Premium

अवांतर : मतिमान आणि गतिमानही..

या घडीला भारतात मालाची ने-आण करण्यासाठी हलक्या वाहनांचा (लो डेक) उपयोग किफायतशीर ठरत आहे.

iev 3 and iev 4 electric small trucks
अशोक लेलँडने सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘आयईव्ही-थ्री आणि आयईव्ही-फोर’ या हलक्या माल वाहतूक ई-वाहनांची घोषणा केली

गोविंद डेगवेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या टाटा, महिंद्रा, बजाज, अशोक लेलँड, पिअ‍ॅजिओ या प्रमुख कंपन्यांनी हलक्या मालवाहू वाहनांच्या निर्मितीत वैविध्य आणले आहे. अशोक लेलँडने सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘आयईव्ही-थ्री आणि आयईव्ही-फोर’ या हलक्या माल वाहतूक ई-वाहनांची घोषणा केली, ती मुळातच मतिमान आणि गतिमान व्यावसायिक तत्त्वे नजरेसमोर ठेवून.

या घडीला भारतात मालाची ने-आण करण्यासाठी हलक्या वाहनांचा (लो डेक) उपयोग किफायतशीर ठरत आहे. मालवाहतुकीतील ई-वाहन निर्मिती हे लक्ष्य आणखी एका टप्प्यावर आले आहे, ते म्हणजे इंटेलिजन्स व्हेइकल अर्थात मतिमान. म्हणजे बुद्धीच्या आधारे वाहतूक. विजेवर धावणाऱ्या वाहनांची क्षमता दीर्घ पल्ल्यापर्यंत वाढविण्यासह चालकाला स्मार्ट अर्थात आरामदायी अनुभव देण्याचा पर्याय कंपन्यांचा विचार आहे.

हेही वाचा >>> खुशखबर! आता WhatsApp वरून करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या

संधीच्या मार्गावर

पार्सल आणि कुरियर, ई- कॉमर्स, ग्राहकलक्ष्यी बंदिस्त माल आणि घरगुती मोठय़ा इलेक्ट्रॉनिक उपकरणांची वाहतूक, शिवाय संघटित किरकोळ मालाची वाहतूक क्षेत्रे हलक्या ई-वाहनांसाठी खुले आहेत.

स्वस्त पर्याय

विजेवर चालणाऱ्या हलक्या वाहनांमुळे क्षमता आणि परवडणारे पर्याय ग्राहकांसमोर ठेवण्यात यश. मध्यम पल्ल्यातील अर्थात शहरांतर्गत मालवाहतूक, निर्मिती आणि पुरवठादारांसाठी नफ्याची. शिवाय इंधन दरांतील चढ-उतारांचा मालवाहतूक ई-वाहनांच्या किमतीवर कोणताही फरक पडत नाही. त्याच वेळी वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीवरही जास्त पैसा खर्च करावा लागत नाही. 

हेही वाचा >>> अवांतर : दहा हजारांत देखणा

निर्णायक 

कारखानदार आणि ग्राहक या दोन्हीमधील दुवा म्हणून ई-वाहन हा नवा पर्याय. कारखानदार आणि ग्राहक यांच्या गरजांमधील निर्णायक घटक. कमी वेळेत अधिक चार्जिगच्या सोयीमुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीतील सक्षमता 

कल्पक

पारंपरिक इंधनाच्या तुलनेत ई-वाहनांवरील खर्च कमी. वाहतुकीवरील खर्च कमी झाल्याने अधिक अंतरापर्यंत ग्राहकांना सेवा पुरविणे परवडणारे. ग्राहकांची गरज वेळेत पूर्ण करण्याची पुरवठादारांसमोर संधी. त्यातून दृढ विश्वासनिर्मिती.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashok leyland launched iev 3 and iev 4 electric small trucks zws

First published on: 21-09-2023 at 02:49 IST
Next Story
चावडी: कोंबडा आरवलाच