आंबा हे एक कायम चर्चेतील फळ आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे हा आंबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही चर्चा यंदा चिंतेची असून कोकणचा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. पावसाचा मुक्काम लांबल्याने यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे दरवर्षी जानेवारी अखेरपासून बाजारात दाखल होणारा हापूस आंबा यंदा उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे.

ंबा खवय्यांसाठी एक चिंतेची बाब आहे. यंदा कोकणचा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे. पावसाचा मुक्काम लांबल्याने यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे दरवर्षी जानेवारी अखेरपासून बाजारात दाखल होणारा हापूस आंबा यंदा उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील आंब्याचे पीक घेतले जाते. ऑक्टोबर महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया तीन टप्प्यात साधारण जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहते. पहिल्या टप्प्यातील आंबा हा जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. या आंब्याची अतिशय चढ्या दराने विक्री होते. दुसऱ्य़ा टप्प्यातील आंबा साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात दाखल होतो. आंब्याची आवक वाढल्याने दर कमी होण्यास सुरुवात होते. तिसऱ्या टप्प्यातील आंबा हा एप्रिल महिन्यात दाखल होतो. सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने हा आंबा महत्त्वाचा असतो.

मात्र यावर्षी आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे. कारण आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे जमिनीत अद्याप ओलावा टिकून आहे. ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे.

हेही वाचा >>> लोकशिवार: आंतरपिकातील यश !

रायगड जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आली आहे. यातील १४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा उत्पादनक्षम आहे. दरवर्षी यातून २१ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन होत असते. गेल्या आठवड्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात उष्म्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो. नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्यावर मुळांना ताण बसून मोहराची प्रक्रिया सुरू होते. परंतु, दिवाळी सुरू झाली तरी अद्याप थंडी जाणवू लागलेली नाही. जमिनीतील ओलाव्यामुळे कलमांना पालवी सुरू झाली आहे. जुनी पानगळ होऊन नवीन पाने येत आहेत. पालवी जीर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिने लागतात. त्यानंतर मोहर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मोहर प्रक्रियेनंतर खऱ्या अर्थाने आंबा हंगामाला सुरुवात होणार आहे.

गेली दोन वर्षे ऑक्टोबर हीटचे प्रमाण चांगले राहिल्याने नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मोहर आला होता. मात्र, डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यात मोहर खराब झाला होता, परंतु, यावर्षी नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. धुके मात्र पडत आहे. त्यामुळे मोहर प्रक्रिया, सुरू होण्यासाठी जानेवारी उजाडण्याची शक्यता आहे.

बागायतदार चिंतेत सातत्याने येणाऱ्या हवामानातील बदलांचा आंबा पिकावर परिणाम होत आहे. या हवामान बदलांच्या संकटावर मात कशी करायची याची उत्तरे मात्र बागायतदारांना सापडतांना दिसत नाहीत. एकवेळ कीड रोग रोगांना फवारणी करता येईल, फवारणी आणि मशागत करून बागांची जोपासना करता येईल. पण बेभरवशाच्या हवामानाचे करायचे काय, याचे उत्तर बागायतदारांकडे नाही. त्यामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रात कोकणातील हापूस आंबा आणि बागायतदार दोघेही अडकल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

कृषी संशोधक काय सांगतात

आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडांच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी. आंबा बागेतील मोकळ्या जागेत उथळ अशी नांगरट करावी. बागेतील साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून आंबा बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल.

ढगाळ व दमट वातावरणामुळे नव्या येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. अशा वेळी पालवीचे सतत निरीक्षण करावे व प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त शेंडे, काड्या काढून अळीसह नष्ट कराव्या. लॅमडासायहलोथ्रीन ५ प्रवाही ६ मिली किंवा क्विनॉलफास २५ प्रवाही २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करपा रोगाच्या बंदोबस्तासाठी रोगट फांद्या काढून टाकाव्या. गळून गेलेल्या पानांचा नाश करावा. नियंत्रणासाठी अझाक्सिस्ट्रोबिन २३टक्के प्रवाही या बुरशीनाशकाची ७ मिली प्रती १०लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता असल्यास टेबूकोनोझोल २५.९ टक्के प्रवाही या बुरशीनाशकाची ७ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी १० दिवसाच्या अंतराने संपूर्ण झाडावर करावी. नवीन पालवी आली असल्यास ढगाळ व आर्द्र वातावरणामुळे पालवीचे तुडतुडे किडींपासून संरक्षण करावे.२.८टक्के प्रवाही डेल्टामेथ्रीन ९ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एका डोळ्यातून ३ ते ४ पालवी फुटत असेल तर २ पालवी काढून टाकाव्या. मजबूत पालवी ठेवावी अशी माहिती कृषी संशोधक डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिली.

हवामानातील सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असून, उत्पादन खालावत आहे. यावर्षीही हंगाम लांबण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निसर्गातील बदलाची नोंद विमा कंपन्या घेत नसल्यामुळे बागायतदारांचे दुहेरी नुकसान होत आहे.

डॉ. संदेश पाटीलबागायतदार

meharshad07@gmail.com

Story img Loader