सावनी वझे आणि वैभव मांगले यांनी मने जिंकली

गेल्या वर्षभरात ऑनलाइन कार्यक्रमच के ले असल्याने लोकांना अर्ध्यापर्यंतच पाहायची सवय झाली आहे.

एरव्ही कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात दिसणारा नाचगाण्यांचा तामझाम कटाक्षाने दूर ठेवत तरुणाईनेच लोकप्रिय के लेल्या स्टॅण्डअप कॉमेडीच्या कार्यक्रमाने ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळ्याची सुरुवात झाली. ‘भाडिपा’च्या मंचावरून घराघरांत पोहोचलेल्या सावनी वझेने या वेळी आपला छोटेखानी एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर के ला. गेल्या वर्षभरात ऑनलाइन कार्यक्रमच के ले असल्याने लोकांना अर्ध्यापर्यंतच पाहायची सवय झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच उपस्थितांना पूर्णपणे पाहते आहे, असे सांगत त्यांनाही आपल्याबरोबर संवादात सहभागी करून घेतलेल्या सावनीने टाळेबंदीच्या काळातील आपले अनुभव, आपल्या सगळ्यांनी अनुभवलेला विरोधाभास याचे गमतीशीर कथन के ले. जगभर महामारी पसरली आहे म्हणून भीतीने घरात बंद झालेल्या लोकांनी चक्क ‘नथीचा नखरा’, ‘आयुष्यभराचा जोडीदार’ असे उपक्रम करत आपला वेळ घालवायला सुरुवात  केली. समाजमाध्यमांनी जग जवळ आणले आहे, पण त्याचे उफराटेच परिणाम आपण आजूबाजूला कसे अनुभवतो आहोत याचे गमतीदार किस्से तिने सांगितले आणि एकं दरीतच करोनामुळे आपल्या आयुष्यात आपण जेवढी समाजमाध्यमांवरून हॅशटॅगच्या नावाखाली बोंबाबोंब के ली तेवढे फार काही बदललेले नाही, याची हसत-हसवत जाणीव तिने उपस्थितांना करून दिली. प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी सुरुवातीपासूनच ओघवते आणि खुमासदार सूत्रसंचालन करत काहीशा सावध परंतु नेटक्या पद्धतीने झालेल्या या सोहळ्याचे वातावरण हलके फु लके  केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sawani vaze and vaibhav mangle won hearts akp

ताज्या बातम्या