलते ऋतुमान (हवामान ) यापासून काही प्रमाणात तरी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. हरित क्रांतीपूर्वी आपण जी पारंपरिक शेती करीत होतो, त्यातल्या सर्वच गोष्टी अवैज्ञानिक नव्हत्या तर त्यातील काही पद्धती पूर्ण वैज्ञानिक तत्त्वावर आधारित होत्या. अनुभवाने सिद्ध झाल्यावर त्याचा वापर होत होता. त्याचा देखील योग्य विचार करावा. हेतू हा की, जागतिकीकरणानंतर वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचा सामना करताना नवीन गोष्टींबरोबर, अनुभवसिद्ध गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्यात. त्या खालीलप्रमाणे.

-आजच्यासारखे एकसूरी पिके न लावता विविध पिके घेतली पाहिजेत.

-पिकांचा फेरपालट करावा. पीक बदल क्रमवारी ( क्रॉप रोटेशन) पाळावे म्हणजे किडी व रोगांपासून कमी प्रमाणात नुकसान होईल.

-मिश्र पिके, ( द्विदल व एकदल पिके) शक्य असेल तेथे घ्यावे. नत्र व स्फुरद काही प्रमाणात का होईना, नैसर्गिकरीत्या मिळण्यासाठी अशी द्विदल व एकदल पिके एकत्रित घेतल्याचा फायदा होतो.

-हिरवळीची पिके शक्य असल्यास जरूर घ्यावे व ते जमिनीत गाडून त्याचे कंपोस्ट करावे.

-आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी किमान एक एकर शेती राखीव ठेवावी. फक्त आपण व आपल्या कुटुंबाचे जवळचे नातेवाईकांची, अन्नाची गरज भागेल, अशासाठी शक्य असल्यास राखीव ठेवावी. त्यात उत्तम चवीची, उत्तम स्वाद -सुवास असलेली पिके लावावीत. अन्नधान्याचे पिके, कडधान्ये, द्विदल पिके, तेलबियाची पिके, फळझाडे, तसेच लिंबूवर्गीय फळझाडे अशी विविध पिके या आपल्या राखीव एक एकरात आपण शक्यतो सेंद्रिय / नैसर्गिक शेतीद्वारा घ्यावीत.

-प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरात, एक तरी देशी गाय असावी. तेव्हा आपल्या कुटुंबाचे आरोग्य हे देखील महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे अर्थात मजुरांची उपलब्धता, पडणारी किंमत, वेळ हे सर्व जुळून आले तरच.

-संवर्धित शेती, विना मशागत शेती, तण देई धन इत्यादीचा उपयोग आजमावा.

हेही वाचा…पेरणीपूर्व मशागत : काही प्रश्न आणि काही भूमिका

-जमिनीला अधून मधून विश्रांतीची देखील गरज असते जेणेकरून एकंदरीत शेतीमध्ये जिवाणू वाढावेत व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण देखील वाढावे म्हणजे शेतीतील उत्पादकता नैसर्गिकरीत्या आपोआपच वाढते.

-बाजारात येणारे नवनवीन संशोधन व त्यावर आधारित नवीन नवीन तंत्रज्ञान इत्यादी गोष्टी सुरुवातीला थोड्याच क्षेत्रात आजमावून पहावे. आलेल्या अनुभवातून मार्गक्रमण करावे एवढेच. ही यादी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पूर्वअनुभवातून आणखी वाढवता येईल. हेतू हा की, केवळ नवीन तंत्रज्ञान आले म्हणून जे जुने पारंपरिक तंत्रज्ञान शेकडो वर्षाचा अनुभवावर आधारित व उत्पादक होते ते केवळ जुने झाले म्हणून विसरून चालणार नाही. एकीकडे खर्चात बचतही व्हावी. दुसरीकडे उत्पादन व उत्पादकता देखील वाढावी.