डॉक्टर समाज कार्यकर्ता व्हावा..

पिढय़ान्पिढय़ा वैदू इमानदारीने समाजाची सेवा बजावायचे.

‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ या म्हणीप्रमाणे आपल्या समाजाचे झाले आहे. आपण संकटात असतो तेव्हा एखाद्याकडून मदतीची अपेक्षा करतो, मदत करणारा आपल्याला भला माणूस वाटतो. आजारपण हे एक असंच संकट जो मृत्यू घेऊन येतो. हा सर्वसामान्यांचा समज झाला आहे. या भीतीमुळे आपण डॉक्टरांना ‘देव’ मानू लागलो. जुन्या काळी गावात वैद्यकीय व्यवसाय करणारे वैदू असायचे, या वैदूंचे साऱ्या समाजाशी भावनिक संबंध असायचे. त्यांना पसा हा दुय्यम वाटायचा. पिढय़ान्पिढय़ा वैदू इमानदारीने समाजाची सेवा बजावायचे. आज वैदू इतिहासजमा झाले. त्यांची जागा डॉक्टरांनी घेतली. आधुनिक चिकित्सापद्धतीत झालेले आमूलाग्र बदल, वैद्यकीय शिक्षणपद्धतीत असलेले दोष, सरकारी दवाखान्यांची असलेली कमतरता, वैद्यकीय महाविद्यालयांची कमतरता असे अनेक पलू वैद्यकीय क्षेत्रातील पापकृत्यास जबाबदार आहेत, असे बोलले जाते. अवयवचोरी गेल्या दोन दशकांतील चच्रेचा विषय झाला आहे; पण अलीकडे मात्र भुरटय़ा चोरांसारखा झाला आहे. हे का वाढत आहे याचे परीक्षण केले तर लक्षात येईल. जगात अवयवदान करणाऱ्या यादीत भारताचा क्रमांक नाहीच्या बरोबर, प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्यारोपणासाठी अवयवांचा अभाव जाणवणारच. या दुष्काळास दानशूर भारतीय समाज जबाबदार आहे. आमचे अवयवदान संबंधित असलेले गरसमज अशा वेळी रक्त्याचे नातेसुद्धा अवयदानासाठी तयार होत नाही. अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे ‘उत्पन्न कमी मागणी जास्त’ असते तेव्हा वस्तूंचा काळाबाजार होतो, हा सिद्धांत तंतोतंत अवयदानासंदर्भात लागू पडतो. मग येथे डॉक्टरांचे दलाल होतात. रुग्णाच्या नातेवाईकांची अडसर लक्षात घेऊन डॉक्टर स्वत:च मार्ग सांगतात. त्यातील सर्व मार्ग हे अनतिक असतात. या मार्गावरील प्रवासात रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक सहप्रवासी असतात. मग दोष कुणाला द्यायचा? दानशूर भारतीय समाजाची अवयदानात मात्र दरिद्रता आहे, ही दरिद्रता संपूर्णत: व्ययस्थेपेक्षा समाजावर अवलंबून आहे. आज भारतातील वेगवेगळ्या शहरांतील ग्राहक न्यायमंचात डॉक्टरांविरुद्ध असंख्य दावे सुरू आहेत ज्यात मूत्रपिंडचोरीसारखे प्रकारही समाविष्ट आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव यावे म्हणून नेत्र-शस्त्रक्रियेची शिबिरे घेतली जातात. या प्रकारच्या शिबिरांचे फलित म्हणजे एक-दोन रुग्णांना कायमचे अंधत्व. हे सगळे वैद्यकीय व्यायसायाच्या शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. वय वर्षे ४० असणारा डॉक्टर २०० कोटींचा दवाखाना बांधतो, तेव्हा त्याचा इतिहास लक्षात घेण्यासारखा असतो. वैद्यकीय व्यायसाय शिष्टाचार कायदा १९५५, २००२ यात अनेक आदर्श तरतुदींचा समावेश आहे; पण या तरतुदींची क्षणोक्षणी डॉक्टरांकडून गंमत केली जाते. एक-दोन प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयात जायचे काम पडले तर महागडी फी देऊन वकिलाची नेमणूक करतात. यामुळे सामान्यांना डॉक्टरसमोर ताकदीने उभे राहता येत नाही. खरे तर अशा वेळी कडक फौजदारी कायद्याच्या कक्षेत डॉक्टरांना आणणे गरजेचे आहे; पण आमचे सरकार मात्र बुद्धिजीवींच्या हातचे बाहुले बनले आहे. त्यामुळे कायदे करण्यात त्यांना रस नसतो. राजकीय शक्ती समाजाच्या कल्याणाचा फारसा विचार करताना दिसत नाही, असे आपणाला जाणवते. यावरून आपल्या लक्षात येईल की, व्यक्ती म्हणून प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे. गाव वा शहरात अत्यंत हुशार कौशल्यपूर्ण उपचार करणारा डॉक्टर ज्याची फीही कमी आहे, स्वत:ची आकर्षक इमारत नसेल अशा डॉक्टरांकडे जाण्याचे आम्हाला कमीपणाचे वाटते. आम्हाला आदल्या दिवशी नंबर लावणे एक दोन तपासण्या करणे म्हणजेच उपचार असा समज झाला आहे. शहरी भागातील सरकारी नोकरांचे वाढलेले पगार यामुळे वैद्यकीय खर्चाकडे काणाडोळा करायचा नाही हा आमचा बाणा आहे. सर्दी-पडसे झाले की हो भरती, छातीत थोडे दुखायला लागले की चला हृदयरोगतज्ज्ञाकडे. मग बोगस तज्ज्ञांच्या दुकानदाऱ्या वाढल्या. घरातील सदस्यावर होणारा वैद्यकीय खर्च हा चच्रेचा विषय झाला. वैद्यकीय खर्चाचा सामाजिक दर्जा ठरल्या गेला. पण यात फसवणूक होत आहे, याची कुणीही, कधीही चौकशीसुद्धा करीत नाही. याच भरवशावर डॉक्टरांचे वैद्यकीय कारखाने अमाप नफा कमावतात व अवयवदान चोरीसारखे पराक्रम करतात. मग गावाकडील असोत वा हिरानंदानीसारखी नावाजलेली रुग्णालये असोत. प्रगत राष्ट्रांत वैद्यकीय समाजकार्यकर्त्यांला प्रतिष्ठा आहे. डॉक्टरांचे नेतृत्व समाजकार्यकर्त्यांकडे असतात. ब्रिटनमध्ये उत्कृष्ट डॉक्टरपेक्षा तेथील वैद्यकीय समाज कार्यकर्ता कसा आहे. यावरून रुग्ण त्या दवाखान्यात जातात. वैद्यकीय समाजकार्यकर्त्यांची सामाजिक ज्ञान पातळी उच्च असते. हा सामाजिक वैद्यकीय कार्यकर्ता रुग्णाचे आणि रुग्णाच्या नातेवाईकांचे मानसिक बळ वाढवतो. भारतात मात्र वैद्यकीय समाज कार्यकर्त्यांचा पूर्णत: अभाव आहे. डॉ. बंग, डॉ. आमटे आणि डॉ. कोल्हे यांसारखे वैद्यकीय क्षेत्रातील दिग्ग्ज जे सामाजिक जाणिवेमुळे मोठे झाले. खरे तर अशा डॉक्टरांचे अनुकरण केल्याने आदर्श समाजातआदर्श डॉक्टर निर्माण होतील. (अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta blog benchers winner opinion in campus katta

ताज्या बातम्या