आशुतोष उकिडवे
लोकप्रभा दिवाळी २०२०

एकदा मी जीनिव्हाला चाललो होतो. रात्रीचा आठ तासांचा प्रवास झोपतच करायचा होता. बिझनेस क्लासमध्ये अशा वेळी पुरवण्यात येणारी ब्लॅन्केट्स अन्य वर्गातल्या ब्लॅन्केट्सपेक्षा अधिक अव्वल आणि अत्युत्तम दर्जाची असतात. जाग आली ती विमान ‘आता धावपट्टीकडे झेपावणार आहे, तेव्हा उठा’ या उद्घोषणांनीच. पाहिले तर बाजूच्या आसनावरची एक गोरी बाई लगबगीने आपल्या मोठय़ा हॅन्डबॅगेत त्याहीपेक्षा मोठे असलेले ते पांघरूण जिवाच्या आकांताने कोंबत होती. सोबतची पश्मीना शाल तर केव्हाच घडी होऊन आत गेली होती. हा प्रकार छोटय़ाशा बिझनेस क्लासमध्ये, प्रवाशांच्या खास दिमतीला असलेल्या एका कर्तव्यदक्ष हवाईसेविकेच्या लक्षात आला. तिने अतिशय विनम्र शब्दांत, शाल व पांघरूण हे विमानांतर्गत उपयोगासाठीच असते, ते बाहेर घेऊन जाता येत नाही, हे सांगितले. चोरी पकडली गेली तशी ही श्रीमंत बाई चवताळली. ‘‘माझ्यासारख्या आजारी आणि प्रौढ बाईला बाहेरच्या इतक्या कडाक्याच्या थंडीत तू शालीशिवाय जायला सांगतेस? नियम माणसांसाठी आहेत की माणसं नियमांसाठी? मी कोण आहे हे ठाऊक आहे तुला? तुझी आता तक्रार करते की नाही पहा..’’  बोलता बोलता त्या बाईने आपले कार्ड ऐटीत त्या पोरसवदा हवाईसुंदरीस दाखवले. ती घाबरली. तत्परतेने तिने एका खास मोठय़ा कापडी पिशवीत गुपचूप ते चोरलेले ब्लॅन्केट आणि शाल घालून तर त्या बाईला दिलेच शिवाय खास स्विस चॉकलेट्सचा आणखी एक वाढीव बॉक्सही दक्षिणा म्हणून दिला.

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)