‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळय़ाच पातळीवर आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा गुणी कलाकार म्हणजे अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकर. २०१८च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. २०१९ साली प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या चित्रपटाचे लेखन चिन्मयने केले आहे. २०२०-२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘चंद्र आहे साक्षीला’ या ‘कलर्स वाहिनी’वरील मालिकेचे लेखनही चिन्मयने केले असून या मालिकेलाही मोठय़ा चाहतावर्ग मिळाला. ‘तू माझा सांगाती’ या ‘कलर्स वाहिनी’वर चिन्मयने साकारलेली संत तुकारामांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. लेखनासह चिन्मयने आता ओटीटीवरही पदार्पण केले असून २०२० साली प्रदर्शित झालेली ‘एमएक्स प्लेअर’वरील ‘एक थी बेगम’ या गाजलेल्या वेबमालिकेतून विक्रम भोसले हे पात्र त्याने साकारले आहे. चिन्मय सध्या एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पावनिखड’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तसेच त्याने लिहिलेला ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याने निर्मिती केलेली ‘सोनी मराठी’वरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ ही मालिका प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुरू आहे. चिन्मयचा अभिनय असलेला ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपटही ११ मार्चला प्रदर्शित होत आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

चिन्मय मांडलेकर लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१८

दुसऱ्या आशियाई पदकासाठी सज्ज!

महाराष्ट्राची तारांकित नेमबाज राही सरनोबतला २०१८ मध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कोल्हापूरच्या ३१ वर्षीय राहीने २०१८ मध्येच जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतासाठी आशियाई स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच महिला नेमबाज ठरली. सध्या कैरो (इजिप्त) येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील अपयश बाजूला सारून राहीने आगामी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय डोळय़ांसमोर ठेवले आहे. २०१० आणि २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही राहीच्या नावावर सुवर्ण आहे. याशिवाय विश्वचषकांमध्ये तिने आतापर्यंत चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. २०१५ मध्ये झालेल्या गंभीर दुखापतीमुळे राहीला एकवेळ पिस्तूल उचलणेही जमत नव्हते. परंतु हार न मानता दोन वर्षांच्या कालखंडानंतर तिने पुनरागमन केले. त्यामुळे राहीकडून भारतीय चाहत्यांना भविष्यातही अधिकाधिक पदकांची अपेक्षा आहे.

राही सरनोबत लोकसत्ता तरुण तेजांकित-२०१८

पुरस्कार नव्हे, प्रेरणा

आपण काम करत असलेल्या क्षेत्रातील एखादी छोटीशी पण सकारात्मक घटनाही पुरस्कारापेक्षा कमी नसते, असे अपूर्वा जोशी मानते. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने झालेले कष्टाचे मूल्यमापन फॉरेन्सिक अकाऊंटिंगच्या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी कठोर मेहनत करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देते, असे अपूर्वा सांगते. फॉरेन्सिक अकाऊंटिंग हे क्षेत्र आपल्याकडे तसे नवखे असले तरी त्या पुरस्कारानंतर अपूर्वाला तिच्या कार्यक्षेत्रात अधिकाधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली. ‘तरुण  तेजांकित’ पुरस्कारानंतर अपूर्वाने तीन कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आयआयएम आणि गोल्डमन सॅशची एक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती तिला मिळाली. फॉरेन्सिक अकाऊंटिंगच्या अभ्यासक्रमासाठी एनएसई अ‍ॅकॅडमीबरोबर जोडली जाणारी अपूर्वाची कंपनी ही पहिली फ्रॉडरिस्क  मॅनेजमेंट कंपनी ठरली.

अपूर्वा जोशी लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१८

प्रायोजक

*  मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) 

*  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ *  पॉवर्ड बाय :  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.