लग्न झाल्यावर करता येईल की नाही माहीत नाही अशी मजा मित्रांबरोबर शेवटची करून घेणं म्हणजेच मुलांची बॅचलर पार्टी. तिची मजा प्रत्येकाने अनुभवायलाच हवी.

तुम्ही कधी गुगलवर किंवा डिक्शनरीमध्ये ‘बॅचलर पार्टी’चं भाषांतर किंवा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? ‘अविवाहित पुरुषांची पार्टी’ हेच उत्तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी सापडेल. हल्ली लग्नाआधी मुलींमध्येसुद्धा ‘स्पिन्स्टर पार्टी’ची क्रेझ आली आहे. आधीच नमूद करतो की, इथे भेदाभेद करण्याचा अजिबात हेतू नाही, पण ‘बॅचलर पार्टी’तील विक्षिप्तपणा आणि ती करण्याचा पहिला मान कुणाकडे जात असेल तर तो मुलांकडेच. ‘बॅचलर पार्टी’त मुलं काय करतात हे काही आता गुलदस्त्यात राहिलेलं नाही. याबद्दल फारसं जाहीरपणे लिहिलं गेलं नसलं किंवा लोकांसमोर येत नसलं (फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून) तरी चर्चा होतेच. मुलं काय काय नाही करत आणि करू शकत या शक्यतांचीही यादी आता विचारक्षमतेच्या पलीकडे गेली आहे. त्यापकी उघडपणे न लिहिता येण्यासारख्या विषयांची संख्याही तितकीच जास्त. त्यामुळे त्या विषयांची चर्चा इथे नको करायला. (?) कारण त्यातल्या अनेक गोष्टी अश्लील, असभ्य या प्रकारात मोडतात. आणि मग आमची गुपितं उघड केली म्हणून तमाम जनता मला शिव्यांची लाखोली वाहील. असो.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
government and government parties on social media viral claim false
आचारसंहितेनंतर सोशल मीडियावर सरकार, राजकीय पक्षांविरोधात लिहिणाऱ्यांवर होणार कारवाई? व्हायरल दावा खरा की खोटा, वाचा
BJP candidates request to Muslim community for votes in Iftar party
भाजप उमेदवाराचे मुस्लीम बंधुना मतांसाठी साकडे, इफ्तार पार्टीत…

लग्नाआधी कधीही, कुठल्याही वेळी धावून येणारा वाघासारखा शूर मित्र लग्नानंतर मात्र शेळी होतो, हा सर्वसामान्य अनुभव आहे. रात्री कितीही वेळ मित्रांसोबत बाइकवरून फिरणारा (पूर्वी नाक्यावर पडलेला असायचा) मित्र लग्नानंतर मात्र ऑफिसनंतर थेट घर गाठतो, जेवणाची वेळ पाळतो आणि वेळेत दारसुद्धा लावायला लागतो. त्यावरून हा पूर्वीचा ‘जिगरी दोस्त’ राहिला नाही, असे टोमणे त्याला ऐकावे लागतात. त्यामुळे उनाड पक्ष्याचं आयुष्य बंदिस्त होण्याआधीची ही ‘बॅचलर पार्टी’ मुलांसाठी किती महत्त्वाची असते, हे अधिक विस्ताराने समजून घ्यायलाच हवं.

बंधनं केवळ मुलींवरच असतात, या समजुतीला आता काळ लोटला आहे. लग्नानंतर जितकी मुलगी संसाराच्या रहाटगाडय़ात अडकते तितकाच मुलगाही अडकतो. नवऱ्याच्या आवडीनिवडी जपणाऱ्या मुलींप्रमाणेच बायकोच्या (काहींसाठी लग्नाआधीची प्रेयसी, जे अधिक कठीण प्रकरण असतं) आवडीनिवडीसाठी झटणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. म्हणूनच लग्नाला एक पवित्र बंधन मानणारे या ‘बॅचलर पार्टी’चा मनमुराद आनंद लुटतात. ‘बकेट लिस्ट’मध्ये मित्रांसोबत करायच्या राहिलेल्या धमाल मस्तीची पूर्तताही यानिमित्ताने केली जाते. कदाचित लग्नानंतर त्या गोष्टी करायला मिळतीलही, पण त्यात स्वातंत्र्याची भावना मात्र नसते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

‘बॅचलर पार्टी’ म्हटलं की सर्वाना पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे २००९ साली आलेला टॉड फिलिप्स दिग्दíशत ‘हँगओव्हर’ हा चित्रपट. खरं तर याआधीही ‘बॅचलर पार्टी’ नावाने आणि त्याच आशयाचे अनेक इंग्रजी चित्रपट आले होते. पण ‘बॉय ूमर’ कॅटेगरीत मोडणाऱ्या या चित्रपटाने ‘बॅचलर पार्टी’ म्हणजे नेमकं काय असतं आणि ठरवलं तर अशा पार्टीमध्ये किती विक्षिप्त गोष्टी घडू शकतात याची एक वेगळीच ओळख सर्वाना करून दिली होती. पडद्यावरील प्रत्येक प्रसंगात हसून हसून मुरकुंडीला वळवणारा हा चित्रपट म्हणूनच फक्त मुलांनाच नाही तर मुलींनाही आवडतो. त्यानंतर २०११ साली आलेला ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ या चित्रपटातही या विषयाला हलकेच स्पर्श केलेला होता. (चित्रपटातील अभय देओलच्या पात्राची कथा याच विषयाशी निगडित आहे.) या दोन चित्रपटांनी ‘बॅचलर पार्टी’कडे पाहण्याचा आणि ती साजरी करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. गेल्या आठ-नऊ वर्षांत बदलेली आíथक गणितं आणि डिजिटल माध्यमांद्वारे खुली झालेली माहितीची कवाडं यामुळे ‘बॅचलर पार्टी’ हा आता जणू लग्नाआधीच्या विधींपैकीच एक अविभाज्य विधी झाला आहे.

आपल्या आवडत्या मित्रांसोबत दारू पार्टी करायची आणि नाच-गाण्यांवर िधगाणा घालायचा हे दिवस केव्हाच मागे पडले आहेत. मुळात पार्टी एक रात्र किंवा दिवसापुरती मर्यादित राहिलेली नाही. शहरापासून कुठे तरी लांब किंवा थेट परदेश गाठण्याकडे अनेकांचा ओढा वाढलाय. भारतात आजही गोव्याला ‘बॅचलर पार्टी’साठी सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यामागोमाग उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्टला जाणाऱ्यांची, बाइकवर िहडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जागतिक नकाशावर परदेशातील पार्टीचं सर्वाधिक हवंहवंसं वाटणारं ठिकाण म्हणजे ‘लास वेगास’. पण तिथे पार्टी करण्याचा खर्च सर्वानाच परवडणारा नसतो. त्यामुळे हल्ली बँकॉक, मलेशिया, न्यूझीलंड, दुबई, स्पेन ही ‘बॅचलर पार्टी’साठी हॉट डेस्टिनेशन्स झालेली आहेत. अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे मुलांनी परदेशातील हॉट डेस्टिनेशन्सला जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे तिथे जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील मुली पाहायला मिळतात. त्यांच्याशी सलगी करता येते की नाही हा पुढचा भाग, पण नेत्रसुख मात्र नक्की मिळतं. तिथलं मोकळं वातावरण, नाइट लाइफ याची मजा पुढे क्वचितच बायकोसोबत असताना घेता येणार असते. त्यामुळे ‘बॅचलर पार्टी’च्या निमित्ताने मिळणारी ही संधी कुठला मुलगा सोडेल तर नवलच.

पार्टीत केवळ ठरवलेल्या गोष्टीच होतात हा तर ठार गरसमज आहे. कारण तिथे गेल्यावर कधी कधी असे काही प्रसंग घडतात त्यातून अनेक मजेदार आणि अंगाशी येणाऱ्या गोष्टींचाही सामना करावा लागतो. मुळात प्लािनगच ‘जो होगा देखा जाएगा’ असं केलं जातं. आयुष्यात एकदाच लग्न करायचंय (?) त्यामुळे त्याआधीची पार्टीही एकदाच होणार. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद लुटण्याकडे मुलांचा कल असतो. एरवी कधीही घातले नसले तरी टीशर्ट-थ्रीफोर्थ आणि गॉगल लावून वावरणं, वाऱ्याच्या वेगाने बाइकवरून किंवा कारमधून िहडणं, पाण्याऐवजी फक्त बिअर प्राशन करणं, समुद्रकिनाऱ्यावर बनाना राइडचा आनंद लुटणं, जमेल तितके पांचट विनोद करणं, प्रत्येक वाक्याची सुरुवात आणि शेवट शिवीने करणं, पसे खर्च करताना हात मोकळा सोडणं, पबमध्ये जाऊन दारू ढोसणं, ओठांमध्ये सतत धुरकांडी पेटत ठेवणं, लेडीज मसाज पार्लरमध्ये जाऊन मसाज घेणं, बोहल्यावर चढणाऱ्या मित्रासाठी त्याचा वीक पॉइंट असलेल्या गोष्टीचा केक बनवणं, त्याच्यासाठी अश्लील मेसेज आणि चित्र असलेला टीशर्ट किंवा टोपी बनवून घेणं, टाय आणि अंडरवेअरमध्ये फोटोसेशन, मुलाचे हातपाय बांधून त्याच्यासोबत सुंदर तरुणीला चाळे करायला लावणं, पबमध्ये बिकिनी घालून पोल डान्स करणाऱ्या तरुणीसोबत फ्लोअरवर नाचणं, त्यांच्यासोबत फोटो काढण्याचं थ्रिल, लॅप डान्स, अलकाझर कॅबरे शो, अनलिमिटेड टकीला शॉट्सची स्पर्धा, भेटवस्तू म्हणून निरोध देणं आता नवीन नाही, पण त्याचा वापर कसा करायचा याची शिकवणी घेणं, मित्रांपकीच एखाद्याला मुलगी बनवून हनिमूनच्या रात्रीची तालीम देणं, उपलब्ध असेल तर पावडरचं सेवन (तुम्हाला याचा अर्थ कळला असेलच) करणं, भूतकाळातील चुकांचा पाढा वाचताना इमोशनल होणं, नशेत मित्रांचे पापे घेणं, ‘बॅचलर पार्टी’च्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गोष्टींची ही यादी न संपणारी आहे. त्या करताना बोहल्यावर चढणारा मित्र किती सोज्वळ किंवा किती पोहोचलेला आहे यावर त्याचे परिणाम आणि निकाल ठरत असतात. ग्रुपमधल्या सर्वात खोडकर मुलाचंच लग्न होणार असेल मग तर मस्तीला सीमाच राहत नाही.

‘बॅचलर पार्टी’ ही आता केवळ धिंगाण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स हा त्याचा आता अविभाज्य भाग झाला आहे. पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, स्नोबोर्डिग, बंजी जम्पिंग, वॉटरफॉल रॅपिलग, स्नॉरकेिलग, सायकल ट्रेकिंग, हॉट एअर बलुिनग, स्काय डायिवग, स्कूबा डायिवग यांसारखे थरारक खेळ जिथे असतात तीच ठिकाणं अनेकदा पार्टीसाठी निवडली जातात. या गोष्टी लग्नानंतर मुलांना वेळ पडेल तेव्हा मुलींसमोर स्वत:चा धाडसीपणा आणि साहसाची वर्णनं ऐकवण्यासाठीही उपयोगात येतात, ते वेगळं. हल्ली लग्नाचाच खर्च सहा ते सात आकडय़ांमध्ये जातो. त्यात ‘बॅचलर पार्टी’चाही मोठा हिस्सा असतो. राहण्यासाठी उत्तम जागा, विमान प्रवास, खाणं-पिणं, शॉिपग अशा सगळ्याच गोष्टींचा त्यामध्ये समावेश असतो. बजेट चांगलं असेल तर प्रायव्हेट पूल, बार, ग्रिल यांची सोय असलेला व्हिलासुद्धा बुक केला जातो. जेणेकरून विनाअडथळा मनाप्रमाणे गोष्टी करता येतील.

इंटरनेटवर तर आता हवं-नको ते सगळं उपलब्ध आहे. काय करा यासोबतच काय करू नका यावरूनही मुलांना बऱ्याच कल्पना सुचत असतात. त्या अमलातही आणल्या जातात. ‘बॅचलर पार्टी’चा प्रत्येक दिन सुहाना, शाम रंगीन आणि रात हसीन बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. आणि प्रत्येक क्षण यादगार बनवला जातो. म्हणूनच ग्रूप जितका लहान तितकी अधिक मजा हे सूत्रही पाळलं जातं. मोठा ग्रूप असेल तर खर्चही वाढतो. दोन गाडय़ा, हॉटेलमध्ये गेल्यावर दोन टेबलं, दोन रूम्स आणि मग गट-तटही निर्माण होतात. आणि त्या पार्टीचा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे या गोष्टींचीदेखील काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

महाविद्यालय किंवा ऑफिसमधील मित्रांसोबत आधी कितीही पाटर्य़ा केल्या असल्या तरी ‘बॅचलर पार्टी’चं कुतूहल वेगळंच असतं. ती ठरल्यापासून पोटात येणारा गोळा, प्रत्यक्ष मजा लुटताना जिवाची होणारी घालमेल आणि पार्टी संपल्यानंतरचा तो क्षण शब्दात व्यक्त करता न येण्यासारखाच असतो. म्हणूनच ‘बॅचलर पार्टी’ म्हणजे जवळच्या मित्रांसोबत मनाला वाटेल ते करण्याची, प्रत्येक क्षण बिनधास्तपणे जगण्याची शेवटची संधी असते हेच खरं.
प्रशांत ननावरे – @nprashant / naanwareprashant@gmail.com