‘सर्वकार्येषु सर्वदा  उपक्रमाला तीन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने सुरुवात केली तेव्हा त्याला मिळत गेलेला प्रतिसाद पाहता आम्ही बाळगलेला विश्वास अकारण नव्हता याचा प्रत्यय येत गेला. समाजाप्रति संवेदनक्षम सेवाव्रतींच्या निरलस कार्याला दाद देतानाच त्यांच्या कार्याला समाजातील संवेदनशील व्यक्तींना जोडण्याचा तो संकल्प होता. समाजभान जागे असलेल्यांचा मेळ घालून देणे हेच या उपक्रमाचे प्रयोजन आहे आणि गेल्या तीन वर्षांत ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद हा सर्वाचीच उमेद वाढविणारा आहे.
गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात यंदाच्या वर्षीही समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’त मग शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे मिरजेचे खरे वाचन मंदिर असो वा स्वत:ची हक्काची जागा नसूनही भाडय़ाच्या घरांत सुरू असलेली ‘मैत्री’ची रुग्णसेवा असो या सर्वाचा समावेश होता. वेश्यांच्या मुलांना समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ खस्ता खात असलेले ‘विमलाश्रम’चे राम इंगोले, मेंदूच्या विकारामुळे उपेक्षित राहिलेल्यांसाठी झेप पुनर्वसन केंद्राची स्थापना करणाऱ्या नेत्रा तेंडुलकर-पाटकर, वाट चुकलेल्या मुलांनी गुन्हेगारी विश्वाकडे वळू नये यासाठी त्यांना पुन्हा आपल्या घरटय़ाकडे जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून अथक प्रयत्न करणारे ‘समतोल’चे विजय जाधव, गतिमंद मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी झटणारे ‘प्रबोधन ट्रस्ट’, मनोरुग्ण महिलांना हक्काचे माहेर उपलब्ध करून देणारे ‘माऊली प्रतिष्ठान’चे धामणे दाम्पत्य, एचआयव्हीबाधित मुलांची शुश्रूषा करणारे ‘इन्फंटइंडिया’चे बारगजे दाम्पत्य, भारतीय संगीत क्षेत्रातील कलाकार घडवणारे आणि देशभरच्या उत्तमोत्तम कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे  शतक महोत्सवी पुणे भारत गायन समाज, गणपती-शिमग्याला आवर्जून कोकणात जाणाऱ्या कोकणी माणसाने सिंधुदुर्गात उभारलेले वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान इत्यादींच्या असाधारण कार्याची माहिती ‘लोकसत्ता’ने समाजापुढे सादर केली. समाजोपयोगी काम करताना प्रसंगी पदरमोड करून खर्च करावा लागतो. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती किंवा संस्था त्यातल्याच. म्हणूनच त्यांच्या कार्याला दानशूरांनी आपले कार्य मानून मदतीची साथ दिली. गेल्या महिनाभरात या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा शब्दश: पाऊस पडला, अजूनही हा ओघ सुरूच आहे. मात्र, आता स्वल्पविराम घेण्याची वेळ आली आहे. आता वेळ आहे दानशूरांनी पाठवलेले हे सर्व संचित धन संबंधित संस्थांकडे सुपूर्द करण्याची. त्यामुळेच या वर्षीच्या दानयज्ञाची सांगता विजयादशमीच्या दिवशी, १३ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. इच्छुकांनी आपले धनादेश सोबत दिलेल्या पत्त्यांवर या मुदतीत पोहोचते करावेत, ही विनंती. दि. १६ ऑक्टोबर रोजी धनादेश संबंधित संस्थांकडे सुपूर्द केले जातील.उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या दानशूरांना धन्यवाद.
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४

महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९.  ०७१२-२७०६९२३

औरंगाबाद कार्यालय        
संपादकीय विभाग,
मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद.  ०२४०-२३४६३०३.

नगर कार्यालय          
संपादकीय विभाग,
आशिष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.

दिल्ली कार्यालय          
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.

धनादेश या नावाने काढा       
* ZEP REHABILITATION CENTRE
* MIRAJ VIDYARTHI SANGH
* MAITRI CHARITABLE TRUST
* VASANTRAO ACHAREKAR SANSKRITIK PRATISHTHAN
* PRABODHINI TRUST
* SAMTOL FOUNDATION
* MAULI SEVA PRATISHTHAN
* PUNE BHARAT , GAYAN SAMAJ
* VIMALASHRAM , GHARKUL or AMRAPALI UTKARSHA SANGH
*  INFANT INDIA

देणगीदारांची यादी
* साधना शरद पवार, भांडूप, रु. १०००/-,* स्मितील  आनंद किलरेस्कर यांच्याकडून आजी – आजोबांच्या स्मरणार्थ रु. २०००/-, * वीणा कीर्तने, ठाणे, रु. ३००२/-,* गिरीश लेले,ठाणे रु. ६०००/-* आशा सुरेश आठवले, बदलापूर    रु. १०,०००/-,* उषा अ. शिंदे, कल्याण यांच्याकडून कै. श्री. गोविंदराव बाबाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ  रु. २५००/-, * एस. आर. सुळे, ठाणे रु. २०००/-,    * सुलभा एल. बेलनेकर, ठाणे, रु. १०००/- * कि शोर टी. कोकाटे, ठाणे रु. १००१/-,* जयश्री कुलकर्णी, ठाणे यांजकडून कै. प्रभाकर पुरुषोत्तम पिंपळीकर यांच्या स्मरणार्थ रु. १००१/-* पल्लवी विनय जोशी, ठाणे यांजकडून     कै. प्रकाश दिनकर जोशी यांच्या स्मरणार्थ  रु. १०,०००/-,
* स्मिता साळसकर, ठाणे     रु. ३०००/-, * शैलेश देशमुख, मुलुंड    रु. २०००/-, * केयूर अजय केतकर, ठाणे यांच्याकडून मातामह गोपाळ सदाशिव लेले यांच्या स्मरणार्थ  रु. १००१/-,* विजय दिगंबर आठल्ये, अंधेरी,  रु. १०,०००/- * संगीता चं. दांडेकर, डोंबिवली, रु. २०,००० रु/-* चंद्रकांत पु. दांडेकर,डोंबिवली, रु. १५,०००/- * दत्तात्रय परब, मुलुंड रु. २०,०००/ ,
* अनिल आराध्ये, ठाणे, रु. २०,०००/-* अनुजा अजय काळे, दादर    रु. २१,०००/-* अलका कुडव, मुलुंड, रु. २०००/- * संध्या चिं. कार्ले, डोंबिवली     रु. २५,०००/ * वृषाली वामन कुलकर्णी, ठाणे रु. २,०००/-,
* परेश टिपणीस, ठाणे    रु. १०,०००/-* यशवंत गुजरे, भांडुप, रु. १९९८/-     लीला दाभोलकर, सातारा     रु. २०,०००/-* सुधीर शाह, धुळे ५००५/-
* राजाराम पाटील, नाशिक, रु. ३००१/-* स्वाती प्रशांत जोशी, नाशिक, रु. ११५१/- * प्रशांत आव्हाड, नाशिक, रु. ५०००/- * रमिला राजेंद्र गोठी, नाशिक, रु. २१,०००/- * डॉ. शुभदा मोहन माजगावकर, नाशिक, रु. ५०००/-
* श्रीकांत गायकवाड, नाशिक रु. ६०००/- *  प्रा. डॉ. मच्छिन्द्र के. मालुंजकर, अहमदनगर यांसकडून कै. गौरव यांच्या स्मरणार्थ  रु. २०००/- * डॉ. अनंत नरहर जोशी नाशिक रु. ६०००/-  * डॉ. सुरेखा दिपक कोठेकर, नाशिक, रु. ५०००/- *  चारुशीला उपासनी, नासिक रु. १०,०००/-  * गिरीधर मो. नेमाडे, नाशिक, रु. १०,०००/-  * एकनाथ किणीकर, नाशिक, रु. २५००/-  * बुळे शिवनारायण, नाशिक रु. १५००/-  * डॉ. राहुल बोरसे, चांदवड रु. ३०००/- पद्मा भास्कर भडंग, मालेगाव यांच्याकडून त्रिंबक मुकुंद भडंग यांचे स्मरणार्थ रु. ४०००/- राकेश भास्कर भडंग, मालेगाव यांच्याकडून रमाबाई भडंग यांचे स्मरणार्थ रु. ४०००/-  *  विजय अभोणकर, नाशिक रु. १०००/- रमेश हिरालाल चंडालिया, नाशिक रु. ३०००/-* साधना रंगराव देशपांडे, लातूर रु. ३३००/-