कन्नड मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’चा उपक्रम घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार कमालीचे उत्सुक होते. त्यांना शिंदे गटात सहभागी न झालेले आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटात घ्यायचा होता. या मतदारसंघातून नितीन पाटील यांना प्रोत्साहन द्यायचे असल्याने त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आखला म्हणे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर फुले उधळली. गर्दी पाहून तेही खूश झाले. लाभाचा समारंभ उत्तम करताना मंत्री सत्तार अगदी घरच्या कार्यक्रमात जसे वावरतात तसे वावरले. ते सारे काही पार पाडत होते. कोणी किती वेळ बोलावे, कोणाला बोलताना थांबवावे, हेही त्यांनीच सांगितले. ते कधी सूत्रसंचालन करीत होते. कधी ते मार्गदर्शक होते तर मधूनच ते मंत्री म्हणूनही वावरत होते. ‘सब कुछ सत्तार’ असे कार्यक्रमाचे सूत्र असावे असे त्यांच्या वर्तणुकीचे सूत्र होते. त्याला प्रशासनाची अजोड साथ होती. अशाने शासन खरोखरीच आपल्या दारी पोहचणार कसे, असा प्रश्न पडतोय.

खोका आणि माकड..

‘काय झाडी. काय डोंगार. काय हाटील. समदं ओक्के’ या अफलातून संवादामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे आता मराठी चित्रपटसृष्टीत उतरणार आहे. ‘माकडाच्या हातात कोलीत’ नावाचा बिग बजेट मराठी चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सत्यात उतरणार की ती केवळ घोषणाच ठरणार, याची उत्सुकता आहे. शहाजीबापूंच्या अगोदर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही मराठी चित्रपटनिर्मितीची घोषणा केली होती. ‘दि महाराष्ट्रा डायरी ऑफ खोका’असे या नव्या चित्रपटाचे नावही राऊत यांनी देऊन टाकले आहे. तेव्हा त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन इकडे शहाजीबापूंनीही ‘माकडाच्या हातात कोलीत’ चित्रपटाची घोषणा केली आहे. दोन्ही चित्रपट अर्थातच महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणावर बेतलेले असतील, हे वेगळे सांगायला नको.

Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
ratnagiri sindhudurg lok sabha constituency marathi news
रत्नागिरी – सिंधुदुर्गात उमेदवारीसाठी किरण सामंत अजूनही आशावादी

अध्यक्ष कसा असावा?

गेली सहा वर्षे भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आहे. आता पुन्हा हे पद स्वीकारण्याऐवजी दिल्ली दरबार पाहण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी या पदासाठी नकार दर्शवला आहे. जिल्हाध्यक्ष कोणाला करावे याची चाचपणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नेतेमंडळींची आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी मात्र जिल्हाध्यक्ष कोणालाही करा, मात्र चार पैसे पदरमोड करण्याची तयारी असलेल्यांनाच ही संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कारण नेतेमंडळींच्या दौऱ्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना पदरमोड करावी लागते. यामुळेच कार्यकर्त्यांना कोणी तरी ‘बडा’ अध्यक्ष हवा आहे.