अनेक प्राण्यांच्या शरीरात चुंबकत्व आढळते. कबुतरे, देवमासे, डॉल्फिन, मधमाशा; एवढेच काय पण; मानवी शरीरातसुद्धा चुंबकीय पदार्थ असतात. या चुंबकीय पदार्थाचा उपयोग हे प्राणी होकायंत्रासारखा दिशा ओळखण्यासाठी करतात.

आकाशातून उडताना पक्षी सूर्याच्या स्थानावरून दिशा ओळखतात. पण, ढगाळ हवामानात सूर्याचे नेमके स्थान कळत नसल्याने दिशा ओळखणे कठीण जाते. कबुतरांच्या मानेत आणि डोक्यात मॅग्नेटाइट या चुंबकाश्माचे सूक्ष्म स्फटिककण असतात. या स्फटिककणांच्या चुंबकत्वाचा वापर करून ढगाळ हवामानात कबुतरे अचूक दिशेने मार्गक्रमण करतात. विल्यम किटोन या अमेरिकन शास्त्रज्ञाने याविषयी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

कबुतरांच्या मानेमध्ये खरोखरच चुंबकीय स्फटिककण असतात का, हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. त्यांनी कबुतराच्या मानेवर एक लहानसा चुंबक बांधला. मानेवर बांधलेल्या चुंबकाच्या प्रभावामुळे कबुतराच्या शरीरात असलेले चुंबक स्फटिककण योग्य रीतीने काम करेनासे झाले आणि साहजिकच, कबुतराला अचूक दिशेने मार्गक्रमण करणे शक्य झाले नाही. 

देवमासे व्हेल, डॉल्फिन, शार्क यांच्या शरीरामध्येसुद्धा चुंबकीय पदार्थ असतात. महासागरातून प्रवास करताना हे जलचर त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या या चुंबकीय पदार्थाचा उपयोग करतात. जेव्हा हे जलचर महासागरांतून मार्गक्रमण करतात तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे अतिशय क्षीण प्रत्यावर्ती विद्युतधारा तयार होतात. या प्रत्यावर्ती विद्युतप्रवाहाचा उपयोग जलचर विद्युतचुंबकीय होकायंत्रासारखा करतात आणि दिशा ओळखतात.

मधमाशा, वाळवी, बीटल किंवा भुंगे, मुंग्या, घरमाशा इत्यादी कीटकांच्या शरीरात चुंबकीय क्षेत्रामुळे प्रभावित होणाऱ्या संवेदी चेतापेशी असतात. त्यांचा वापर करून हे कीटक मार्ग शोधतात. तळी आणि डबक्यांमध्ये आढळणाऱ्या ‘मॅग्नेटोस्पिरिलम मॅग्नेटीकम’ नावाच्या सूक्ष्मजीवांच्या शरीरातसुद्धा अतिसूक्ष्म आकाराच्या चुंबकीय स्फटिकांच्या माळा आढळतात. बाह्यचुंबकीय क्षेत्रात हे सूक्ष्मजीव ठेवल्यास चुंबकसूचीप्रमाणे एका विशिष्ट दिशेत ते स्थिर होत असल्याचे आढळते. पाण्याच्या पृष्ठभागाखाली जिथे पाण्यातल्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असते तिथे हे सूक्ष्मजीव आढळतात. अधिक प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात हे सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत. आपल्याला अनुकूल प्रमाणात ऑक्सिजन असलेली पाण्यातली जागा शोधून काढण्यासाठी ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करत असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

वनस्पतींच्या बियासुद्धा चुंबकीय क्षेत्रामुळे प्रभावित होतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या सुमारे दहा पट तीव्र चुंबकीय क्षेत्रात बिया ठेवल्यास त्यांचे बीजांकुरण आणि वनस्पतींची वाढ सुमारे १५ टक्क्यांनी जास्त होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org