राखी चव्हाण

कर्करोगाचे निदान ते मृत्यू हा प्रवास कठीण असतो़  तो कमीत कमी वेदनादायी व्हावा, यासाठी नागपुरातील ‘स्नेहांचल’ ही संस्था कार्यरत आहे. सर्व उपचार संपल्यानंतर मरणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांच्या वेदनांवर ही संस्था मायेची फुंकर घालते.  

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

मृत्यू अटळ असतो, पण तो वेदनामुक्त, नैसर्गिक असावा, असे वाटणे साहजिकच. पण, दुर्धर आजारग्रस्तांना, विशेषत: कर्करुग्णांना बव्हंशी वेदनादायी मृत्यूला सामोरे जावे लागते. कर्करोगाच्या निदानापासून ते मृत्यूपर्यंत मानसिक-शारीरिक वेदना त्याला सहन करावी लागते. नागपुरातील ‘स्नेहांचल’ ही संस्था या वेदनेवर मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न गेल्या १६ वर्षांपासून करत आहे.

अगदी चालतीफिरती व्यक्ती काहीतरी दुखणे उद्भवल्याने डॉक्टरांकडे जाते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व तपासण्या करते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. कर्करोगाचे निदान झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्या रुग्णापुढे असंख्य प्रश्नांची मालिका उभी राहते. मीच का? माझ्यानंतर कुटुंबीयांचे काय? मुलाबाळांच्या भविष्याचे काय? असे अनेक प्रश्न या रुग्णाला सतावू लागतात़  भविष्याच्या चिंतेत गढून गेल्याने अनेकदा रुग्णाकडून डॉक्टरांचे सल्लेही दुर्लक्षित होतात. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवादाची दरी येथूनच मोठी होत जाते. रुग्णसंख्या मोठी असल्याने प्रत्येक रुग्णाचे प्रश्न ऐकून घेण्यास डॉक्टरांना वेळ मिळेलच असे नाही़. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पुढील उपचाराची प्रक्रिया ऐकून घेण्यासाठी रुग्णाचेही कान तयार नसतात. अशा वेळी ही संवादाची दरी दूर करण्याचे काम ‘स्नेहांचल’ करते. रुग्णाच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजलेले असते. ते शांतपणे ऐकून, समजून घेणारे कुणीतरी हवे असते. ते ऐकून आणि समजून घेण्याचे काम ‘स्नेहांचल’चे स्वयंसेवक करतात. त्यानंतर ते रुग्णाला घेऊन डॉक्टरांकडे जातात आणि त्या रुग्णाला डॉक्टरांमार्फत पुढील उपचाराची दिशा दाखवतात.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : कचरावेचक ते ज्ञानवेचक !

कर्करोगाच्या निदानानंतर खरेतर मृत्यू सातत्याने डोळय़ासमोर फिरत असतो. तो अटळ आहे, हे ठाऊक असूनही मृत्यूचे भय त्याला सतावणे साहजिकच. सर्व उपचार संपल्यानंतर शेवटची स्थिती येते, तेव्हा मृत्यूच्या प्रतीक्षेशिवाय पर्याय नसतो. अशा रुग्णांचे मरण वेदनामुक्त व्हावे, यासाठी दीड दशकांपूर्वी ‘स्नेहांचल’ची उभारणी करण्यात आली़

नागपुरातील प्रसिद्ध उद्योजक जिमी राणा यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेल्या ‘स्नेहांचल’चे काम सुरू झाले तेव्हा रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना सेवा द्यायची असा विचार होता. ते सुरुवातीला तरी शक्य नव्हते. जिमी राणा यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयातील संचालकांची भेट घेतली. त्यांनी आंतररुग्ण विभागाची काळजी घेणारा कक्ष सुरू करण्यास सांगितले. मग, इमामवाडा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीचे कर्करुग्णांसाठी वेदनाशमनगृह म्हणून रूपांतर करण्याचे ठरले. ‘स्नेहांचल’चा प्रवास येथून सुरू झाला. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करुग्णालयातील उपचार संपलेल्या रुग्णांना येथे पाठवले जायचे. त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून मग इतर रुग्ण या केंद्रात दाखल होत गेले. येथे येणाऱ्या रुग्णांसाठी आणि घरी असलेल्या रुग्णांसाठीही ‘स्नेहांचल’चे पथक काम करते. आजमितीस केंद्राच्या बाहेरील २००पेक्षा अधिक रुग्णांना हे पथक सेवा देते.

कर्करुग्णांच्या वेदनेकडे ‘स्नेहांचल’ शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक या तीन दृष्टिकोनांतून पाहते. वेदनेचे व्यवस्थापन हे ‘स्नेहांचल’चे मुख्य कार्य. शारीरिक वेदनेसाठी डॉक्टर असतात, औषधांनी त्या कमी करता येतात. पण, भावनिक वेदनेवर फुंकर घालण्याचे काम स्नेहांचल करत़े. त्यासाठी रुग्णांचे समुपदेशन, मानसोपचारतज्ज्ञ काम करतात. रुग्णांना बोलते करणे आवश्यक असते. मुक्त वातावरणात रुग्ण स्वत:हून मन मोकळे करतो. रुग्णाला मृत्यूबाबत अनेक प्रश्न पडतात. मृत्यू नेमका कधी येईल, कसा होईल, मृत्यूनंतर काय होईल, अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तेव्हा रुग्णाला आणखी ताण येण्याची शक्यता असत़े   त्यावेळी आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्नेहांचल रुग्णाचे समाधान करण्याचा प्रयत्न करत़े

‘आजाराचे निदान ते मृत्यू’ हा प्रवास कधी लहान, तर कधी मोठा असतो, पण तो कठीण असतो. हा प्रवास वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न ‘स्नेहांचल’मध्ये केला जातो. उपचार संपल्यानंतर रुग्णांना ‘स्नेहांचल’मध्ये आणले जात असल्याने फक्त मरणाची प्रतीक्षा करणे हेच त्यांच्या हाती असत़े  तेथील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे मुख कर्करोगाने ग्रस्त आहेत़  त्यांच्या जखमा चिघळलेल्या असतात. पण, ‘स्नेहांचल’चे परिचारक, परिचारिका या जखमा स्वच्छ करतात, त्यांची शुश्रूषा करतात़. रुग्णांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ते कायम धडपडत असतात.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : ‘अवनि’चा उन्नतीचा ध्यास

रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर कर्करोगाचे निदान होत़े  पण, सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोग झाल्याचे माहीत नसलेल्यांची संख्याही मोठी असत़े  प्रामुख्याने शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये याविषयीचे चित्र अतिशय विदारक आहे. डॉक्टरांकडे जात नाही म्हणून कर्करोगाचे निदान होत नाही आणि डॉक्टरांकडे जाऊन निदान झाले तर उपचारासाठी पैसे नाहीत, अशी त्यांची स्थिती. ‘स्नेहांचल’चे समाजसेवक नागपुरातील झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन कर्करुग्णांचा शोध घेतात. त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना उपचाराच्या योग्य मार्गावर आणले जाते. तिथे रुग्ण आढळले तरी उपचाराचा मोठा प्रश्न असतो. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे उपचारासाठी पैसे कुठून आणणार, हा या रुग्णांचा प्रश्न ‘स्नेहांचल’च्या समाजसेवकांनाही सुन्न करतो. म्हणूनच आता ‘स्नेहांचल’ने मिनिमातानगरसारख्या झोपडपट्टय़ांमध्ये छोटीछोटी केंद्रे उभारली आहेत. या बाह्यरुग्ण विभागात आठवडय़ातून एकदा डॉक्टर, परिचारिका येतात. त्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करतात. झोपडपट्टय़ांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करून, कर्करोग होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी त्यांना मार्गदर्शन केले जाते. कर्करोग झालाच तर काय करायचे, उपचार कसे असतील, याची सर्व माहिती देण्याचे काम ‘स्नेहांचल’चे पथक करते.

‘स्नेहांचल’ची सेवा सर्वासाठी पूर्णपणे नि:शुल्क आहे. सर्वात आधी रुग्ण दाखल होण्यापूर्वी रुग्णाचे आणि त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. सरकारकडून ‘स्नेहांचल’ला कोणतीही मदत नाही, तर संस्थेच्या कार्याची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर संस्थेचे काम चालते. ‘स्नेहांचल’चे ८० टक्के रुग्ण हे शहराबाहेरचे आहेत. अनेकदा रुग्णाला इथे सोडून नातेवाईक निघून जातात. नंतर ते रुग्णांशी संपर्क ठेवायलाही तयार नसतात. अशा वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रसंगात ‘स्नेहांचल’चे पथकच त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारते. नातेवाईक नसलेल्या रुग्णांची माहिती आधीच जवळच्या इमामवाडा पोलीस ठाण्याला दिली जाते.

आठवडय़ातून एकदा संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कामकाजाबरोबरच बरेचदा निधीचा प्रश्न या बैठकीत उपस्थित होतो. ‘स्नेहांचल’च्या कार्याचा व्याप वाढू लागला आह़े  संस्थेकडे ३० ते ४० जणांचे पथक सेवावृत्तीने कार्यरत आहे. यात डॉक्टर्स, परिचारक, परिचारिका, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, स्वयंसेवक अशा सर्वाचा समावेश आहे. दैनंदिन खर्च आणि वाढत्या रुग्णांचा भार पेलणाऱ्या ‘स्नेहांचल’ला आर्थिक आधार हवा आह़े

 ‘स्नेहांचल SNEHANCHAL

संस्थेपर्यंत कसे जाल?

नागपूर बसस्थानकावरून ग्रेट नाग रोडकडून सीताबर्डीकडे येताना डाव्या हातावर एक किलोमीटर अंतरावर ‘स्नेहांचल’ आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 037100106187, (कॉसमॉस बॅंक –  रामदास पेठ, नागपूर)

आयएफएससी कोड : COSB0000037

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-६९१८९९२५

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय     संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००