दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी या दिवशी घरोघरी दीप उजळले जातात.
दिवाळीचं असं प्रकोशमान स्वागत करून लक्ष्मीदेवतेक डे पुढचं वर्षही धनदौलतीचं, सुखसमाधानाचं जावो अशी मागणी के ली जाते. दिवाळीत सोनं खरेदी क रण्याक डे भारतीयांचा कल असतो. सोन्याचं भारतीय मनाला इतकं आकर्षण आहे की त्यामुळेच सोन्याच्या खरेदीविक्रीमध्ये, उलाढालीमध्ये जागतिक पातळीवर भारताला एक वेगळंच स्थान आहे. भारतात एक तर सोनं म्हणजे गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक तुम्हाला हवी तेव्हा, हवी तशी, हवी तिथे नेता येते. गेल्या दहा वर्षांत सोन्याच्या किमती ४०० पटींनी वाढल्या तरीही सोन्याची मागणी कमी झालेली नाही.
हिंदू धर्मियांमध्ये सोन्याला धार्मिक तसंच सांस्कृतिक महत्त्वही आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने ते पवित्रही आहे.
महत्त्वाच्या धार्मिक कोर्यक्र मांमध्ये सोनं घालणं हेही म्हणूनच महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच देशभर सगळीक डेच स्थानिक पातळीवरच्या सगळ्याउत्सवांमध्ये सोनं परिधान के लं जातं. दक्षिणेक डे अक्षय्य तृतीया, पोंगल, ओणम तसंच उगाडी या सणांना पूर्वेक डच्या राज्यांमध्ये दुर्गापूजेला तर पश्चिमेक डच्या राज्यांमध्ये गुढीपाडव्याला तर उत्तरेक डे बैसाखी आणि क रवा चौथ या सणांना सोन्याचे दागिने आवर्जून घातले जातात, सोन्याची खरेदीही के ली जाते.
याशिवाय भारतीय माणसाच्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवरही सोन्याला महत्त्वाचं स्थान आहे. लग्नात मुलीला भेटीदाखल सोनं देणं ही भारतीय समाजातली खूप महत्त्वाची प्रथा आहे. वर्षभरातली पन्नास टक्के सोन्याची खरेदी याच कोरणासाठी होत असते. कोही कु टुंबं तर मुलीच्या जन्मापासूनच सोन्याची खरेदी क रायला सुरु वात क रतात. लग्नात दिलेलं सोनं हे तिचं स्त्रीधन समजलं जातं.
आत्ता भारतात निम्मी लोक संख्या २५ वर्षांच्यापेक्षा क मी वयाची आहे. त्यामुळे पुढच्या दशकोत भारतात १५ दशलक्ष लग्नं होण्याची शक्यता आहे. त्यावरू नया कोळात कि ती सोन्याची उलाढाल होईल याचा अंदाज बांधता येतो. वाढत्या लोक संख्येबरोबरच दारिद्रय़रेषेबाहेर येणाऱ्या लोकोंचं प्रमाणही भारतात वाढतं आहे. पण त्याचबरोबर लोकोंच्या आवडीनिवडीही बदलत आहेत.
१९९० पर्यंत शहरी भागात राहणाऱ्या स्त्रिया पारंपरिक दागिनेच रोज वापरत. तर आजच्या कोळातल्या तरुण स्त्रियांची वेगळी अपेक्षा असते. त्यांना रोजच्या वापरासाठी सोन्याचे दागिने हवेच असतात. पण त्यांच्यात आधुनिक ता आणि परंपरांची सांगडही घालून हवी असते. त्यामुळे आताचे दागिने त्या दृष्टीने तयार के ले जातात.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2015 रोजी प्रकाशित
सोना कितना सोना है..
भारतीय माणसाच्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवरही सोन्याला महत्त्वाचं स्थान आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:

First published on: 05-11-2015 at 01:58 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of buying gold in the diwali day