‘कॉपरेरेट धम्म’ या कादंबरीचे कर्ते हे वकील, कंपनी सेक्रेटरी आणि चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. त्यांनी ही कादंबरी त्यांच्या गुरूला अर्पण केली आहे. हे गुरू बाबामहाराज आहेत. लेखकाची ही पहिलीच कादंबरी. ही कादंबरी आधीच्यापेक्षा जरा वेगळी आहे. ही रुढार्थाने प्रेमकथा नाही. शिवाय ती कॉपरेरेट क्षेत्राबद्दलही बरंच काही सांगू पाहते.
या कादंबरीचे लेखक हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे असल्याचे त्यांच्या प्रस्तावनेवरून आणि एकंदर लेखनावरून जाणवते. कादंबरीच्या शीर्षकावरूनच त्याची कल्पना येते.
ही कादंबरी एकाच वेळी कॉपरेरेट क्षेत्र, त्यातील माणसं, राजकारण, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, भांडवलशाहीचे फायदे-तोटे, अमेरिकेपुढे भारतीय पंतप्रधानांचे नमते धोरण आणि सुखसमाधान अशा अनेक स्तरांवर घडत जाते. या कादंबरीत कॉपरेरेट क्षेत्रात काय काय भानगडी चालतात त्याची माहिती काही प्रमाणात येते. पण त्यातही सुलभीकरण जरा जास्त केले आहे असे जाणवते.
मिलिंद दवे हे एका कंपनीचे विशेष कार्यकारी अधिकारी. रोमा ही त्यांची सुंदर पत्नी. एक सुखीसंपन्न कुटुंब. पण दवे अपघातात मरण पावतात. नंतर रोमा ते दु:ख पचवत जगण्याचा नवा मार्ग शोधून काढते. त्यानुसार जगते. तो मार्ग कोणता असतो? तर ती एके दिवशी रात्रभर ध्यानधारणा करत असते. सकाळी सूर्य उगवल्याबरोबर तिला साक्षात्कार होतो आणि तिला आवाज येतो, ‘डू युवर कर्म.. अँड एनरिच सोसायटी.’ रोमा आपले काम शांतपणे करत असते, पण एकेदिवशी तिला समजते की काही आत्मघातकी लोकांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा गुंतवला आहे. रोमा त्याविरोधात आवाज उठवते. बघता बघता त्याचे मोच्र्यात रूपांतर होते. मग काय, रोमा एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचते. मॉरिशस विद्यापीठाकडून तिला भाषणासाठी आमंत्रित केले जाते, तर टाइम साप्ताहिकाकडून ‘द मोस्ट रिस्पेक्टेड यंग वुमन’ असा गौरव केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान त्यांच्या पक्षातर्फे तिला राज्यसभेची खासदारकी देऊ करतात, पण ती नम्रपणे नाकारते. तिला राजकारणात जायचं नसतं तर तिचं काम प्रामाणिकपणे करायचं असते. ते ती करत राहते.
असे एकंदर कथानक. कादंबरीची भाषा मात्र सहज प्रवाही आहे. प्रणय, भावभावना आणि साहस यांचा संगम असल्याने ही कादंबरी किमान वाचनीयतेच्या कसोटीला उतरते हे नक्की.

कॉपरेरेट धम्म : आनंद,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : ३६४, किंमत : २९५ रुपये.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन