पशुपालनामध्ये चारा आणि चाऱ्यात वैरणीला मोठे महत्त्व असते. दिवसेंदिवस सकस, चौरस वैरण उपलब्ध करणे जिकिरीचे बनत चालले आहे. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुसरले जात आहेत. यातूनच केंद्र सरकारच्या मदतीने वैरण बँक हा एक उपक्रम राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ‘गौ अॅग्रीटेक’ संस्थेतर्फे अशीच एक वैरण बँक सक्षमपणे चालवली जात आहे. त्या उपक्रमाविषयी…

नावरांचा दैनंदिन आहारात वैरणीचे प्रमाण जास्त असते. दिवसेंदिवस सकस, चौरस वैरण उपलब्ध करणे जिकिरीचे बनत चालले आहे. चारा-वैरण उत्पादनासाठी योग्य नियोजन करणे पशुपालकांसाठी काळाची गरज बनली आहे. पशुपालकांना कमी उत्पादन खर्चात जनावरांना चारा उपलब्ध करून देणे ही बाब सोपी राहिलेली नाही. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुसरले जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने वैरण बँक हा त्यातलाच एक महत्त्वाचा उपक्रम. कोल्हापूर जिल्ह्यात अशी गौ अॅग्रीटेक ही वैरण बँक सक्षमपणे चालवली जात असून, त्याद्वारे पशुपालकांना उत्तम दर्जाच्या वैरणीची उपलब्धता होऊ लागली आहे. जनावरांचे आरोग्य, तसेच दुधाचा दर्जा सुधारत आहे.

Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
Mission Bhagirath Prayas
नाशिक : मिशन भगीरथ प्रयासमुळे भूजल पातळीत वाढ, काठीपाडा परिसरास लाभ
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित

वैरण शब्द शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांना खाऊ घालावयाचा चारा या अर्थाने वापरला जातो. अशा वैरणीची उपलब्धता हा पशुपालकांच्या नियोजनातील महत्त्वाचा भाग; तितकाच अडसरही. जगभरात सर्वाधिक पशुधन असणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली असली, तरी सध्या देशातील १४० कोटी लोकांना प्रतिदिन आवश्यक असणारे दूधउत्पादन होत नाही. अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामुळे प्रतिजनावर दुधाचे उत्पादन कमी होत आहे. त्याचबरोबर पशुखाद्यावरील खर्च वाढत आहे. चाऱ्याच्या दरात सतत होणारी वाढ पशुपालकांची चिंता वाढणारी आहे. यामुळे पशुपालन करणाऱ्या ग्रामीण कुटुंबांचा खर्च वाढला आहे. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांना चारा दिला जात नाही.

हेही वाचा >>> लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

जनावरांच्या आरोग्यासाठीही ते आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील वाढत्या महागाईमुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. लोकसभेतही पशुखाद्याच्या महागाईच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी, देशात अजूनही पशुखाद्याचा तुटवडा आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या किमतीत वाढ होत आहे. देशात ११.२४ टक्के हिरव्या चाऱ्याची, २३.४ टक्के कोरड्या चाऱ्याची कमतरता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावर उपाय म्हणून, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चारा प्लस मॉडेल अंतर्गत १०० चाराभिमुख फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन (एफपीओ) तयार करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले होते.

एकंदरीत वैरणीचा अभाव, कमतरता याच परिणाम एकूण दूध उत्पादनावर होत आहे. दुसऱ्या बाजूला दुधाची मागणी वाढतच आहे. मागणी वाढून पुरवठा कमी झाल्याने बाजारात बनावट दूध येऊ लागले आहे. ते घातक रसायनापासून बनवले असल्याने त्याचा मानवी शरीरावर दृष्य परिणाम होत आहे. त्यामुळे कर्करोगासारख्या विकारांना निमंत्रण मिळत आहे. या संभाव्य धोकादायक परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने याबाबत देशभरात सर्वेक्षण केले असता, दूध उत्पादनवाढीसाठी वैरणीवर काम करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले.

भारत सरकारने राष्ट्रीय दूध विकास महामंडळाच्या (एनडीडीबी) मदतीने देशभरात स्थानिक दूध संघांच्या माध्यमातून शंभर वैरणउत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारत सरकारचा कंपनी व सहकार कायदा एकत्र करून एक मॉडेल बनवले आहे. पुणे जिल्हा दूध संघ – कात्रज, बारामती दूध संघ बारामती, राजारामबापू दूध संघ- इस्लामपूर, विलासराव देशमुख कृषी विज्ञान केंद्र -लातूर व कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ तथा गोकुळ अशा महाराष्ट्रात पाच वैरण कंपन्या स्थापन झाल्या आहेत. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून शिंदेवाडी (ता. कागल) येथे स्थापन झालेली गौ अॅग्रीटेक कोल्हापूर वैरणउत्पादक कंपनी ही होय. या कंपनीचा लाभ संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला होऊ लागला आहे.

भारत सरकार, एनडीडीबी, गोकुळ अशा मातबर संस्थांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पशुधनाला गुणवत्तापूर्ण व पोटभर चारा उपलब्ध करण्याचे ध्येय बाळगले असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सयाजीराव खराडे यांनी सांगितले. या कंपनीच्या माध्यमातून वैरणनिर्मिती, खरेदी, प्रक्रिया, विक्री, साठवणूक असे एक प्रकारे बँकेचे स्वरूप निर्माण होणार असल्याने या संकल्पनेला वैरण बँक म्हणता येईल. देशभरातील काही नामवंत आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैरणीवर काही व्यवसाय करायचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हिरवी वैरणनिर्मिती – वैरणीचा राजा म्हणून परिचित असणारे मका पीक लागवडीस परिसरातील शेतकऱ्यांना मका बियाणे अनुदानावर देणे, लागवड, रासायनिक खते, पीक संरक्षण याबाबत मार्गदर्शन करणे, सवलतीच्या दरात कीटकनाशके देऊन मका पिकवण्यास प्रोत्साहित करून त्यांचा मकाचारा खरेदीचा करार प्रतिटन २५०० रुपये हमीभावाने करण्यास सुरुवात केली आहे. मकाकापणी व वाहतूक खर्च वैरण कंपनी करीत आहे. कापून कुट्टी केलेला मका कंपनीच्या सायलेज प्लॅण्टवर वजन करून शेतकऱ्यांच्या खात्यावर मकाबिल पेमेंट करण्याचे नियोजन आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना मक्याची दोन पिके घेता येणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील नदीकाठची शेती दर वर्षी महापुराने बाधित होत असल्याने नदीकाठच्या ऊस पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून सप्टेंबरपासून जूनपर्यंत मक्याची दोन पिके घेता येणार आहेत. जोडीला हमीभाव व मका खरेदीकरार निश्चित असल्याने दराची व मका विक्रीची चिंता करण्याचे कारण नाही. साधारण प्रतिएकर एक वेळचे पीक उत्पादन १८ ते २० टन इतके मिळत असल्याने २५०० रुपये दराप्रमाणे ४५ ते ५५ हजार रु. उत्पन्न अपेक्षित आहे. खर्च वजा जाता एका पिकातून तीस ते चाळीस हजार रुपये नफा मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या तीन महिन्यांत जास्त नफा देणारे पीक म्हणून मका पीक फायदेशीर ठरू लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा यामुळे जिल्ह्यात ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. भाताचे पिंजर, डोंगरी गवत ही निकृष्ट दर्जाची, कमी पौष्टिकता असणारी वाळकी वैरण आपल्याकडे कमी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जनावरे कुपोषित आहेत. दूध उत्पादनात घटाबरोबर गाभण तक्रार वाढत आहेत. परिणामी भाकड जनावरे पाळण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. यावर मात करण्यासाठी शेजारील कर्नाटक राज्यातील विजापूर, गुलबर्गा, मराठवाडा, मध्य प्रदेश अशा ठिकाणांहून तूरकाड, हरभरा काड, गहूकाड, कडबाकुट्टी, मसूरकाड आदी एकदल व द्विदल वाळक्या वैरणी खरेदी करून जिल्ह्यातील पशुपालकांच्या मागणीप्रमाणे प्रत्येक गावात योग्य दरात पोहोच करण्याचा संकल्प गौ अॅग्रीटेक कोल्हापूर वैरणउत्पादक कंपनीने केला असून, हे कार्य जोमाने सुरू झाले आहे.

सायलेज (मूरघास) व सुका चारा योग्य प्रमाणात जनावरांना खाऊ घातल्यास दूध व्यवसायातील वैरण आणणे या कामातील कष्ट कमी होणार आहेत. पशुपालकाची एक प्रकारे खुरपे व दोरी यांपासून सुटका होणार असून, दररोज वैरण आणण्याची चिंता मिटणार आहे. परिणामी दूध व्यवसाय खूप सोपा होणार आहे. सायलेज, एकदल-द्विदल पौष्टिक सुक्या चाऱ्यामुळे जनावराचे दूधउत्पादन वाढणार आहे. दुधाची गुणवत्ता सुधारणार आहे. पशुखाद्यावरील खर्च कमी होणार आहे. त्यामुळे साहजिकच दूध व्यवसाय नफ्यात येणार आहे. दूध व्यवसाय सोपा व स्मार्ट होणार आहे. सायलेज, सुका चारा, पशुखाद्या, खनिजे, मीठ, सोडा इत्यादी सर्व घटक एकत्रित असलेली ढेप बनवून विकणे याला टीएमआर (टोटल मिक्स राशन) असे म्हटले जाते. कंपनीच्या माध्यमातून हा प्रयोग नजीकच्या काळात करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे जनावराला आवश्यक असणारे सर्वच घटक एकत्रितपणे मिळणार असल्याने त्याची साठवणूक करण्याची गरज नाही. त्याला ‘रेडी टू इट’ असे म्हटले जाते.

वैरण कंपनीच्या माध्यमातून दूध व्यवसायासाठी आवश्यक असणारी वासरांना दूध पाजायची बाटली, शेण भरण्यासाठी सुपल्या, टब, मिल्किंग मशिन, सेन्सर टॅग, गाई-म्हशी धुण्यासाठी ब्रश असे सर्व क्वालिटी साहित्य एकाच छताखाली मॉलच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा मानस आहे. या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दूध व्यवसाय अधिकच नफ्यात आणून सोपा व स्मार्ट बनवणे हे उद्दिष्ट गौ अॅग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनी काम करत आहे. या कामासाठी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ पाठबळ देत आहेत. देशभरात सुरू झालेल्या एकूण शंभर वैरणउत्पादक कंपन्यांपैकी ‘गौ अॅग्रीटेक’ कोल्हापूर या वैरण कंपनीचा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे एनडीडीबीच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

सायलेज (मूरघास) निर्मिती

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला मका कापून, कुट्टी करून कंपनीच्या सायलेज बेलर मशिनवर ६० व १०० किलोचा गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचा मूरघास (सायलेज) गठ्ठा स्वरूपात बनवला जातो. तो योग्य दरात जिल्हाभरातील पशुपालकांना पुरवला जातो. सदर सायलेज दर महिन्याला पुरवठ्याचा मार्ग तयार करून प्रत्येक गावात पोहोच करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे थंडीत, पावसात दररोज उसाचे वाडे, उसाचा पाला, नदीचे गवत, डोंगरी गवत असे वैरण आणण्यासाठी कष्ट करण्याची गरज उरली नाही.

dayanandlipare@gmail.com com

Story img Loader