गणपती हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या गणेशमंदिरांचा परिचय ‘लोकप्रभा’तून करून दिला जाणार आहे. आपल्या भागात, आपल्या माहितीत असे मंदिर असेल तर त्याची छायाचित्रासह तपशीलवार माहिती ‘लोकप्रभा’ला कळवा.  त्यासाठी मंदिराचा इतिहास, त्याच्या स्थापनेचा तपशील, मंदिराची स्थिती, संबंधित प्रथा परंपरा, गणेशमूर्तीचे वर्णन, मंदिराभोवती एकवटलेले नियोजन, संबंधित व्यक्तींचे योगदान या सगळ्याची माहिती लेखरूपात

हजार ते दीड हजार शब्दांमध्ये पाठवायची आहे. गणेशमूर्ती तसंच मंदिराचे वेगवेगळ्या अँगलमधली छायाचित्रं तसंच मंदिर शंभरहून अधिक वर्षे जुने असल्याचे सिद्ध करणारा एखादा दाखला या सगळ्यासह हा मजकूर ३० ऑगस्टपर्यंत आमच्याकडे पाठवा.

आपल्या पाकिटावर ‘गणेश विशेषांका’साठी हा उल्लेख जरूर करावा.

‘आमचा पत्ता’

‘गणेश विशेषांक’, लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८,  टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०. १ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे (कृपया मोबाइलमधून काढलेली नकोत)