समाजातील एखाद्या प्रश्नासाठी झटणारे कर्ते हात जसे दुर्मीळ नाहीत, तसेच या हातांना मोलाचे पाठबळ देणारे सावरते हातही कमी नाहीत. निसर्ग संवर्धनापासून ग्रंथालय चालवण्यापर्यंत सामाजिक कामांची व्याप्ती किती वैविध्यपूर्ण असू शकते आणि त्या कामांची जाण ठेवून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे भानही किती अव्याहत असू शकते याचा प्रत्यय देणारा, कर्ते आणि सावरते या दोहोंची सांगड घालणारा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा ‘लोकसत्ता’चा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. यंदा या उपक्रमात निवडल्या गेलेल्या १२ संस्थांच्या कामांचा परिचय गणेशोत्सवादरम्यान ‘लोकसत्ता’मध्ये दररोज प्रसिद्ध होत होता. या दानयज्ञात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांसाठी आज पुन्हा एकदा या संस्थांचा थोडक्यात परिचय.

’‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात निवडण्यात आलेल्या संस्थांना ऑनलाइन स्वरूपातही देणगी देता येईल. उपक्रमाचे बँकिंग पार्टनर कॉसमॉस को-ऑप बँक लि. द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठीचे तपशील (खाते क्रमांक, बँक शाखा, आयएफएससी कोड) संस्थेच्या अल्पपरिचयात दिलेले आहेत. ऑनलाइन स्वरूपात देणगी पाठवल्यानंतर देणगीदारांनी त्या ऑनलाइन व्यवहाराचे प्रतिमांकन (स्क्रीनशॉट) स्वत:च्या नाव व पत्त्यासह पुढील मोबाइल क्रमांकांवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावे.
’७४००१९७५४९

विवेकप्रसार सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर

वस्त्रोद्योजक आणि श्रमिक असे दोन ठळक वर्ग असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीत वैचारिक कार्य रुजवणे सोपे नव्हते. मात्र ‘समाजवादी प्रबोधिनी’ने हे आव्हान स्वीकारले. चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आणि मुख्यत्वे वाचनालयाच्या माध्यमातून गेली ४९ वर्षे संस्थेने लोकप्रबोधनाचा दीप प्रज्वलित ठेवला आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ११४१००१०६२९३

कॉसमॉस बँक, शाखा- इचलकरंजी

आयएफएससी कोड- सीओएसबी००००११४

’धनादेश या नावाने काढा :

समाजवादी प्रबोधिनी

SAMAJWADI PRABODHINI

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

समतेचा ‘अंकुर’ रुजवणारी शाळा…

विविधतेत एकात्मता हे तत्त्व केवळ शाळेच्या निबंधांपुरते सीमित न ठेवता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची, समाजातील वैविध्य स्वीकारत सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची संधी देणारी शाळा म्हणजे पुण्याचे अंकुर विद्यालय. सर्व आर्थिक स्तरांतील विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबरच कर्णबधिर, अंध, बहुविकलांग, मतिमंद विद्यार्थी इथे एकाच छताखाली अभ्यासाचे आणि जीवनाचेही धडे गिरवतात…

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ०२७१००१०१८३६४

कॉसमॉस बँक

आयएफएससी कोड- सीओएसबी०००००२७

’धनादेश या नावाने काढा :

सेंटर फॉर अपॉच्र्युनिटीज इन

एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन

Centre for opportunities in education and rehabilitation

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

पारधी मुलांच्या उत्थानाचा ‘संकल्प’

पारधी समाजातील मुलांच्या कपाळी गुन्हेगारीचा जन्मजात शिक्का असतो. शिक्षण, सुरक्षित भविष्य वगैरे फार दूरच्या गोष्टी, आजचा दिवस कसा ढकलावा हीच भ्रांत असते. हे चित्र बदलण्यासाठी अहिल्यानगरमधील ‘आदिवासी पारधी समाज विकास संस्था’ गेली दहा वर्षे झटत आहे. पारधी समाजातील एका दाम्पत्याने सुरू केलेल्या या संस्थेने आता भटक्या, वंचित समाजातील अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ११३१००१०६१३२

कॉसमॉस बँक, शाखा- अहिल्यानगर

आयएफएससी कोड- सीओएसबी००००११३

’धनादेश या नावाने काढा :

आदिवासी पारधी समाज विकास संस्था

Adivasi Pardhi Samaj Vikas Sanstha

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

शिक्षणातून ‘जीवन विकास’…

स्वत:ला शिक्षण घेता आले नाही, म्हणून काय झाले, इतरांच्या शिक्षणात तरी खंड पडू नये या उद्देशाने सुरू केलेल्या कामाने कालांतराने संस्थात्मक रूप घेतले. पाठीवर कुणाचाच हात नसलेल्या मुलांना आधार देण्याच्या कल्पनेतून ‘जीवन विकास बालगृह’ स्थापन झाले. धाराशिवमधील तडवळा गावी सुरू झालेली ही संस्था आज अनेक निराधार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहे…

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक – १५७१००१०१४८९

कॉसमॉस बँक, शाखा- लातूर

आयएफएससी कोड- सीओएसबी००००१५७

’धनादेश या नावाने काढा :

श्री गुरुदत्त बहुद्देशीय संस्था

Shri Gurudatta Bahuuddeshiya Sanstha

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

सारस पक्ष्यांच्या संवर्धनाची ‘सेवा’

नामशेष होऊ घातलेल्या सारस पक्ष्याचे अस्तित्व आपल्या राज्यातून कायमचे मिटून जाऊ नये यासाठी २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रयत्नांना ‘सेवा’च्या माध्यमातून संस्थात्मक रूप मिळाले. त्यामुळे गोंदिया परिसरातील या देखण्या पक्ष्यांची संख्या आता चारवरून ३५ वर पोहोचली आहे. फक्त सारस पक्षीच नव्हे तर त्याला आवश्यक असलेली परिसंस्था टिकवण्यासाठी धडपडणार्‍या हातांना पाठबळ गरजेचे आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ०३७१००१०७४०५

कॉसमॉस बँक, शाखा- नागपूर

आयएफएससी कोड- सीओएसबी०००००३७

’धनादेश या नावाने काढा :

‘सेवा’ गोंदिया

SEWA

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

ज्ञान-विज्ञानाची ‘सेवासाधना’

ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणार्‍या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये प्रयोगशीलता वाढावी यासाठी चिपळूण येथील सेवासाधना प्रतिष्ठानने सुरू केेलेल्या विविध उपक्रमांचा आजवर कोकणातील दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या मुलांपर्यंत ज्ञान-विज्ञान घेऊन जाणार्‍या या संस्थेने विज्ञान शिक्षणाबरोबरच कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- १४४१००१०६७५

कॉसमॉस बँक

आयएफएससी कोड- सीओएसबी००००१४४

’धनादेश या नावाने काढा :

सेवासाधना प्रतिष्ठान

Sevasadhana Pratishthan

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी लोकसेवा

करोना काळात आपल्या आसपासच्या लोकांना उपचारांसाठी करावी लागलेली वणवण बघून सांगली-मिरज परिसरातील काही कार्यकर्ते मदतीसाठी उभे राहिले. पण त्यांची ही तळमळ करोनाची महासाथ संपल्यावर आटली नाही तर तिथूनच पुढे वाढत गेली, गरजूंना परवडेल अशी आरोग्यसेवा मिळवून देण्याची कळकळ. त्यातूनच नमराह फाऊंडेशन या संस्थेचे समाजसेवेचे असिधारा व्रत विस्तारत गेले आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ०८५१००१०८९३८

कॉसमॉस बॅंक, शाखा-सांगली

आयएफएससी कोड- सीओएसबी ०००००८५

’धनादेश या नावाने काढा :

नमराह फाऊंडेशन

Namrah Foundation

संस्थेकडे ‘८०जी’ प्रमाणपत्र नाही.

परंपरेला हवी आहे नवी झळाळी!

स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवातीला लोकमान्य टिळकांचे आणि नंतर गांधीजींचे विचार अनुसरत वाटचाल करणार्‍या टिळक राष्ट्रीय विद्यालय या शिक्षण संस्थेने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. स्वातंत्र्यचळवळीचा वारसा सांगणार्‍या संस्थेने आजवरची वाटचाल स्वबळावर केली, पण आता नव्या काळाशी जोडून घेत पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी संस्थेला समाजाची साथ हवी आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- १०५१००१०३८७२

कॉसमॉस बॅंक, बडनेरा रोड, राजापेठ, अमरावती</p>

आयएफएससी कोड- सीओएसबी ००००१०५

’धनादेश या नावाने काढा :

टिळक राष्ट्रीय विद्यालय

Tilak Rashtriya Vidyalaya

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

एचआयव्हीग्रस्तांसाठी हक्काचा ‘आधार’

समाजातील उपेक्षित घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, स्वत:च्या पायांवर उभे करणे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व घडवणे या उद्देशाने १९९९ मध्ये अमळनेर तालुक्यातून सुरू झालेल्या ‘आधार बहुउद्देशीय संस्थे’चे कार्य आता जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पोहोचले आहे. संस्था एचआयव्हीग्रस्तांचे आयुष्य सुकर करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे…

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ०९७१००१०२९९८

कॉसमॉस बँक, शाखा-जळगाव

आयएफएससी कोड- सीओएसबी०००००९७

’धनादेश या नावाने काढा :

आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर

Aadhar Bahuudeshiya Sanstha, Amalner

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

वानरमारे समाजाच्या शोषणमुक्तीसाठी…

‘हे वानर मारून खातात’, ‘यांच्या अंगाला वास येतो’ असं म्हणून ज्यांना सरकारी कार्यालयात उभंही केलं जात नसे, ज्यांच्या मुलांना शाळेतही एका कोपर्‍यात बसावं लागत असे, त्या समाजातल्या मुलांचं भविष्य घडवण्याचा, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शोषित मुक्ती अभियान’ करत आहे. वापरात नसलेल्या एका गोठ्यातून सुरू झालेलं या संस्थेचं काम आता बरंच विस्तारलं आहे…

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ०८७१००१०९२९४

कॉसमॉस बँक, शाखा- शाहुपुरी, कोल्हापूर</p>

आयएफएससी कोड- सीओएसबी ०००००८७

’धनादेश या नावाने काढा :

शोषित मुक्ती अभियान हुमरमळा

Shoshit Mukti Abhiyan Humarmala

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

शिक्षण हक्क सर्वांना मिळावा यासाठी…

शिक्षण हक्क कायदा असला तरी प्रत्यक्षात हा हक्क मिळवण्यासाठी अनेकांना प्रचंड धडपड करावी लागते. काही जणांना तर आपल्याला असा काही हक्क आहे, याची जाणीवही नसते. अशा विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी मुंबईतील ‘टच’ ही संस्था गेली तीन दशके अथक प्रयत्न करत आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- १२२१००१०४६६४

कॉसमॉस बँक, शाखा -बोरिवली पूर्व

आयएफएससी कोड- सीओएसबी ००००१२२

’धनादेश या नावाने काढा :

टच – टर्निंग ऑपॉच्र्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प

TOUCH

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

असाधारण जिद्दीला ‘उभारी’

बहुविकलांग आणि मतिमंद मुलांसाठी बाहेरचे जग म्हणजे त्यांची शाळा. पण अठराव्या वर्षी या जगाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद होतात. त्यांच्या पालकांना आता पुढे काय आणि आपल्यानंतर काय, असे गहन प्रश्न भेडसावू लागतात. अशा मुलांना त्यांच्या पायांवर उभे करण्यासाठी आणि अठराव्या वर्षानंतरही त्यांच्याकरिता बाह्य जगाचे दरवाजे खुले ठेवण्यासाठी ठाण्यातील ‘उभारी’ ही प्रशिक्षण कार्यशाळा प्रयत्नशील आहे…

ऑनलाइन देणगीसाठी

’खाते क्रमांक- ०४०१००१०१५२९७

कॉसमॉस बँक, शाखा-ठाणे

आयएफएससी कोड- सीओएसबी०००००४०

’धनादेश या नावाने काढा :

जिव्हाळा ट्रस्ट, ठाणे

JIWHALA TRUST THANE

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००