आरोग्यादायी आणि कोणत्याही आजाराच्या रूग्णासाठी वरदान ठरणारे डाळिंब हे फळ. या कोरड्या वातावरणात आणि हलयया जमिनीतही चांगले दर्जेदार उत्पादन होणार्या डाळिंब पीक सध्या बदलत्या हवामानामुळे रोगाला बळी पडत आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण या माणदेशाच्या रानातील गोडवा घेउन येत असलेले डाळिंब फळ गेल्या चार वर्षापासून नुकसानकारक ठरत आहे. बाजारात दर चांगला मिळत असूनही उत्पादनात घट झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
भारतातील फळबागांमध्ये डाळिंब हे एक महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. महाराष्ट्र राज्य, विशेषत। सांगली, सोलापूर, अहमदनगर, नाशिक या भागांमध्ये डाळिंब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. निर्यातक्षम फळ म्हणून डाळिंबाला चांगली मागणी असल्यामुळे शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक आहे. मात्र, उत्पादन वाढविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ही शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.
डाळिंब लागवडीसाठी योग्य परिस्थिती
डाळिंब पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान पोषक असते. २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी अनुकूल आहे. अतिवृष्टी व पाणथळ जमीन डाळिंबासाठी हानिकारक ठरते. हलकी ते मध्यम काळी, चांगल्या निचर्याची जमीन लागवडीसाठी योग्य असते. मातीचा कि ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
लागवड पद्धत
डाळिंबाची लागवड साधारणपणे जून-जुलै किंवा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केली जाते. ४.५ बाय ४.५ मीटर अंतरावर रोपे लावली जातात. भगवा’, गणेश’, मृदुला’ या जाती महाराष्ट्रात प्रचलित आहेत. लागवडीपूर्वी खड्डे तयार करून त्यात शेणखत, सेंद्रिय खत आणि माती यांचे मिश्रण भरावे.
पाणी व्यवस्थापन
डाळिंब पिकासाठी ठिबक सिंचन पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते व झाडांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते. फुलोर्याच्या काळात व फळधारणेदरम्यान पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. पाण्याची कमतरता किंवा जास्तीमुळे फळगळ होऊ शकते.
खत व्यवस्थापन
सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा समतोल वापर आवश्यक आहे. नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण योग्य राखल्यास उत्पादनात वाढ होते. सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता टाळण्यासाठी फवारणी करणे गरजेचे आहे.
उत्पादनातील प्रमुख आव्हाने
- १. रोग व कीड प्रादुर्भाव
डाळिंबावर तेल्या, थ्रिप्स, मिलीबग, फळ पोखरणारी अळी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तसेच तुडतुडे’ व बॅक्टेरियल ब्लाइट’ हा गंभीर रोग उत्पादन घटवतो.
- २. हवामानातील अनिश्चितता
अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानातील अचानक बदल यामुळे फळांची गुणवत्ता कमी होते. विशेषत। काढणीच्या काळातील पावसामुळे फळांना तडे जातात.
- ३. पाण्याचे योग्य व्यवस्थापन
अतिपाणी किंवा पाण्याची कमतरता या दोन्ही गोष्टी नुकसानकारक आहेत. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते.
- ४. बाजारपेठेतील चढ-उतार
डाळिंबाचे दर बाजारात सतत बदलत असतात. निर्यातीत अडचणी आल्यास शेतकर्यांना आर्थिक फटका बसतो.
उपाययोजना
- १. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
रोग व किडींवर नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक उपायांचा समन्वयाने वापर करावा. नियमित निरीक्षण करून योग्य वेळी फवारणी करणे आवश्यक आहे. रोगप्रतिरोधक जातींची निवड करणे फायदेशीर ठरते.
- २. छाटणी व बहार व्यवस्थापन
डाळिंबात बहार’ व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी छाटणी करून फुलोरा नियंत्रित केल्यास चांगले उत्पादन मिळते. मृग’, हस्त’ व अंबिया’ बहार यांचे नियोजन बाजारपेठेच्या मागणीनुसार करावे.
- ३. ठिबक व मल्चिंगचा वापर
ठिबक सिंचनासोबत प्लास्टिक मल्चिंग केल्यास जमिनीतील आर्द्रता टिकून राहते व तण नियंत्रण होते. यामुळे उत्पादनात वाढ होते.
- ४. हवामान आधारित शेती नियोजन
हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पाणी व खत व्यवस्थापन करावे. पावसाच्या काळात योग्य निचरा करणे अत्यंत आवश्यक आहे.
- ५. बाजारपेठेचे नियोजन
डाळिंबाची थेट निर्यात, शेतकरी उत्पादक कंपनी माध्यमातून विक्री, तसेच प्रक्रिया उद्योगांशी जोडणी केल्यास चांगला दर मिळू शकतो.
डाळिंब शेती ही योग्य तंत्रज्ञान व व्यवस्थापन केल्यास अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मात्र, हवामान बदल, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि बाजारपेठेतील अस्थिरता ही मोठी आव्हाने आहेत. शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून, एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात वाढ करून अधिक नफा मिळवता येईल. डाळिंब शेतीत यश मिळवण्यासाठी नियोजन, सातत्य आणि तांत्रिक मार्गदर्शन हेच खरे यशाचे सूत्र आहे.
सर्व रोगावर अमृत म्हणून डाळिंबाचा उेख आयुर्वेदात करण्यात आला आहे. लालचुटुक डाळिंबाचे दाणे वात, कफ आणि पित्त विकारावर जालीम उपाय ठरत असल्याने या फळाला मागणीही अधिक असते. यंदा तर आटपाडीच्या बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो ६५० रूपयापर्यंत दर मिळाला.
मात्र या वाढीव दराचा फायदा फारसा डाळिंब उत्पादक शेतकर्यांना होताना दिसत नाही. कारण रेेंगाळलेला मान्सून, सिंंचन योजनांचे उपलब्ध झालेले पाणी यामुळे हवेत बदल झाला असून कोरडे शुष्क हवामान आता आर्द्रतायुक्त झाल्याने याचे परिणाम उत्पादनावर होत आहेत. याशिवाय तेल्यासारख्या बुरशीजन्य रोगाने फळधारणा होउनही फळ हाती पडेलच याची खात्री नाही.
बर्याचवेळेला तयार होत आलेले फळ काढून उकिरड्याची धन करावी लागत आहे. चालू झाडे वाळण्याचे प्रमाणही अलिकडच्या कालात वाढले असून यामुळे अख्खी डाळिंब बाग उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष पिकाबरोबरच बदलत्या हवामानाचा फटका डाळिंब पिकाला बसू लागला असून यावर संशोधन होण्याची गरज आहे. नव्या हवामानाला तोंड देईल यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर संशोधन होउन ही माहिती शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याची गरज आहे.
मागील कांहीं वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे.चार वर्षांत पावसामुळे दुष्काळी भागाला तारणहार ठरलेले डाळिंब पीक धोययात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतात पाणीसाठा झाला आणि जास्त पाणी मुरल्यामुळे मर आणि पिन होल बोर रोगाने हजारो हेयटर क्षेत्र बाधित झाले आहेत. बागाच्या बागा शेतकर्यांनी काढून टाकल्या आहेत. आटपाडीच्या पश्चिम भागात बागांचे अल्प प्रमाण आहे तर पूर्व भागात रोगामुळे डाळिंबाचे क्षेत्र घटत चालले आहे.
या भागातील शेतातील मातीचे प्रमाण कमी, यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता मुळातच कमी. गेल्या दोन वर्षात परतीच्या पावसाचा धुमाकूळ चालू असतो. यामुळे एकदा का जमिनीत पाणी झिरपण्याची क्षमता संपली की, पडणारे पाणी रानातून वाहू लागते. यालाच निर लागणे असेही म्हटले जाते. डाळिंब व बोर हे कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील रानटी झुडुपे. कमी पाण्यात तग धरून राहण्याची या झाडांची नैसर्गिक क्षमता आहे. यामुळेच या भागाने डाळिंबाचा स्वीकार केला.
मात्र, सातत्याने पाणी साचून राहिल्याने झाडांची रोग प्रतिकार क्षमताच कमी होत गेली. याचा परिणाम म्हणून मूळ कूज, फळकूज याबरोबरच तेल्या व पिन होल सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांच्या मुळावर वाढणारे हानीकारक फयूजेरीयम व रायजोयटोनिया बुरशी आणि गाठी करणा-या सूत्रकृमी अशी दोन महत्वाची कारणे आहेत.
मध्यम ते भारी जमिनीत लावलेल्या डाळींबाच्या बागेस वरचेवर पाणी दिल्यास किंवा ठिबक सिंचनाव्दारे सतत मुळांचा परिसर ओलसर राहिल्यामुळे तेथे सूत्रकृमीचा उपद्रव होतो. सुत्रकृमी अतिसूक्ष्म जीव असून त्याची नर आणि पिल्ले सापासारखी लांबट तर मादी गोलाकार अशी असते. या सूत्रकृमी फळांच्या मुळावर असंख्य जखमा करतात. आणि मुळातूनच अन्न मिळवितात. या जखमा असलेल्या पेशी मोठया होवून त्या गाठीच्या रुपात दिसतात.
झाडांची मुळे तपकिरी रंगाची होतात. याचा झाडांच्या अन्नग्रहन क्षमतेवर विपरीत परिणाम होवून वाढ खुंटते. सूत्रकृमीने केलेल्या जखमातून फयूजोरियम सारख्या मुळ कुजवणारी बुरशी मुळात शिरुन वाढीस लागते. ही बुरशी हळू हळू मुळाची साल आणि मुळे कुजवते. त्यामुळे झाडांना पुरेसा अन्नपूरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो.सुरुवातीस डाळींबाचे झाड निस्तेज दिसते. झाडांची पाने पिवळी पडतात, फळांची गळती होते, काही फांदया पूर्णपणे वाळतात. आणि काही दिवसांनी संपूर्ण झाड वाळते.
डाळींब लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणा-या जमिनीची निवड करावी. दोन झाडातील अंतर साडे चार बाय साडे चार मीटर अंतरावरच करावी, आवश्यकता असेल त्या पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे, लागवडीसाठी रोग व सूत्रकृमीमुयत कलमांची निवड करावी. लागवड करताना लागवडीच्या अगोदर कलमांच्या पिशव्या मातीसह एक टयका बोर्डो मिश्रणात बुडवून नंतर लागवड करावी.
लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड, शेणखत, कॉपर आयझी क्लोराईड आणि ट्रायकोडर्माचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. फयूजेरियम, सूत्रकृमी, खोडास लहान छिद्रे पाडणारे भूंगेरे आणि खोड किडा यांचे वेळीच नियंत्रण करावे मर झालेली झाडे त्वरीत काढून टाकावीत. अशा काही शिफारसी तज्ञांनी केल्या असल्या तरी पिन होल रोगाच्या नियंत्रणास फारशा उपयुक्त ठरत नसल्याची तक्रार उत्पादक शेतकर्यांची आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधून दरवर्षी पन्नास टन डाळिंब निर्यात केले जात होते. मात्र, डाळिंबाच्या बागाच अतिदक्षता विभागात असल्याने यंदा निर्यात शून्यावर आली आहे. पिन होल, मर आणि तेल्या रोगावर अधिक संशोधन करून हे पिक तारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. – आनंदराव पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ.
