उत्तमोत्तम आणि नवनवीन खाद्यपदार्थ खायला आणि करायला कुणाला आवडत नाही? किंबहुना खाणे आणि खिलवणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. अगदी पुराणकाळापासून ते आजपर्यंत आपल्याकडे खाद्यसंस्कृतीचे वर्णन आढळते. आपणदेखील आपल्या आवडीनुसार वेगवेगळे प्रयोग करत असतो. म्हणूनच तुमची वेगळी डिश जगासोबत शेअर करण्याची एक अनोखी संधी ‘लोकप्रभा’ उपलब्ध करुन देत आहे. चला तर मग तुमची आगळीवेगळी रेसिपी आम्हाला पाठवून द्या.. सोबत रेसिपीचा फोटोही पाठवायला विसरू नका.

नवनव्या दिशा, नवनवे विषय, नवनवे मार्ग तरुणाईला साद घालत असतात. तरुणांचं चैतन्यच जग बदलायला हातभार लावत असतं. आम्हाला प्रतीक्षा आहे अशा उत्स्फूर्त, उत्फुल्ल तरुणाईची. तरुणांच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज, तरुणांचं लिखाण या सगळ्याचं ‘लोकप्रभा’ स्वागत करत आहे..

अट एकच. तुम्ही तरुण असायला हवे.

लेख पाठवताना सोबत कॉलेजच्या आयकार्डची झेरॉक्स किंवा स्कॅन कॉपी सोबत जोडायला विसरू नका.

तुमचे लिखाण हजार ते बाराशे शब्दांपर्यंत असावे. ते अप्रकाशित असावे. ते सुवाच्य अक्षरात, पानाच्या एकाच बाजूवर, व्यवस्थित समास सोडून लिहिलेले असावे. टाइप केलेले असल्यास आमच्या ई मेलवर पीडीएफ तसंच डॉक फाइल या स्वरूपात स्वत:च्या फोटोसह पाठवावे.

 : आमचा पत्ता :

संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०. फॅक्स : २७६३३००८, ई-मेल : response.lokprabha@expressindia.com व lokprabha@expressindia.com