प्रदीप नणंदकर

जगातील सुमारे ३० देशांत अश्वगंधाचे उत्पादन घेतले जाते. कोरडे हवामान असणाऱ्या प्रदेशात अतिशय कमी पाण्यात ही वनस्पती येते. खरीप आणि रब्बी या दोन्हीही हंगामात या वनस्पतीची लागवड केली जाते. साधारण पाच ते सहा महिन्यांत या वनस्पतीचे उत्पादन होते. सध्याच्या करोना काळात या अश्वगंधाची जगभरच मागणी वाढली आहे. अश्वगंधाच्याच शेतीविषयी..

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…

आसकंद ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अश्वगंधा, ढोरकामुनी, ढोरगुंज, कामरूपिनी या नावाने ही ओळखली जाते. आयुर्वेदिक उपचारातील ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. शक्तिवर्धक, पचनशक्ती वाढवणारी, रोगप्रतिकारक म्हणूनही याचा वापर होतो.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अश्वगंधाची जगभरच मागणी वाढली आहे. जगातील सुमारे ३० देशांत या वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते. या वनस्पतीचा उल्लेख पुराणकाळातही आढळतो. कोरडे हवामान असणाऱ्या प्रदेशात अतिशय कमी पाण्यात ही वनस्पती येते. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात या वनस्पतीची लागवड केली जाते. साधारण पाच ते सहा महिन्यांत या वनस्पतीचे उत्पादन होते. लागवड करण्याची पध्दत बियाणे शिंपडणे, पेरणी करणे किंवा रोपलावण करणे अशा तीन प्रकारची आहे. एकरी ८ ते १० किलो बियाणे लागते. २५० ते ४०० रुपयांपर्यंत बियाणाचा भाव आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतही ही वनस्पती उगवते. उग्र वास असल्याने जनावरे याला खात नाहीत. हरीण, रानडुक्कर, वानर अशा वन्य प्राण्यांपासून याला धोका नाही. साधारण पाऊण ते एक मीटपर्यंत याची उंची असते. रब्बी हंगामात हे पीक घेण्याकडे लोकांचा अधिक कल आहे.

हरभऱ्याला जेवढे पाणी लागते त्याच्या निम्मे पाणी अश्वगंधाच्या वाढीसाठी लागते. तुषार, रेनपाईप या पध्दतीने पाच महिन्यात केवळ दोन ती तीन पाणी लागतात. जमिनीच्या प्रतवारीवर एखाद, दुसरे पाणी अधिक द्यावे लागते. अश्वगंधाच्या मुळांचा वापर औषधीसाठी केला जातो. एका एकरात साधारणपणे तीन ते चार क्विंटल मुळांचे उत्पादन निघते. मोठय़ा, मध्यम व बारीक अशा तीन प्रकारच्या मुळांची प्रतवारी करावी लागते. प्रतवारीनुसार त्याचे भाव असतात. जमिनीवरील भागाला पंचांग म्हटले जाते. त्याचा वापर गुळी म्हणून केला जातो व ती विकली जाते. साधारणपणे २५ ते ३० रुपये किलोने ती विकली जाते व एकरी सव्वा ते दोन क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन होते.

मुळाला सरासरी २०० ते २२५ रुपयांपर्यंत भाव विमळतो. अश्वगंधाच्या तीन ते चार जाती असून सर्वसाधारणपणे देशी व जव्हार या दोन जाती आपल्याकडे घेतल्या जातात. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या प्रांतात अश्वगंधाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. २०२० साली लातूर तालुक्यातील मांजरी, पेठ, चिकुर्डा, बाभळगाव, येळी या पाच गावांतील पाच शेतकऱ्यांनी एकूण १५ एकरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अश्वगंधाची लागवड केली. चंदनाची रोपे तयार करणारे व त्याची देशातील १३ राज्यांत विक्री करणारे धनंजय राऊत यांनी या लागवडीसाठी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या अश्वगंधाच्या मुळात २२० रुपये किलो या दराने खरेदी करण्याचा करारही शेतकऱ्यांसोबत केला.

बाभळगाव येथे आदिती अमित देशमुख यांनी आपल्या शेतात पाच एकरात अश्वगंधाची लागवड केली आहे. सर्व पाचही शेतकऱ्यांना २२० रुपये दराने पैसे मिळाले. सरासरी लागवडीचा खर्च एकरी १५ हजार रुपये वगळता ७० हजार रुपये निव्वल उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडले त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.

यावर्षीच्या रब्बी हंगामात लातूर तालुक्यातील १७ गावात ३५० एकरावर अश्वगंधाची लागवड करण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा व कृषी निविष्ठांचा पुरवठा केला जातो. अश्वगंधाची लागवड करताना पूर्णपणे सेंद्रिय औषधे, खते याचा वापर करावा लागतो. शेणखत, गांडळूखत, व्हर्मीकंपोस्ट याचबरोबर जीवामृत, डीकंपोजर याचा वापर केला जातो. शेतकऱ्यांना घरीच डीकंपोजर तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. २०० लिटर बॅरलमधील पाण्यात २ किलो गूळ व २ लिटर डीकंपोजरचे विरजण लावले जाते. गाजीयाबाद विद्यापीठाने ९ कल्चरचा वापर करून हे औषध तयार केले आहे.

फवारणीसाठी याचा वापर केला जातो. २५ लिटर मिश्रण शिल्लक राहिल्यानंतर पुन्हा यात पाणी, दोन किलो गूळ व दोन लिटर विरजण टाकून वर्षांनुवर्षे याचा वापर करता येतो. अश्वगंधाच्या लागवडीत मुख्य खर्च हा काढणीचा आहे. याची मुळे जमिनीत जातात. साधारणपणे ७ ते ८ इंच त्या जमिनीत असतात. त्या उपसून काढाव्या लागतात. त्याची प्रतवारी करणे व त्याचे तुकडे करणे हेच महत्त्वाचे काम असते. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगामासाठीची लागवड केली जाते. मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत हे पीक काढणीसाठी तयार होते. हर्बल औषधांना आंतरराष्ट्रीय मागणी आहे त्यामुळे त्याला मोठा वाव आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत असून खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील चांगले उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागत नाही. खरिपाच्या पेरणीच्या वेळी पाऊस उशिरा होतो, काढणीच्या वेळी अतिवृष्टी होते तर रब्बीच्या वेळी पेरणी लांबते व त्यानंतर पाऊसच पडत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो.

हमखास उत्पन्न देणारी शेती

औषधी वनस्पतींची शेती ही शेतकऱ्याला आर्थिक उभारणी देणारी आहे. सतत वेगवेगळे प्रयोग शेतीत करावे लागतात. अश्वगंधाबरोबरच सर्पगंधा, कालमेह आदी वनस्पतीही चांगले उत्पन्न देणाऱ्या आहेत. अश्वगंधाचा लातुरातील प्रयोग गतवर्षी यशस्वी झाला. याहीवर्षी अधिक स्तरावर लागवड होते आहे. हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली तरीही मागणी भरपूर असल्याने हमखास विकली जाईल. शेतकऱ्यांसाठी प्रयोगशील बनण्याची गरज आहे. – धनंजय राऊत, प्रगतशील शेतकरी, पाखरसांगवी, ता. लातूर